IMPIMP

Devendra Fadnavis | ‘धर्मवीर नाही म्हणणं हा द्रोह, अजित पवारांच्या विधानावर देवेंद्र फडणवीसांची टीका (व्हिडिओ)

by nagesh
Devendra Fadnavis | devendra fadanvis criticized ajit pawar over sambhaji maharaj dharmveer remark

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन – हिवाळी अधिवेशनादरम्यान (Winter Session) विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी संभाजी महाराज (Sambhaji Maharaj) हे धर्मवीर नव्हते तर स्वराज्यरक्षक होते असे विधान केले होते. या वक्तव्यावरुन भाजप (BJP) आणि शिंदे गटाने अजित पवारांवर टीका केली. अजित पवार यांनी केलेल्या वक्तव्यावरून राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी पवारांवर निशाणा साधला आहे. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) पुण्यात एका कार्यक्रमासाठी आले होते. त्यावेळी त्यांनी अजित पवारांवर टीकास्त्र सोडले.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

धर्मवीर नाही म्हणणं हा द्रोह
देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना अजित पवार यांनी केलेल्या वक्तव्याबद्दल विचारण्यात आले. त्यावर बोलताना ते म्हणाले, छत्रपती संभाजी महाराजांना स्वराज्य रक्षक (Swaraj Rakshak) म्हणण्यास कोणाची हरकत नाही. ते स्वराज्य रक्षक आहेतच. पण ते धर्मवीर (Dharmaveer) नाही, असं म्हणणं एक प्रकारे संभाजी महाराजांच्या विचारांशी द्रोह असून छत्रपती संभाजी महाराज यांच्यावर अन्यायच आहे. संभाजी महाराज यांना कशासाठी एवढा अत्याचार सहन करावा लागला. देव, देश आणि धर्मासाठी संभाजी महाराज लढले. तसेच छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) आणि छत्रपती संभाजी महाराज नसते तर या महाराष्ट्रात हिंदूच उरले नसते. त्यामुळे ते धर्मवीर आहेतच, धर्मवीर नाही म्हणणं हा द्रोह असल्याचे म्हणत फडणवीस यांनी अजित पवारांना टोला लगावला.

 

 

 

जनता त्यांना जाणता राजा म्हणणार नाही
राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ (NCP leader Chhagan Bhujbal) यांनी शरद पवार (Sharad Pawar) यांना आम्ही जाणता राजा (Janata Raja) म्हणणारच असे म्हटले आहे. यावर बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, कोणाला काय म्हणायचे असेल ते म्हणा. या देशात जाणते राजे एकच ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. त्यामुळे आपल्या नेत्यांना कोणाला काही म्हणायचं असेल तर त्यांनी म्हणाव, मात्र जनता त्यांना म्हणणार नाही अशी भूमिका त्यांनी मांडली.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

सुप्रिया ताईंच्या भूमिकेचं स्वागत
मागील काही दिवसांपासून वैयक्तिक पातळीवर टीका होत आहे. ते टाळले पाहिजे असे सुप्रिया सुळे (MP Supriya Sule) यांनी मत व्यक्त केले होते.
यावर बोलताना फडणवीस म्हणाले, मी सुप्रिया ताईंच्या भूमिकेचं स्वागत करतो.
सुप्रिया ताईंच म्हणणं त्यांच्या कार्यकर्त्यांनी ऐकलं पाहिजे.
राष्ट्रवादीचे कार्यकर्ते सोशल मीडियावर सतत खालच्या स्तरावर टीका करत असतात.
आम्ही देखील आमच्या कार्यकर्त्यांना सुप्रिया ताई प्रमाणे आवाहन करतो.
परंतु सुप्रिया ताईंच्या कार्यकर्त्यांनी त्यांचं एकदा तरी ऐकाव, असं फडणवीस म्हणाले.

 

Web Title :- Devendra Fadnavis | devendra fadanvis criticized ajit pawar over sambhaji maharaj dharmveer remark

 

हे देखील वाचा :

E-Car | बापरे! एका चार्जमध्ये ७०० किलोमीटर धावणार ही इलेक्ट्रिक सेडान, नवीन इंटेरियर, नवीन फीचर, नाव आहे…

Budget 2023 | अर्थमंत्री सीतारामन मध्यमवर्गीयांना देऊ शकतात मोठी भेट, टॅक्स सवलत मर्यादा वाढवण्यावर विचार

Nana Patole | ‘मुंबई व महाराष्ट्राचे महत्व कमी करण्यासाठी योगी आदित्यनाथांना पायघड्या’ – नाना पटोले

 

Related Posts