IMPIMP

S. Balan Cup T20 League | चौथी ‘एस. बालन करंडक’ अजिंक्यपद टी-२० क्रिकेट स्पर्धा ! माणिकचंद ऑक्सिरीच बाद फेरीत; संदीप हिरोज् संघाची विजयी सलामी

by nagesh
  S. Balan Cup T20 League | Fourth S. Balan Karandak' Championship T20 Cricket Tournament! Manikchand Oxirich in the knockout round; Sandeep Heroes team's winning opening

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन- S. Balan Cup T20 League | पुनित बालन ग्रुप (Punit Balan Group) तर्फे आयोजित चौथ्या ‘एस. बालन
करंडक’(S. Balan Cup T20 League ) अजिंक्यपद टी-२० आंतरक्लब क्रिकेट २०२३ स्पर्धेत माणिकचंद ऑक्सिरीच संघाने सलग तिसरा विजय
मिळवत बाद फेरी गाठली. संदीप हिरोज् संघाने स्पर्धेत विजयी सलामी दिली. (S. Balan Cup T20 League)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

सहकारनगर येथील शिंदे हायस्कूल मैदानावर सुरू असलेल्या या स्पर्धेत हर्ष संघवी याच्या फलंदाजीच्या जोरावर माणिकचंद ऑक्सिरीच संघाने न्युट्रीलिशियस् संघाचा ७ गडी राखून पराभव करत बाद फेरीतील आपले स्थान निश्‍चित केले. पहिल्यांदा फलंदाजी करताना न्युट्रीलिशियस् संघाने १५४ धावा धावफलकावर लावल्या. शंतनु खेनात याने नाबाद ६६ धावा करून संघाच्या डावाला आकार दिला. हे आव्हान माणिकचंद ऑक्सिरीच संघाने ११.३ षटकात व ३ गडी गमावून पूर्ण केले. हर्ष संघवी याने ६२ धावांची खेळी केलीी. अनिकेत कुंभार (३६ धावा) आणि शिवम धुमाळ (३६ धावा) यांनीही धावांचे योगदान देऊन संघाचा विजय सोपा केला. (S. Balan Cup T20 League)

 

आयुष वर्थक याच्या अचूक गोलंदाजीच्या जोरावर संदीप हिरोज् संघाने ऑल मॉन्स्टर्स संघाचा १६ धावांनी पराभव केला. संदीप हिरोज् संघाने प्रथम फलंदाजी करताना चिन्मय मोहीते (३४ धावा), हृषीकेश पवार (३० धावा) आणि भार्गव पाटील (२२ धावा) यांच्या फलंदाजीच्या जोरावर १६७ धावांचे आव्हान उभे केले. या आव्हानाचा पाठलाग करताना ऑल मॉन्स्टर्स संघाचा डाव १५१ धावांवर मर्यादित राहीला. कर्णधार जय बिश्ता याने ५० धावांची खेळी केली पण, संघाचा विजय १७ धावांनी दूर राहीला. आयुष वर्तक याने ३१ धावात ३ गडी तर, हर्षित सेठी याने २३ धावात ४ गडी बाद करून संघाचा विजय सोपा केला.

 

 

सामन्याचा संक्षिप्त निकालः गटसाखळी फेरीः
संदीप हिरोज्ः १८ षटकात ८ गडी बाद १६७ धावा (चिन्मय मोहीते ३४, हृषीकेश पवार ३०, भार्गव पाटील २२, जय बिश्ता ३-२६) वि.वि. ऑल मॉन्स्टर्सः १७.५ षटकात १० गडी बाद १५१ धावा (जय बिश्ता ५० (३२, ५ चौकार, ३ षटकार), यश रामचंदानी २३, साई चव्हाण २०, आयुष वर्तक ३-३१, हर्षित सेठी ४-२३); सामनावीरः आयुष वर्थक;

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

न्युट्रीलिशियस्ः १८ षटकात ६ गडी बाद १५४ धावा (शंतनु खेनात नाबाद ६६ (४१, ८ चौकार, २ षटकार), हृषीकेश राऊत ३८, आयुष काब्रा २-३२, अक्षय जाधव २-३५) पराभूत वि. माणिकचंद ऑक्सिरीचः ११.३ षटकात ३ गडी बाद १५५ धावा (हर्ष संघवी ६२ (२९, ६ चौकार, ५ षटकार), अनिकेत कुंभार ३६, शिवम धुमाळ ३६, यश माने २-४७); सामनावीरः हर्ष संघवी;

 

 

Web Title :-  S. Balan Cup T20 League | Fourth S. Balan Karandak’ Championship T20 Cricket Tournament! Manikchand Oxirich in the knockout round; Sandeep Heroes team’s winning opening

 

हे देखील वाचा :

Sinhagad Fort-Regional Tourism Scheme | प्रादेशिक पर्यटन योजनेअंतर्गत सिंहगड परिसर संवर्धनासाठी 3 कोटी 75 लाख मंजूर

Roshni Shinde | ‘गुंडगिरी करण्यासाठी मुख्यमंत्री झालात का?’, मारहाण झालेल्या रोशनी शिंदेचा मुख्यमंत्र्यांना सवाल

Maharashtra Congress | काँग्रेसमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर!, नेत्याचा नाना पटोलेंवर गंभीर आरोप, म्हणाले- ‘मुख्यमंत्र्यांकडून पटोलेंना महिन्याला एक खोका मिळतो’

Joshi’s Museum Of Miniature Railways | रौप्यमहोत्सवी वर्षाचे औचित्य साधत ‘वंदे भारत’ रेल्वेच्या प्रतिकृतीचे चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते अनावारण; लवकरच संग्रहालयात धावणार वंदे भारत रेल्वे (व्हिडिओ)

 

Related Posts