IMPIMP

Ashish Shelar | ‘वज्रमूठ’ नव्हे, ही तर 16 चोरांची ‘हात मिळवणी’!, भाजपचा उद्धव ठाकरेंना टोला (व्हिडिओ)

by nagesh
Ashish Shelar | Not 'Vajramuth', this is the 'catch' of 16 thieves!, BJP's attack on Uddhav Thackeray (Video)

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन – महाविकास आघाडीची ‘वज्रमूठ’ सभा (MVA Vajramuth Sabha) नुकतीच छत्रपती संभाजीनगर येथे पार पडली. या सभेला संबोधित करताना काँग्रेस (Congress), राष्ट्रवादी (NCP) आणि ठाकरे गटाच्या नेत्यांनी केंद्र सरकार, भाजपवर (BJP) आणि शिंदे गटावर टीकास्त्र सोडले. या सभेत करण्यात आलेल्या आरोपांना भाजप आणि शिंदे गटाकडून प्रत्युत्तर देण्यात आले. आता महाविकास आघाडीच्या सभेवर भाजप आमदार आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी सडकून टीका केली आहे. तसेच ही वज्रमूठ नसून ही तर 16 चोरांची हात मिळवणी असल्याचा टोला शेलार (Ashish Shelar) यांनी लगावला.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

देशातील 145 पक्षांमधील सगळ्यात टवाळखोर पक्ष म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे गट (Uddhav Balasaheb Thackeray Group), या टवाळांनी परवा सभा घेतली. महाराष्ट्र विकास आघाडीची म्हणे वज्रमूठ. यांना साधही कळत नाही की, वज्रमूठ एका ताकदवान माणसांची असते. 16 जण एकत्र मिळून करतात त्याला हात मिळवणी म्हणतात त्याला वज्रमूठ म्हणत नाहीत. 16 चोरांनी मिळून केलेली ही हात मिळवणी असल्याचा टोला देखील आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी लगावला.

 

 

ते बोलून चुकले

पत्रकारांशी संवाद साधताना आशिष शेलार पुढे म्हणाले, एवढे वर्ष आमच्यासोबत राहून त्यांच्या मनातली इच्छा होती. जे त्यांच्या पोटात होते ते बोलून चुकले. भाजपला नामशेष करु, त्यांना नामशेष पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांना करायचे का? असा प्रश्न आहे. भाजपला नामशेष करायचे म्हणजे काय? त्यांना तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना नामशेष करायचे होते का? त्यांना अटक करण्यासाठी केलेला प्रयत्न आता उघड झाला आहे. त्यांना अमित शाह (Amit Shah) यांना नामशेष करायचे आहे का? तुम्ही नामुष्कीने जगत आहात. या महाराष्ट्राच्या मातीत औरंगजेब येऊन नामशेष करायची भाषा करत होता. याच महाराष्ट्रात आता कलियुगामध्ये औरंगेजेबी स्वप्न उद्धव ठाकरे मांडत आहेत, अशा शब्दात शेलार यांनी उद्धव ठाकरेंच्या वक्तव्याचा समाचार घेतला.

 

 

मुख्यमंत्री असताना काय दिवे लावले

शेलार पुढे म्हणाले, या सगळ्यांमध्ये उद्धव ठाकरे यांचे औरंगजेबी हिरवं स्वप्न आहे ते समोर येत आहे. त्यांचे हे स्वप्न आम्ही पूर्ण होऊ देणार नाही. त्यांनी मुंबईसाठी काय करणार आहे ते सांगावं. मुख्यमंत्री असताना काय दिवे लावले ते सांगावं. त्यांच्या पक्षाचा प्रवास अधोगतीकडे जात आहे. आता तर तो मुंबईकर आणि मराठी माणसांच्या जीवावर उठला असल्याचा आरोप त्यांनी केला.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

हिंदू जन आक्रोश मोर्चावर आक्षेप का घेतला?

उद्धव ठाकरे यांनी हिंदू जन आक्रोश मोर्चावर (Hindu Jan Akrosh Morcha) आक्षेप घेतला. एमआयएम (MIM), समाजवादी पार्टीने आक्षेप घेतला नाही. काँग्रेस-राष्ट्रवादी, मनसेने (MNS)आक्षेप घेतला नाही. हिंदू जन आक्रोश मोर्चा लव जिहाद (Love Jihad) आणि लँड जिहादावर (Land Jihad) होता. त्याच्यावर आक्षेप घेण्याचे कारण उद्धव ठकरे यांनी सांगावे, अशी मागणी आशिष शेलार यांनी केली.

 

Web Title : Ashish Shelar | Not ‘Vajramuth’, this is the ‘catch’ of 16 thieves!, BJP’s attack on Uddhav Thackeray (Video)

 

हे देखील वाचा :

Uddhav Thackeray | ठाण्यातील प्रकरणावरुन उद्धव ठाकरेंचा घणाघात; म्हणाले – ‘फडणवीस फडतूस, गृहमंत्री नव्हे तर हे तर गुंडमंत्री’ (व्हडिओ)

S. Balan Cup T20 League | चौथी ‘एस. बालन करंडक’ अजिंक्यपद टी-२० क्रिकेट स्पर्धा ! माणिकचंद ऑक्सिरीच बाद फेरीत; संदीप हिरोज् संघाची विजयी सलामी

Sinhagad Fort-Regional Tourism Scheme | प्रादेशिक पर्यटन योजनेअंतर्गत सिंहगड परिसर संवर्धनासाठी 3 कोटी 75 लाख मंजूर

 

Related Posts