IMPIMP

Devendra Fadnavis | फडणवीसांचा ठाकरे सरकारवर आरोप; म्हणाले – ‘जलयुक्त शिवार बंद केल्यामुळे नद्यांना महापूर’

by nagesh
Lok Sabha Election 2024 | loksabha election 2024 bjp mission 48 seat announced devendra fadnavis

बुलडाणा : सरकारसत्ता ऑनलाइन Devendra Fadnavis | मागील काही दिवसात झालेल्या वादळासह जोरदार पावसामुळे मराठवाडा आणि विदर्भातील अनेक भागात शेतकऱ्यांचे अधिक प्रमाणात नुकसान झालं आहे. या पार्श्वभुमीवर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे नुकसानग्रस्त भागातील पाहणी दौरा करत आहेत. त्यावेळी फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर (Thackeray government) निशाणा साधला आहे. ‘भाजप सरकारच्या काळात जलयुक्त शिवार योजना (Jalayukta Shivar Yojana) राबवण्यात आल्या. म्हणून नद्यांचे खोलीकरण करण्यात आले होते. पण, आज योजना बंद केल्यामुळे नद्यांना महापूर आला, असा घणाघात देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

 

देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर (Praveen Darekar) हे आज (सोमवारी) उस्मानाबाद जिल्ह्यात पूरग्रस्त भागाची पाहणीसाठी होते. त्यांनी तेथील शेतकऱ्यांशी संवाद साधला, त्यावेळी फडणवीस म्हणाले की, जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे अडीच लाख हेक्टरपेक्षा जास्त नुकसान झाले आहे. अद्याप शेतकऱ्यांना सरकारकडून कोणतीही मदत नाही. विमा एजंट गावागावात फिरत आहे. शेतकऱ्यांकडून 500 रुपये घेऊन नुकसानीचा टका वाढण्याचे आमिष देत आहे. 500 रुपये दिले तर 60 टक्के नुकसान दाखवतो आणि नाही दिले तर 20 टक्के नुकसान दाखवतो, अशा प्रकारे फसवणूक सुरू असल्याचं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

 

राज्य सरकारने (Thackeray government) शेतकऱ्यांना तातडीने मदत करावी, विम्याची मदत करावी,
दसऱ्यापूर्वी शेतकऱ्यांच्या अकाऊंटमध्ये जमा करावे, अशी मागणी देखील देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.
फडणवीस म्हणाले की, लोकांशी आम्ही चर्चा केली, त्यांच्या समस्या जाणून घेतल्या.
तेव्हा आमच्या काळात आम्ही जलयुक्त शिवार योजना राबवली होती. या योजनेतून नदीचे खोलीकरण करण्यात आले होते.
ज्यांनी केले त्यामुळे काही जणांच्या शेती वाचली आहे. ही योजना मोठ्या प्रमाणात झाली पाहिजे.
पण, या सरकारने जलयुक्त शिवार योजना (Jalayukta Shivar Yojana) बंद केली.
त्यामुळे खोलीकरण आणि रुंदीकरण बंद झाले, त्यामुळे या ठिकाणी पाणी साचत आहे. असा आरोप देखील फडणवीस यांनी केला आहे.

 

Web Title :- Devendra Fadnavis | Fadnavis on Thackeray government; Said – Rivers flooded due to closure of water-rich camps

 

हे देखील वाचा :

Pune Crime | पुण्यातील बीअर शॉपी बंद करण्यासाठी गेलेल्या पोलीस हवालदाराला मारहण; चौघांना 13 वर्षानंतर सक्तमजुरीची शिक्षा

Aryan Khan Drug Case | शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान ‘एवढे’ दिवस राहणार एनसीबीच्या कोठडीत

Devendra Fadnavis | ‘…तोपर्यंत या सरकारला जगू देणार नाही’ – ठाकरे सरकारला फडणवीसांचा इशारा

 

Related Posts