IMPIMP

Devendra Fadnavis | ‘द काश्मीर फाईल्स’चे पडसाद विधानसभेत ! देवेंद्र फडणवीसांचे ‘डंके की चोट पे’ तर, तालिका अध्यक्षांचीही ‘गुगली’

by nagesh
Devendra Fadnavis | 111 candidates will also be appointed through mpsc announces deputy cm devendra fadnavis in vidhan sabha

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन Devendra Fadnavis | दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री (Vivek Agnihotri) यांच्या ‘द काश्मीर फाईल्स’ (The Kashmir Files) या हिंदी चित्रपटावरून राज्यात वादंग निर्माण झालेला पाहायला मिळतो. याची चर्चा संपुर्ण देशात झाली आहे. सध्या राज्याच्या विधानसभेचं उन्हाळी अधिवेशन सुरू आहे. या दरम्यान विधानसभेत प्रश्नोत्तराचा तास संपला. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी हरकतीचा मुद्दा उपस्थित केला होता. मागील 3 तीन दिवस पुरवणी मागण्यांवर चर्चा सुरुय. या चर्चेत महाविकास आघाडी सरकारला (Maha Vikas Aghadi Government) अधिक वेळ दिला, या मुद्द्यावरून फडणवीस आक्रमक झाल्याचे दिसले.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

विधानसभेत साधारण सात तास चर्चा झाली. त्यामध्ये विरोधी पक्षाला फक्त दोन तास 40 मिनिटे एवढाच वेळ मिळाला. विरोधकांना अल्प वेळ मिळाला. विरोधक आणि सत्ताधारी यांना समान वेळ मिळायला हवा. इथून पुढे समसमान वेळ मिळायला हवी अशी मागणी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केली. त्यानंतर या आक्षेपावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) म्हणाले, ”ही वेळ कुणी आणली? काँग्रेस सदस्य बोललेच नाहीत. ही वेळेची आकडेवारी मनानेच आणली नाही ना?” असा टोला लगावला. त्यावर सत्ताधारी बाकावरून “विरोधी पक्षनेते काल पिक्चर बघायला गेले होते, कसा होता पिक्चर” असं म्हणत फडणवीस यांचा चिमटा घेतला.

 

दरम्यान, सत्ताधारी पक्षाकडून डिचवले जाताच फडणवीस म्हणाले, “होय! मी काल बाहेर पिक्चर बघायला गेले होतो आणि ‘डंके की चोट पे’ सांगतो पिक्चर बघायला गेलो होतो.” यानंतर लगेच राष्ट्रवादीचे नेते आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील (Jayant Patil) म्हणाले, ”विरोधी पक्षनेते हा द काश्मीर फाईल्स चित्रपट इंटरवलनंतर फारच बोअर आहे. पण, या चित्रपटाने भरपूर गल्ला केला आहे. त्या चित्रपट दिग्दर्शकाला त्यातील काही पैसे काश्मीरी पंडीताच्या घरासाठी दान करायला सांगा,” असा टोला लगावला.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

अशा शाब्दिक संघर्षातच भाजप आमदार योगेश सागर (BJP MLA Yogesh Sagar) यांनी खाली बसून बोलण्यास शेरेबाजी सुरु केली होती.
त्यावर जयंत पाटील यांनी देखील, ”आमचे लोक जर खाली बसून बोलायला लागले तर चांगलीच पंचाईत होईल,” असा टोला लगावला.
अशा वातावरणात तालिका अध्यक्ष संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी देखील प्रतिक्रिया व्यक्त केली.
”विरोधी पक्षनेते काल चित्रपट पाहून आले. सभागृहात इतकी चर्चा होतेय. काय विरोधी पक्षनेते आम्हालाही न्यायचे ना चित्रपट बघायला, आम्हीही आलो असतो.
आम्हालाही न्या चित्रपट बघायला,” असे म्हणताच सभागृह पुन्हा शांत झाला.

 

Web Title :- Devendra Fadnavis | the kashmir files captivates assembly devendra fadnavis danke ki chot pe while

 

हे देखील वाचा :

Samantha Ruth Prabhu | समंथानं उचललं मोठं पाऊल; म्हणाली – ‘अखेर तुम्हाला….’

Reserve Bank of India | सर्वसामान्यांना झटका? PPF नंतर आता ‘त्या’ गुंतवणुकीवरही सरकारची नजर

Malaika Arora Controversial News | मलाइका अरोरानं दिलं तोकड्या कपड्यांवरून प्रश्न विचारणाऱ्यांना सडेतोड उत्तर; म्हणाली – ‘लोक नावं ठेवतील असं कधीच वागत नाही..’

 

Related Posts