IMPIMP

Devendra Fadnavis | ‘या’ तारखेपासून पैसे थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करणार, देवेंद्र फडणवीस यांची माहिती

by nagesh
Maharashtra Politics News | thackeray Group mp priyanka chaturvedi tell why she meet hm amit shahmaharashtra

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन राज्यात पावसामुळे (Rain in Maharashtra) शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांना तात्काळ मदत द्यावी अशी मागणी विरोधी पक्षाकडून केली जात आहे. राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील (NCP Leader Jayant Patil) यांनी अतिवृष्टीने ग्रस्त असलेल्या शेतकऱ्यांना (Farmers) पहिल्यांदा दिलासा द्या, सरकार म्हणतंय मदत करतो, मात्र मदत अद्याप कागदावरच आहे. सरकारचे बोलणेच जास्त आणि कामात शून्य अशी टीका त्यांनी केली. तर अजित पवारांनी (Ajit Pawar) शेतकऱ्यांना मदत कधी मिळणार अशी विचारणा केली. विरोधकांच्या प्रश्नाला उत्तर देताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी शेतकऱ्यांना लवकरच मदत मिळणार असून पैसे थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले जाणार असल्याची माहिती देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी दिली.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

सरकार स्थिर करण्यात, नाराजांची मनधरणी करण्यात, खाते वाटून घेण्यात नेते व्यस्त आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांकडे, सामान्य जनतेकडे त्यांचे दुर्लक्ष होत आहे, असा आरोप जयंत पाटील यांनी माध्यमांशी बोलताना केला. तर शिवसेनेनं (Shivsena) देखील सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधताना शेतकऱ्यांना मदत कधी मिळणार, केवळ घोषणांचा पाऊस आणि अंमलबजावणीचा दुष्काळ असल्याची टीका केली. या टीकेला आज देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी सभागृहात उत्तर दिलं.

 

 

राज्यात अल्पावधीत 121 टक्के पाऊस

राज्यात अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत करण्यासाठी सरकारने पुढाकार घेतला आहे. अतिवृष्टीनंतर आम्ही दौरा करुन पंचनामे करण्याच्या सूचना दिल्या. यंदा अल्पावधीत 121 टक्क्यापेक्षा अधिकचा पाऊस झाला आहे. त्यामुळे दोन ऐवजी तीन हेक्टर मर्यादेत आणि NDRF पेक्षा दुप्पट अशी मदत देण्याचा निर्णय घेतल्याची माहिती फडणवीस यांनी दिली.

 

 

15 सप्टेंबरपासून मदत वितरित

गोगलगाय आणि अन्य कारणांमुळे नुकसान झाले, ते निकषात बसत नसले तरी गुलाबी बोंडआळी वेळी जसा वेगळा GR काढून मदत केली.
तशाच प्रकारे वेगळा जीआर काढून मदत करण्याचा निर्णय राज्य सरकारने (state Government) घेतला आहे.
त्यानुसार येत्या 15 सप्टेंबर पासून शेतकऱ्यांना मदत वितरित करण्याचा निर्णय सुद्धा राज्य सरकारने घेतल्याची माहिती फडणवीस यांनी दिली.
तसेच हे पैसे थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले जाणार असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Devendra Fadnavis | when will the farmers get the aid money devendra fadnavis told the date

 

हे देखील वाचा :

Sonali Phogat Death | ’खाण्यात काहीतरी गडबड आहे, कुणीतरी कट रचतोय…’ ! मृत्यूपूर्वी सोनाली फोगाटने आईला केला होता फोन

BJP-Shinde Alliance | ‘राज्यात युती टिकवायची असेल तर भापजने…’, बावनकुळेंच्या वक्तव्यामुळे भाजप-शिंदे गटात वादाची ठिणगी

Adani Power Share | आज अदानी पॉवरचे शेअर घसरले, सोमवारी दिसून आली होती जबरदस्त तेजी

 

Related Posts