IMPIMP

BJP-Shinde Alliance | ‘राज्यात युती टिकवायची असेल तर भापजने…’, बावनकुळेंच्या वक्तव्यामुळे भाजप-शिंदे गटात वादाची ठिणगी

by nagesh
Shinde-Fadnavis Government | Another failure of the Shinde-Fadnavis government, another project lost in the hands of Maharashtra?

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी शिवसेना (Shivsena) आणि अपक्ष अशा एकूण 50 आमदारांना सोबत घेऊन बंड केले. यानतंर भाजप सोबत युती करुन एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले. शिंदे-भाजप युतीला (BJP-Shinde Alliance) दोन महिने होत नाही तोच दोन्ही पक्षांमध्ये वादाची ठिणगी पडली आहे. या वादाला कारण ठरले भाजपचे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांचे वक्तव्य. बावनकुळे यांनी अमरावतीचा पुढचा खासदार आणि बडनेरचा आमदार भाजपचा असेल असे वक्तव्य केलं. याच वक्तव्यावरुन शिंदे-भाजप युतीमध्ये (BJP-Shinde Alliance) वादाची ठिणगी पडली आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

अमरावतीमध्ये खासदार नवनीत राणा (MP Navneet Rana) आणि आमदार रवी राणा (MLA Ravi Rana) यांच्या मतदारसंघात रविवारी दहिहंडीचे (Dahihandi) आयोजन करण्यात आले होते. यावेळी बोलताना बावनकुळे यांनी आमरावतीचा पुढचा खासदार आणि बडनेरचा आमदार भाजपचा असेल असे वक्तव्य केलं. त्यांच्या या वक्तव्यावरुन नवनीत राणा आणि रवी राणा यांनी भाजप प्रवेशाचे संकेत दिल्याची चर्चा आहे.

 

चंद्रशेखर बावनकुळे यांच्या या वक्तव्यावर माजी खासदार आणि शिंदे गटाचे नेते आनंदराव अडसूळ (Anandrao Adsul) हे नाराज झाले आहेत.
राज्यात युती टिकवायची असेल तर भाजपने संयम ठेवून बोलावे.
अमरावती बुलढाणा हा शिवसेनेचा मतदारसंघ (Constituency) आहे, त्यामुळे आमदार आणि खासदार भाजपचा म्हणणं चुकीचं आहे.
आम्ही सोबत आहोत याचं भान बावनकुळे यांनी ठेवाव, असं अडसूळ म्हणाले.
तसेच याबाबत आपण देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्याकडे तक्रार करणार असल्याचंही आनंदराव अडसूळ यांनी सांगितले.
2019 च्या निवडणुकीत नवनीत राणा यांनीच शिवसेनेच्या आनंदराव अडसूळ यांचा पराभव केला होता.

 

Web Title :- BJP-Shinde Alliance | shivsena cm eknath shinde camp leader anandrao adsul unhappy with chandrashekhar bawankule statement

 

हे देखील वाचा :

Adani Power Share | आज अदानी पॉवरचे शेअर घसरले, सोमवारी दिसून आली होती जबरदस्त तेजी

MP Vinayak Raut | ‘…पण त्यांना आपल्या दरवाज्यातही उभे करु नका’, राज ठाकरेंच्या ‘त्या’ वक्तव्यावर विनायक राऊतांचा सूचक सल्ला

MNS Chief Raj Thackeray | ‘नुपूर शर्मा स्वत:च्या मनातलं बोलल्या नाहीत, तर…’ राज ठाकरेंनी केलं समर्थन

 

Related Posts