IMPIMP

Sonali Phogat Death | ’खाण्यात काहीतरी गडबड आहे, कुणीतरी कट रचतोय…’ ! मृत्यूपूर्वी सोनाली फोगाटने आईला केला होता फोन

by nagesh
Sonali Phogat Death | bjp leader sonali phogat sister told conspiracy behind her death

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Sonali Phogat Death | भाजप नेत्या आणि टिकटॉक स्टार (BJP Leader And TikTok Star) सोनाली फोगाट (Sonali Phogat Death) यांचे गोव्यात निधन झाले. गोवा पोलिसांनी मंगळवारी सांगितले की, 42 वर्षीय सोनालीचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. मात्र, सोनाली फोगाटने तिच्या मृत्यूला षडयंत्र असल्याचे म्हटले आहे. सोनाली फोगाटच्या बहिणीने सांगितले की, सोनाली फोगाट सोमवारी सकाळी तिच्या आईशी बोलली होती. यादरम्यान सोनालीने तिच्या आईला सांगितले की, मला काहीतरी चुकीचे वाटत आहे. माझ्या विरोधात काहीतरी षडयंत्र रचले जात आहे असे दिसते.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

सोनालीच्या बहिणीने सांगितले की, तिचे एक दिवस आधीच बोलणे झाले होते. यादरम्यान सोनाली फोगाट म्हणाली की ती ठीक आहे. शूट करायला जातेय. 27 तारखेला परत येणार असल्याचे तिने सांगितले होते. ती म्हणाली, सोमवारी सकाळी हा प्रकार घडल्यावर आईशी बोलले. यादरम्यान सोनालीने तिच्या आईला सांगितले की जेवल्यानंतर तिच्या शरीरात काहीतरी होत आहे आणि असे वाटते की अन्नात काहीतरी गडबड करण्यात आली आहे, कदाचित कोणीतरी कट रचत आहे. (Sonali Phogat Death)

 

रेस्टॉरंटमध्ये होती सोनाली फोगाट

वृत्तसंस्थेनुसार, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सोनाली फोगाटने अस्वस्थतेची तक्रार केल्यानंतर तिला उत्तर गोवा जिल्ह्यातील अंजुना येथील सेंट अँथनी रुग्णालयात आणण्यात आले. गोव्याचे डीजीपी जसपाल सिंह यांनी देखील दुजोरा दिला आहे की फोगाट अंजुना येथील ’Curlies’ रेस्टॉरंटमध्ये होती, त्या दरम्यान तिने अस्वस्थतेची तक्रार केली होती. त्यानंतर तिला रुग्णालयात आणण्यात आले. मात्र, या प्रकरणात कोणताही गैरप्रकार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

सोनाली फोगाटच्या शरीरावर कोणत्याही प्रकारच्या जखमेच्या खुणा आढळल्या नसल्याचे त्यांनी सांगितले. शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर मृत्यूचे कारण स्पष्ट होईल, असे ते म्हणाले. त्याचवेळी डेप्युटी एसपी जीवबा दळवी यांनी सांगितले की, त्यांना रुग्णालयात मृतावस्थेत आणले होते. ते म्हणाले, प्राथमिक तपासात त्यांच्या मृत्यूचे कारण हृदयविकाराचा झटका असल्याचे दिसून येत आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

2019 मध्ये लढवली विधानसभा निवडणूक

सोनाली फोगाटने 2019 च्या हरियाणा विधानसभा निवडणुकीत आदमपूर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती, परंतु तिचा पराभव झाला होता. तिचा काँग्रेसच्या कुलदीप बिश्नोई यांनी पराभव केला. आता कुलदीप बिश्नोई यांनी काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केला असून त्यांच्या मुलाला येथून निवडणूक लढवायची आहे. त्याचवेळी या जागेवर होणार्‍या पोटनिवडणुकीत सोनाली फोगाटने सुद्धा दावा केला होता. काही दिवसांपूर्वी कुलदीप बिश्नोई यांनी सोनाली फोगाटची भेट घेतली होती.

 

अभिनेत्री व्हायचे होते सोनालीला

सोनाली सिंग फतेहाबादची रहिवासी होती. हिसारच्या संजय फोगाटशी तिचा विवाह झाला होता.
डिसेंबर 2016 मध्ये संजय फोगाट यांचा त्यांच्या शेतात गूढ स्थितीत मृत्यू झाला.
सोनाली त्यावेळी मुंबईत होती. सोनालीला 7 वर्षांची मुलगीही आहे.

सोनालीला सुरुवातीपासूनच अभिनेत्री व्हायचे होते. तिने दूरदर्शनच्या हरियाणवी कार्यक्रमात अँकरिंग करून आपल्या करिअरची सुरुवात केली.
यानंतर तिला Zee TV च्या AMMA मालिकेतही काम मिळाले.
हा शो भारत पाकिस्तान फाळणीच्या थीमवर होता. सोनाली सोशल मीडियावर खूप लोकप्रिय होती.
ती टिकटॉक स्टार म्हणून देखील ओळखली जात होती. सोनालीला भाजपने महिला मोर्चा उपाध्यक्ष केले.
ती हरियाणा, नवी दिल्ली, चंदीगडच्या एसटी विंगची प्रभारी होती. ती भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची सदस्याही होती.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Sonali Phogat Death | bjp leader sonali phogat sister told conspiracy behind her death

 

हे देखील वाचा :

BJP-Shinde Alliance | ‘राज्यात युती टिकवायची असेल तर भापजने…’, बावनकुळेंच्या वक्तव्यामुळे भाजप-शिंदे गटात वादाची ठिणगी

Adani Power Share | आज अदानी पॉवरचे शेअर घसरले, सोमवारी दिसून आली होती जबरदस्त तेजी

MP Vinayak Raut | ‘…पण त्यांना आपल्या दरवाज्यातही उभे करु नका’, राज ठाकरेंच्या ‘त्या’ वक्तव्यावर विनायक राऊतांचा सूचक सल्ला

 

Related Posts