IMPIMP

Dhangar Reservation | आदिवासी प्रवर्गातून धनगर समाजाला आरक्षण नको – राजेंद्र गावित

by nagesh
Dhangar Reservation | dhangar reservation issue shinde group mps opposed

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन  – धनगर आरक्षणावरून (Dhangar Reservation) पुन्हा एकदा वाद पेटण्याची शक्यता आहे. शिंदे गटाचे खासदार राजेंद्र गावित (Rajendra Gawit) यांनी लोकसभेत शुक्रवारी आदिवासी प्रवर्गातून धनगर समाजाला आरक्षण न देण्याची भूमिका घेतली आहे. त्यांच्या या भूमिकेचे पडसाद महाराष्ट्रात उमटत आहेत. भाजपाचे विधानपरिषद आमदार गोपिचंद पडळकर यांनी राजेंद्र गावित (Rajendra Gawit) यांच्या भूमिकेवर भाष्य केले आहे. गावितांना मुख्यमंत्र्यांनी योग्य ती समज द्यावी, असे गोपिचंद पडळकर म्हणाले आहेत.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

पडळकरांनी गावित यांचा निषेध केला आहे. पडळकर याप्रकरणी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांची भेट घेणार आहेत. राज्यात धनगर आरक्षण हा अत्यंत महत्वाचा विषय आहे. या संदर्भात महाराष्ट्रातील दोन खासदार राजेंद्र गावित आणि हिना गावित यांनी धनगर आरक्षणाला (Dhangar Reservation) विरोध केला. यावरून राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी भाजप आणि शिंदे गट धनगर आरक्षणाच्या मुद्यावरून राजकारण करत असल्याचे म्हटले. राहुल शेवाळे यांनी हे राजेंद्र गावित यांचे व्यक्तीगत मत असल्याचे म्हटले.

 

राजेंद्र गावित यांच्या विधानामुळे धनगर समाज आंदोलन करण्याची शक्यता आहे.
एकीकडे भाजप धनगर समाजाला आरक्षणाची आशा दाखवत आहे, तर दुसरीकडे शिंदे गट त्याला विरोध करत आहे.
त्यामुळे हा वाद मोठा होऊ शकतो.

 

Web Title :- Dhangar Reservation | dhangar reservation issue shinde group mps opposed

 

हे देखील वाचा :

Ajit Pawar | रवी राणा यांच्या उद्धव ठाकरेंवरील आरोपावर अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया (VIDEO)

Winter Session -2022 | ‘लाज नसलेल्या माणसाला…’ जितेंद्र आव्हाडांचा विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांना अप्रत्यक्ष टोला

Sania Mirza Divorce | अखेर पाकिस्तानी अभिनेत्री आयेशा ओमर हिने शोएब मलिक सोबतच्या ‘त्या’ फोटो बद्दल केला खुलासा

 

Related Posts