IMPIMP

Winter Session -2022 | ‘लाज नसलेल्या माणसाला…’ जितेंद्र आव्हाडांचा विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांना अप्रत्यक्ष टोला

by nagesh
 Jitendra Awhad | jitendra awhad reaction after prakash ambedkar statement on sharad pawar bjp

नागपूर : सरकारसत्ता ऑनलाईन – नागपूर येथे हिवाळी अधिवेशन (Winter Session -2022) सुरु आहे. मागील चार दिवसामध्ये विरोधक आणि सत्ताधारी यांच्यात खडाजंगी पहायला मिळत आहे. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधकांनी नागपूर एनआयटी भूखंड घोटाळ्याचा (Nagpur NIT Land Scam) मुद्दा उपस्थित केला. त्यामुळे सभागृहात (Winter Session -2022) मोठा गदारोळ झाला. दरम्यान, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Vidhan Sabha Speaker Rahul Narvekar) विरोधी पक्षातील नेत्यांना बोलू देत नसल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

दरम्यान, ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव (Thackeray Group MLA Bhaskar Jadhav) यांना सभागृहात बोलू न दिल्याने राष्ट्रवादीचे (NCP) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना सुनावलं. तुम्ही असला ‘निर्लज्जपणा करु नका’, अशा शब्दात जयंत पाटील यांनी अध्यक्षांवर टीका केली. यानंतर झालेल्या गदारोळानंतर सभागृहाचे कामकाज तहकूब करण्यात आले. यानंतर भाजपच्या नेत्यांनी जयंत पाटील यांचे निलंबन (Jayant Patil Suspension) करण्याची मागणी केल्याने जयंत पाटील यांना हे अधिवेशन (Winter Session -2022) संपेपर्यंत निलंबित करण्यात आले.

 

या सर्व घडामोडीवर राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी प्रतिक्रिया देताना विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना अप्रत्यक्ष टोला लगावला आहे. जयंत पाटलांनी काहीही चुकीचं बोललं नाही. निर्लज्ज ही काही शिवी नाही. लाज नसलेल्या माणसाला निर्लज्ज म्हणतात, त्यात काहीही आक्षेपार्ह नाही. गेली चार दिवस मी सभागृहात घास फुटेपर्यंत ओरडतोय. पण मला अध्यक्षांनी एकदाही बोलू दिले नाही. आम्ही मुद्यांवर बोलतोय. एनआयटीचा भ्रष्टाचार बाहेर येतोय. हा भ्रष्टाचार तुम्ही दडपणार असाल, तर कसं चालेल? हा तुम्ही केलेला भ्रष्टाचार आहे, अशी टीका जितेंद्र आव्हाड यांनी केली. ते एका वृत्तवाहिनीशी बोलत होते.

 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांना उद्देशून बोलताना जितेंद्र आव्हाड म्हणाले,
तुम्ही उच्च न्यायालयात (High Court) कबुली दिली आहे.
मला सचिवांनी कळवलं नाही, म्हणून मी त्या कागदावर सही केली, असं कारण तुम्ही न्यायालयात दिलं.
म्हणजे तुम्ही उच्च न्यायालयात गुन्हा कबुल केला आहे. गुन्हा कबुल करणे म्हणजे निर्दोष आहे, असं नाही.
स्वत:च्या हुशारीवर महाराष्ट्र चालवण्याची ज्याच्यात ताकद आहे, तोच खरा मुख्यमंत्री असतो.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :-Winter Session -2022 | jitendra awhad on jayant patil statement on vidhansabha speaker rahul narvekar nirlajja comment

 

हे देखील वाचा :

Sania Mirza Divorce | अखेर पाकिस्तानी अभिनेत्री आयेशा ओमर हिने शोएब मलिक सोबतच्या ‘त्या’ फोटो बद्दल केला खुलासा

Ram Kadam | …तोपर्यंत मी माझे केस कापणार नाही – राम कदमांची प्रतिज्ञा

Aaditya Thackeray | दिशा सालियन प्रकरणावरून आदित्य ठाकरेंनी मौन सोडले, म्हणाले ‘8 जूनच्या रात्री…’

 

Related Posts