IMPIMP

Diabetes Symptoms | टाईप 1 आणि टाईप 2 डायबिटीजमध्ये काय आहे अंतर? जाणून घ्या त्याची लक्षणे कशी ओळखावीत

by nagesh
Diabetes Symptoms | know the difference and symptoms between type 1 and type 2 diabetes

सरकारसत्ता ऑनलाइन – Diabetes Symptoms | मधुमेह (Diabetes) हा एक आजार आहे जो खराब जीवनशैली (Bad Lifestyle) आणि खराब खाण्याच्या सवयींमुळे (Wrong Eating Habit) विकसित होतो, ज्यामध्ये मुले, तरुण आणि वृद्ध देखील असुरक्षित असतात. खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयींमुळे तरुण वयातच लोक जीवघेण्या आजारांना बळी पडतात. मधुमेहाचे टाईप 1 मधुमेह आणि टाईप 2 मधुमेह दोन प्रकार आहेत. हे दोन्ही प्रकारचे मधुमेह दिर्घकाळ आहार बिघडल्यामुळे होतात (Diabetes Symptoms).

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

जेव्हा आपल्या शरीरातील स्वादुपिंड इन्सुलिनचे उत्पादन कमी करते किंवा थांबवते, तेव्हा रक्तातील ग्लुकोजची पातळी वेगाने वाढू लागते. रक्तातील वाढलेली साखर नियंत्रणात न राहिल्यास रुग्ण मधुमेहाचा बळी ठरतो (Diabetes Symptoms).

 

टाईप 1 आणि टाईप 2 मधुमेह (Type 1 And Type 2 Diabetes) हे दोन्ही प्रकार आरोग्यासाठी हानिकारक आहेत. या आजाराची लक्षणे त्वरित ओळखली तर हा आजार टाळता येऊ शकतो. या दोन प्रकारच्या मधुमेहामध्ये काय फरक आहे आणि त्यांची लक्षणे कशी ओळखावीत हे जाणून घेऊया.

 

टाईप 1 मधुमेह (Type 1 Diabetes) :
Type 1 मधुमेह हा एक स्वयंप्रतिकार रोग आहे ज्यामध्ये स्वादुपिंड (Pancreas) कार्य करणे थांबवते. ज्यामुळे शरीरात इन्सुलिन (Insulin) तयार होते त्या स्वादुपिंडातील बीटा पेशी खराब होऊ लागतात. त्यांच्या नुकसानीमुळे इन्सुलिन तयार होत नाही आणि रक्तातील साखरेची पातळी झपाट्याने वाढू लागते.

 

टाईप 1 मधुमेह असलेल्या रुग्णांना दररोज इन्सुलिन घेणे आवश्यक असते. बहुतेक प्रकरणांमध्ये, टाईप 1 मधुमेह मुलांना आणि तरुणांना प्रभावित करतो. हा मधुमेह अनुवांशिक (Genetic) आहे, म्हणजेच यामध्ये कौटुंबिक इतिहास महत्त्वाचा आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

टाईप 2 मधुमेह (Type 2 Diabetes) :
Type-2-मधुमेहासाठी लठ्ठपणा, उच्च रक्तदाब (Obesity, High Blood Pressure), खराब जीवनशैली जबाबदार आहे. या मधुमेहामध्ये शरीरातील इन्सुलिनचे उत्पादन कमी होते. कमी इंसुलिन उत्पादनामुळे, रक्तातील पेशी (Blood Cells) या हार्मोनला कमी संवेदनशील बनतात, ज्यामुळे रक्तातील ग्लुकोजची पातळी वाढू लागते.

 

रक्तातील ग्लुकोजची वाढती पातळी नियंत्रणात ठेवता न आल्यास रुग्ण टाईप-2 मधुमेहाचा बळी ठरतो. मध्यमवयीन किंवा वृद्ध लोकांमध्ये हा आजार होण्याची शक्यता जास्त असते, परंतु आता टाइप 2 मधुमेहाचाही झपाट्याने मुले आणि किशोरवयीन मुलांवर परिणाम होत आहे.

 

टाईप 1 आणि टाईप 2 डायबिटीजमध्ये रुग्णामध्ये अशीच लक्षणे दिसतात. त्याची लक्षणे वेळीच ओळखली तर हा आजार टाळता येऊ शकतो, त्याचप्रमाणे या आजाराची गुंतागुंतही कमी करता येते. या दोन प्रकारच्या मधुमेहाची लक्षणे काय आहेत ते जाणून घेऊया.

 

1. खूप तहान लागणे आणि तहान वारंवार लागणे.

2. थकवा, अशक्तपणा आणि चिडचिड.

3. धूसर दृष्टी.

4. जखम भरून येण्यास जास्त वेळ लागतो.

5. वारंवार लघवीला होणे.

6. सतत भूक.

7. वजन कमी होणे.

8. नेहमी थकवा जाणवणे.

9. वारंवार लघवी आणि लघवीमध्ये रक्त येणे.

10. खाज सुटणे किंवा त्वचेची समस्या.

11. डोकेदुखी.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

फक्त आणि फक्त आरोग्याच्या (हेल्थ) बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही. त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं.
अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

Web Title :- Diabetes Symptoms | know the difference and symptoms between type 1 and type 2 diabetes

 

हे देखील वाचा :

Reasons Of Sweating At Night | रात्री जास्त घाम येण्याच्या समस्येने तुम्हीही त्रस्त आहात का? जाणून घ्या काय असतात कारणं

Honey Health Benefits | आयुर्वेदात आरोग्याचा खजिना मानला जातो ‘हे’ औषध, ‘या’ आरोग्य समस्यांवर आहे सोपा घरगुती उपाय

Tata Group Share | टाटा ग्रुपच्या या कंपनीच्या शेअरची कमाल, एक लाख रुपये झाले 54.65 लाख

 

Related Posts