IMPIMP

Honey Health Benefits | आयुर्वेदात आरोग्याचा खजिना मानला जातो ‘हे’ औषध, ‘या’ आरोग्य समस्यांवर आहे सोपा घरगुती उपाय

by nagesh
Honey Benefits | consuming honey is very beneficial in winters know 5 benefits

सरकारसत्ता ऑनलाइन – Honey Health Benefits | आपल्या घरात सहज उपलब्ध असलेल्या अनेक गोष्टी आरोग्यासाठी किती फायदेशीर ठरू शकतात याची आपल्याला काही कल्पना आहे का? मध (Honey) हे असेच एक औषध आहे. मधात विविध प्रकारचे अँटीऑक्सिडंट्स, कॅल्शियम, लोह, मॅग्नेशियम, तांबे, पोटॅशियम, मँगनीज (Antioxidants, Calcium, Iron, Magnesium, Copper, Potassium, Manganese) आणि जस्त सारखे महत्त्वपूर्ण पोषक घटक (Nutrients) असतात. हे सर्व नैसर्गिकरित्या आपला आहार, त्वचा आणि आरोग्य (Diet, Skin And Health) चांगले राखण्यास मदत करतात. म्हणूनच वर्षानुवर्षे अनेक आरोग्य समस्यांवर मध घरगुती उपाय म्हणून वापरले जात आहे (Honey Health Benefits).

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

आयुर्वेदात मधाचे सेवन खूप फायदेशीर असल्याचे सांगण्यात आले आहे. वजन कमी करण्यापासून ते त्वचेत चमक आणण्यापर्यंत प्रत्येक गोष्टीसाठी मधाचा वापर केला जाऊ शकतो. त्यात असलेले नैसर्गिक गुणधर्म (Natural Properties) आपल्या आरोग्यास अनेक प्रकारे फायदेशीर ठरू शकतात (Honey Health Benefits).

 

 

अ‍ॅसिडीटीवर गुणकारी (Effective On Acidity) –
मधात अँटी-बॅक्टेरियल आणि अँटी-फंगल गुणधर्म (Anti-Bacterial And Anti-Fungal Properties) असतात. ते आपल्या गॅस्ट्रोइंटेस्टाइनल सिस्टमला (Gastrointestinal System) चालना देण्यासाठी मदतनीस ठरतात. मधाच्या सेवनाने जंतूसंसर्गामुळे होणारे अपचन आणि पोटदुखीचा त्रास कमी होऊन पचनक्रिया दुरुस्त होण्यास मदत होते. अ‍ॅसिड रिफ्लक्स (Acid Reflux) कमी करण्यासाठीही मधाचा वापर करण्यात आला आहे. यासाठी एक ग्लास कोमट पाण्यात १ चमचा मध मिसळून तुम्हाला फायदे मिळू शकतात.

 

 

जळजळ बरे करण्यासाठी आणि अनेक प्रकारचे संक्रमण रोखण्यासाठी मधाचा वापर केला गेला आहे. कुठे भाजले असल्यास त्या भागावर मध लावल्यास फायदा होऊ शकतो. जळत्या ठिकाणी मधाचा वापर केल्याने कमी वेळात जखमेचे जंतूंपासून संरक्षण होते. जखम लवकर बरी होते. जळत्या भागावर मध लावल्याने त्याचा डागही राहत नाही.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

निद्रानाशाच्या समस्येत लाभदायक (Beneficial In Insomnia Problems) :
झोप न येण्याच्या समस्येमुळे अनेक प्रकारच्या आरोग्याच्या समस्या वाढू शकतात.
ज्या लोकांना कमी झोप येते त्यांना तणाव-चिंता आणि नैराश्य (Stress-Anxiety And Depression) निर्माण होते.
निद्रानाशाची समस्या दूर करण्यासाठी मधाचं सेवन करणं फायदेशीर ठरू शकतं.
झोपण्यापूर्वी गरम दुधात एक चमचा मध टाकून त्याचे सेवन केल्यास चांगली झोप येते.

 

त्वचा आणि केसांसाठी उपयुक्त (Beneficial For Skin And Hair) –
मध देखील आपल्या त्वचेसाठी आणि केसांसाठी खूप फायदेशीर आहे. हे केवळ नैसर्गिक मॉइश्चरायझर म्हणून कार्य करत नाही,
तर हे त्वचेला विविध प्रकारचे फायदे देखील प्रदान करते. कोरडी त्वचा, केसांमधील कोंडा, मुरुम आणि चेहर्‍यावरील डाग
(Dry skin, Dandruff, Pimples And Blemishes On The Face) कमी करण्यासाठी मध वापरणे अत्यंत फायदेशीर ठरू शकते.
केसांसाठी, हे नैसर्गिकरित्या कोंडा कमी करण्यास मदत करते. हेअर पॅक बनवण्यासाठी तुम्ही १ अंड्यात २ चमचे मध मिसळून याचा वापर करू शकता.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

फक्त आणि फक्त आरोग्याच्या (हेल्थ) बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही. त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं.
अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

Web Title :- honey health benefits

 

हे देखील वाचा :

Tata Group Share | टाटा ग्रुपच्या या कंपनीच्या शेअरची कमाल, एक लाख रुपये झाले 54.65 लाख

Madhuri Dixit – Riteish Deshmukh Dance Video | ‘धकधक गर्ल’ सोबत सुपरस्टार रितेश देशमुखनं ‘कच्चा बादाम’वर धरला ठेका, पाहा व्हायरल व्हिडिओ

Chest Pain Causes | केवळ हृदयरोगच नाही, ‘या’ कारणांनीही होऊ शकते छातीत दुखणं

 

Related Posts