IMPIMP

Dilip Walse Patil – Azaan On Loudspeaker | गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी अजान ऐकू येताच केले असे काही; सर्व लोक पाहताच राहीले (Video)

by nagesh
Dilip Walse Patil | maharashtra home minister dilip walse patil order to police take action who create law and order issue

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन – Dilip Walse Patil – Azaan On Loudspeaker | महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या एका वक्तव्यानंतर लाऊडस्पीकरवर अजान (Azaan On Loudspeaker) चा मुद्दा सध्या चर्चेचा विषय झाला आहे. एकीकडे धार्मिक कट्टरतावादी लोक मशिदीवरील (Mosque) लाऊडस्पीकर हटवण्याबाबत बोलत आहेत, तर दुसरीकडे काही लोक लाऊडस्पीकरवरील अजानच्या बाजूने बोलत आहेत. (Dilip Walse Patil – Azaan On Loudspeaker)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

या दरम्यान, महाराष्ट्राचे गृहमंत्री (Maharashtra Home Minister) दिलीप वळसे-पाटील (Dilip Walse Patil) हे पुण्यात (Pune) एका रॅलीला संबोधित करत होते आणि तेव्हा अचानक त्यांच्या कानांना अजानचा आवाज ऐकू आला, यानंतर त्यांनी असे काही केले की, ज्याची सर्वत्र जोरदार चर्चा होत आहे.

 

 

महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांनी काय केले?

महाराष्ट्राचे गृहमंत्री दिलीप वलसे-पाटील सोमवारी पुण्याच्या शिरुरमध्ये एका सभेला संबोधित करत होते. या दरम्यान त्यांना अजानचा अवाज ऐकू आला, ज्यानंतर ते शांत झाले आणि त्यांनी आपले भाषण मधेच थांबवले. अजानसाठी त्यांनी उपस्थित इतर लोकांना सुद्धा शांत राहण्यासाठी इशारा केला. (Dilip Walse Patil – Azaan On Loudspeaker)

 

 

काय म्हणाले होते राज ठाकरे?

नुकतेच राज ठाकरे यांनी एका रॅलीत म्हटले होते की, महाराष्ट्र सरकारने मशिदीवरील लाऊडस्पीकर हटवावेत अन्यथा त्यापेक्षा जास्त आवाजात मशिदीच्या समोर हनुमान चालीसा वाजवली जाईल. त्यांच्या या वक्तव्यानंतर सर्वत्र एकच चर्चा सुरू झाली होती. लाऊडस्पीकरवर अजान देणे योग्य आहे किंवा नाही, या मुद्द्यावर सध्या चर्चा सुरूआहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

महाराष्ट्र सरकारकडे केली ही मागणी

राज ठाकरे यांनी म्हटले होते की, मी प्रार्थनेच्या विरूद्ध नाही, तुम्ही तुमच्या घरात देवाची प्रार्थना करू शकता.
परंतु, सरकारला मशिदींवरील लाऊडस्पीकर हटवण्याचा निर्णय घ्यावा लागेल.
मी सांगतो की, लाऊडस्पीकर हटवा अन्यथा मशिदीच्या समोर लाऊडस्पीकर लावून हनुमान चालीसा वाजवू.

 

 

Web Title : Dilip Walse Patil – Azaan On Loudspeaker | maharashtra home minister dilip walse patil stops his speech midway for azaan in pune watch video

 

हे देखील वाचा :

MNS Corporator Vasant More | राज ठाकरेंच्या आदेशानंतर मनसेच्या पुणे शहराध्यक्षांची मोठी भूमिका; नगरसवेक वसंत मोरे म्हणाले – ‘मला प्रभागात शांतता हवीय’

Stairs Workout | घराच्या पायर्‍यांवर ‘या’ 4 एक्सरसाईजच्या मदतीने सहज कमी करू शकता वजन; जाणून घ्या

When And What To Eat Before And After Exercise | व्यायामापूर्वी आणि नंतर कधी आणि काय खावे? जाणून घ्या वर्कआउट डाएटशी संबंधित माहिती

 

Related Posts