IMPIMP

MNS Corporator Vasant More | राज ठाकरेंच्या आदेशानंतर मनसेच्या पुणे शहराध्यक्षांची मोठी भूमिका; नगरसवेक वसंत मोरे म्हणाले – ‘मला प्रभागात शांतता हवीय’

by nagesh
Vasant More | how can i speak against muslim community vasant more asks mns chief raj thackeray

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन MNS Corporator Vasant More | गुढीपाडव्याच्या निमित्ताने मेळाव्यादरम्यान केलेल्या भाषणामध्ये मनसे (MNS Gudi Padwa Melawa) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी राज्य सरकारवर (Maharashtra State Government) हल्लाबोल केला. त्यानंतर त्यांनी मशीदीच्या समोर भोंगे (Loudspeaker On Masjid) लावल्यास हनुमान चालिसा (Hanuman Chalisa) लावा, असे आदेश दिले. त्यानंतर महाराष्ट्रात चांगलंच वादंग निर्माण झाल्याचे दिसत आहे. यावरुन पुण्याचे मनसे शहराध्यक्ष वसंत मोरे (MNS Corporator Vasant More) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

राज ठाकरे यांनी केलेल्या भाषणानंतर मुंबईच्या कुर्ल्यात मनसे कार्यकर्ते (MNS Activists) मशिदींसमोर हनुमान चालिसा पठन करणार असल्याचं सांगितले जात आहे. तसेच. काही ठिकाणचे भोंगेही उतरवण्याची तयारी सुरू आहे. अनेक भागात मनसे कार्यकर्ते आक्रमक झाल्याचे दिसत आहे. त्यातच पुण्यात मनसे कार्यकर्ते नाराज असल्याचं वातावरण निर्माण झालं आहे. यानंतर शहराध्यक्ष वसंत मोरे (MNS Corporator Vasant More) यांना विचारलं असता ‘माझ्या प्रभागात शांतता हवी असल्याने असं कोणतंही पाऊल उचलणार नसल्याचं,’ त्यांनी म्हटलं आहे.

 

पुढे बोलताना वंसत मोरे म्हणाले, ”आमचे काही कार्यकर्ते उत्साही असतात. राज साहेबांच्या आदेशानंतर त्यांनी हनुमान चालिसा लावली. मात्र मी माझ्या प्रभागात असं काही करणार नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं आहे. सध्या रमजान सुरू आहे. त्यामुळे मला माझ्या प्रभागात शांतता हवी आहे. म्हणून मी हनुमान चालीसा वगैरे काही लावणार नाही.” असं ते म्हणाले.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

दरम्यान, ”राज ठाकरे यांच्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ घेण्यात आल्याचं वंसत मोरे यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.
मशिदीवरील भोंगे काढणार नाही. तर हनुमान चालीसा लावणार, असं राज ठाकरे म्हणाल्याचं त्यांनी सांगितलं.
अनधिकृत गोष्टी असल्यास राज्य सरकारने त्यावर कारवाई करावी, ” असं देखील वंसत मोरे यांनी म्हटलं आहे.

 

 

Web Title :- MNS Corporator Vasant More | mns leader and corporator vasant more opposes raj thackeray decision on hanuman chalisa in pune

 

हे देखील वाचा :

Stairs Workout | घराच्या पायर्‍यांवर ‘या’ 4 एक्सरसाईजच्या मदतीने सहज कमी करू शकता वजन; जाणून घ्या

When And What To Eat Before And After Exercise | व्यायामापूर्वी आणि नंतर कधी आणि काय खावे? जाणून घ्या वर्कआउट डाएटशी संबंधित माहिती

Petrol Diesel Price Hike Pune | 14 दिवसात पेट्रोलच्या किंमतीत 10 रुपयांची वाढ; जाणून घ्या नवे दर

 

Related Posts