IMPIMP

Dinkar Raikar Passes Away | ज्येष्ठ पत्रकार दिनकर रायकर यांचे दीर्घ आजाराने निधन; DTP ऑपरेटरपासून सुरुवात करुन समूह संपादक म्हणून झाले होते निवृत्त

by nagesh
Dinkar Raikar Passes Away | senior journalist dinkar raikar passes away in mumbai

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन टीम – Dinkar Raikar Passes Away | गेली ५० वर्षांहून अधिक काळ पत्रकारितेत सक्रिय असलेले ज्येष्ठ पत्रकार दिनकर रायकर Dinkar Raikar (वय ७९) यांचे शुक्रवारी पहाटे निधन झाले. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते. त्यांच्या पश्वात पत्नी, मुलगा व मुलगी असा परिवार आहे. दिनकर रायकर यांना डेंग्यु आणि कोरोनाची लागण झाली होती. डेंग्यु बरा झाला.  लंग्ज इन्फेक्शन अधिक असल्याने त्यांच्यावर नानावटी हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात येत होते. मात्र, त्यांचे शरीर उपचारांना साथ देत नव्हते. गुरुवारी रात्री त्यांची पीसीआर टेस्ट निगेटिव्ह आली होती. मात्र, पहाटेपासून त्यांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागला व पहाटे ३ वाजता त्यांचे निधन झाले. (Dinkar Raikar Passes Away)

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

दिनकर रायकर यांनी इंडियन एक्सप्रेसमधून पत्रकारितेला सुरुवात केली होती. मुंबईत राहण्यासाठी घर नसल्याने ते इंडियन एक्सप्रेसच्या कार्यालयातच राहत होते. डीटीपी  ऑपरेटर, वार्ताहर, उपसंपादक असा यशस्वी प्रवास त्यांनी एक्सप्रेस समुहात केला. लोकसत्तामधून निवृत्त झाल्यावर त्यांनी लोकमत समूहामध्ये संपादकपदाची (Dinkar Raikar Lokmat) जबाबदारी स्वीकारली होती. गेली काही वर्षे ते लोकमतमध्ये समूह संपादक म्हणून जबाबदारी सांभाळली. राजकीय व्यक्तींवर खुशखुशीत शैलीत चिमटा काढण्यात त्यांचा हातखंडा होता.

दिनकर रायकर (Dinkar Raikar Passes Away) यांना मंत्रालय आणि विधीमंडळ वार्ताहर म्हणून अनेक वर्षे काम पाहिले. त्यामुळे राज्यभरातील सर्व राजकीय नेत्यांशी त्यांचा जवळून परिचय होता. मंत्रालय आणि विधीमंडळ वार्ताहर संघ तसेच मुंबई प्रेस क्लबचे ते माजी अध्यक्ष होते. महाराष्ट्र शासनाचा जीवन गौरव पत्रकारिता पुरस्कार, पुढारीकार ग. गो. जाधव, पुरस्कार, सुशीलादेवी देशमुख पत्रकारिता पुरस्कार, मंत्रालय आणि विधीमंडळ वार्ताहर संघाच्या कृ. पां. सामक जीवनगौरव पुरस्कार अशा विविध पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले होते.

Web Title : Dinkar Raikar Passes Away | senior journalist dinkar raikar passes away in mumbai

हे देखील वाचा :

Pune Corporation | पुण्यातील धनकवडी ट्रक टर्मिनन्सच्या जागेवर ‘ट्वीन टॉवर्स’ ! ‘एका माननीयांनी’ तयार करून घेतलेल्या आराखड्याचे प्रशासनाने केले सादरीकरण

Multibagger Penny Stock | दोन रुपयांचा शेयर झाला 178 रुपयांचा, 1 लाख झाले 73 लाख, तुमच्याकडे आहे का हा स्टॉक?

Tata Group Best Stock | टाटा समूहातील ‘हा’ सर्वोत्तम स्टॉक; गुंतवणूकदारांचं बनलाय आकर्षण; जाणून घ्या

Related Posts