IMPIMP

Dombivli Crime | बँक कर्मचाऱ्यानेच केली बँकेत चोरी, अखेर शेवटी आरोपीला पकडण्यात पोलिसांना यश

by nagesh
Pune Crime | Women's jewelry looted on the pretext of sari distribution; Incident at Lal Mahal Chowk

डोंबिवली : सरकारसत्ता ऑनलाइन Dombivli Crime | आयसीआयसीआय बँकेच्या (ICICI Bank) ठाण्यातील मानपाडा भागातील शाखेतून 12 कोटींची रोकड लुटणाऱ्या मुख्य आरोपीला मानपाडा पोलिसांनी (Maanpada Police) अटक केली आहे. या प्रकरणी पोलिसांनी इसरार कुरेशी (Israr Qureshi), अहमद खान (Ahmed Khan) आणि अनुज गिरी (Anuj Giri) या तिघांना अटक केली होती. या टोळीचा मुख्य बँक कस्टोडियन अल्ताफ शेखसह (Altaf Sheikh) त्याची बहिण निलोफरला अटक करण्यात आली आहे. (Dombivli Crime)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

काय आहे संपूर्ण प्रकरण?

जुलै महिन्यात डोंबिवली एमआयडीसी (Dombiwali MIDC) परिसरात असलेल्या आयसीआयसीआय बँकेतून बारा कोटींची रक्कम चोरी झाल्याची घटना उघडकीस आली होती. एका मोठ्या बँकेतून इतकी मोठी रोकड चोरी झाल्याने एकच खळबळ उडाली होती. याप्रकरणी मानपाडा पोलिसांनी गुन्हा दाखल करून कसून तपास सुरु केला. यानंतर धक्कादायक माहिती समोर आली. या बँकेत काम करणाऱ्या कॅश मॅनेजर अल्ताफ शेख याने आपल्या काही साथीदारांसह ही रक्कम चोरली असल्याचे तपासात समोर आले. यानंतर पोलीस या टोळीच्या मागे लागले. या प्रकरणात पोलिसांनी इसरार कुरेशी, अहमद खान आणि अनुज गिरी या तिघांना ऑगस्टमध्ये अटक केली मात्र अल्ताफ पोलिसांच्या तावडीत सापडत नव्हता. तो सतत पोलिसांना चकमा देत होता. अखेर शेवटी त्याला पकडण्यात मानपाडा पोलिसांना यश आले.

 

 

कसा आखला प्लॅन?

अल्ताफ शेख याने मनी हाईस्ट (Money Heist) ही वेब सीरिज पाहून त्याला चोरीची कल्पना सुचली. त्याने झटपट श्रीमंत होण्याचा नादात स्वतः काम करत असलेल्या बँकेत चोरीचा प्लॅन आखला. तो कॅश कस्टोडियन मॅनेजर असल्याने त्याला बँकेची सगळी माहिती होती. बँकेच्या सुरक्षा यंत्रणेमध्ये असलेली कमतरता त्याने हेरली. यानंतर त्याने हि चोरी यशस्वी करण्यासाठी इसरार कुरेशी, अहमद खान आणि अनुज गिरी यांची मदत घेतली. त्याने अगोदर सुरक्षा यंत्रणेतील त्रुटींचा अभ्यास केला आणि नंतर चोरीसाठी लागणारे साहित्य गोळा केले. यानंतर त्याने बँकेतील तिजोरी रूमच्या बाजूला असलेल्या एसी दुरुस्तीचे काम सुरू असलेले पहिले आणि हीच संधी साधून बँकेत चोरी केली. (Dombivli Crime)

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

कशा प्रकारे केली चोरी ?

9 जुलैला सुट्टीच्या दिवशी बँकेचे अलार्म निष्क्रिय करत सर्व कॅमेऱ्यांच्या हार्ड डिस्क काढून आरोपीने तिजोरीतून 34 कोटी रुपये लंपास केले.
हे पैसे त्याने एसीच्या डक्टमधील छिद्रातून बँकेच्या इमारतीच्या मागील बाजूस बांधलेल्या ताडपत्रीवर फेकून दिले.
यानंतर बँकेतील सीसीटीव्हीचा डीव्हीआर गहाळ असल्याची माहिती बँकेच्या वरिष्ठांना देऊन तिजोरीतील रक्कम तपासणी करण्यासाठी पथक बँकेत बोलावले. हे पथक तपासणी करत असताना आरोपी अल्ताफ शेख याने कुरेशी, अहमद खान आणि अनुज गिरी नावाच्या तीन मित्रांना बोलवून 34 कोटींपैकी सुमारे 12 कोटी त्यांच्याकडे सोपवले आणि ते सगळे पसार झाले. अखेर शेवटी हा गुंता सोडवण्यात पोलिसांना यश आले.

 

Web Title :- Dombivli Crime | thrill of money heist web series bank employee looted 34 crore

 

हे देखील वाचा :

Tukaram Mundhe | तुकाराम मुंढेंचा पदभार स्वीकारताच धडाका, रुग्णालयात रात्री डॉक्टर नसल्यास थेट निलंबन, धाडसत्र सुरु

Devendra Fadnavis | पोलीस दल हे इंग्रज काळातील नाही, जनतेचे सेवक म्हणून काम करा; गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा पोलिसांना सल्ला

Deepak Kesarkar | उद्धव ठाकरेंच्या प्रत्येक प्रश्नाची उत्तरे देणार – दीपक केसरकर

 

Related Posts