IMPIMP

Devendra Fadnavis | पोलीस दल हे इंग्रज काळातील नाही, जनतेचे सेवक म्हणून काम करा; गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा पोलिसांना सल्ला

by nagesh
Devendra Fadnavis | the public should be made servants of the people through people oriented work the police should give justice to every citizen devendra fadanvis

अकोला : सरकारसत्ता ऑनलाइनराज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या हस्ते अकोला पोलीस दलाच्या नवीन पोलीस अधीक्षक कार्यालयाचे आज (शुक्रवार) लोकार्पण (Inauguration) करण्यात आले. यावेळी बोलताना देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले, अकोला पोलीस दलाला (Akola Police Force) सुसज्ज आणि भव्य दिव्य पोलीस अधीक्षक कार्यालय (SP Office) मिळाले आहे. या कार्यालयातून पारदर्शी कारभार व्हावा. लोकाभिमुख पद्धतीने काम करीत, जनतेचे सेवक म्हणून पोलिसांनी काम करावे. संविधानाने (Constitution) दिलेल्या कायद्याचे रक्षण करुन कार्यालयात येणाऱ्या प्रत्येक नागरिकाला न्याय मिळावा. तरच या नव्या इमारतीची भव्यता व दिव्यता वाढेल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून आमदार गोवर्धन शर्मा (MLA Govardhan Sharm), आमदार रणधीर सावरकर (MLA Randhir Savarkar), माजी गृह राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील (Dr. Ranjit Patil), आमदार प्रकाश पाटील भारसाकळे (MLA Prakash Patil Bharsakale), आमदार हरीश पिंपळे (MLA Harish Pimple), आमदार वसंत खंडेलवाल (MLA Vasant Khandelwal), शिक्षक आमदार ॲड. किरण सरनाईक (Teacher MLA Adv. Kiran Sarnaik), माजी आमदार बळीराम सिरस्कार (Former MLA Baliram Sirskar), माजी महापौर अर्चना मसने (Former mayor Archana Masne), अमरावती परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरीक्षक चंद्रकिशोर मीणा (Deputy Inspector General of Police Chandrakishore Meena), जिल्हाधिकारी निमा अरोरा (Collector Nima Arora), मनपा आयुक्त कविता द्विवेदी (Municipal Commissioner Kavita Dwivedi), पोलीस अधीक्षक जी. श्रीधर (SP G. Sridhar), अपर पोलीस अधीक्षक मोनिका राऊत
(Addl SP Monica Raut), पोलीस उपअधीक्षक रितु खोकर (DYSP Ritu Khokar), आर्कीटेक्ट सोहेल खान (Architect Sohail Khan) आदी उपस्थित होते.

 

देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले, मुख्यमंत्री असताना मी अकोल्यातील नवीन पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या इमारतीचा प्रस्ताव मंजूर केला.
आता या नवीन इमारतीमधून पारदर्शी कारभारासोबतच कायदा व सुव्यवस्था (Law and Order)
आणि नागिरकांच्या अधिकारांचे रक्षण होऊन त्यांना न्याय मिळणे अपेक्षित आहे.
आताचे पोलीस दल हे इंग्रजकाळातील नाहीत.
जनतेचे सेवक म्हणून त्यांनी काम करावं आणि कामाची पद्धत लोकाभिमुख करावी,
असा सल्लाही त्यांनी पोलिसांना दिला.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Devendra Fadnavis | the public should be made servants of the people through people oriented work the police should give justice to every citizen devendra fadanvis

 

हे देखील वाचा :

Deepak Kesarkar | उद्धव ठाकरेंच्या प्रत्येक प्रश्नाची उत्तरे देणार – दीपक केसरकर

T-20 World Cup | रोहित शर्माने ‘या’ दिग्गज क्रिकेटरचा सल्ला ऐकला तर टीम इंडियाची कामगिरी उंचावेल

Chandrakant Patil | ‘आमचा उत्स्फुर्त उठाव होता’ चंद्रकांत पाटलांच्या दाव्याला शिंदे गटाच्या मंत्र्याचे प्रत्युत्तर

 

Related Posts