IMPIMP

Deepak Kesarkar | उद्धव ठाकरेंच्या प्रत्येक प्रश्नाची उत्तरे देणार – दीपक केसरकर

by nagesh
Deepak Kesarkar | The recruitment process of Scheduled Tribes category will be implemented in a time-bound manner, informed Deepak Kesarkar in the Legislative Council

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन  उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्याबद्दल आम्हाला आदर आहे मात्र ते दसरा मेळाव्यात (Dasara Melava 2022) शिवतीर्थावर जे काही बोलले त्यामुळे मी प्रचंड अस्वस्थ झालो. मात्र उद्धव ठाकरेंनी आमच्याबाबत जे काही प्रश्न उपस्थित केले त्या सर्व प्रश्नांची उत्तरे देणे शिंदे गटाचा (Shinde Group) प्रवक्ता म्हणून माझी जबाबदारी असल्याचे दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी सांगितले. तसेच याबाबत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करून दोन दिवसात पत्रकार परिषद घेऊन ठाकरे यांच्या सर्व प्रश्नांची उत्तरे दिली जातील असे दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी सांगितले.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

दीपक केसरकर (Deepak Kesarkar) आज पुण्यातील डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या (Deccan Education Society) न्यू इंग्लिश स्कूल रमणबाग (New English School Ramanbaug) येथील अमृत महोत्सवी सांगता समारंभासाठी आले होते. कार्यक्रमानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते. यावेळी त्यांनी शिक्षक भरती (Teacher Recruitment) लगेच होणार नसल्याचे सूतोवाच केले.

 

 

मुलांची शिष्यवृती वाढवणे महत्त्वाचे

 

सध्या राज्यभरात अनेक शिक्षक अतिरिक्त आहेत त्यांची संपूर्ण माहिती घेऊन त्या शिक्षकांचे समायोजन आधी केले जाईल त्यानंतरच शिक्षक भरती होऊ शकेल. या प्रकारामुळे अतिरिक्त शिक्षकांना न्याय मिळेल याशिवाय त्यातून वाचलेल्या पैशातून मुलांना शिष्यवृत्ती (Scholarship)वाढविता येईल. त्यामुळे केवळ शिक्षकांचा वेतन हाच प्रश्न महत्त्वाचा नाही तर इतर गोष्टीही महत्वाच्या आहेत अशी माहिती दिपक केसरकर यांनी दिली.

 

 

तिसरीपासून परीक्षा घेण्याचा प्रयत्न

 

शालेय स्तरावर शिक्षण आणि क्रीडा हे दोन्ही विषय भविष्यात सोबत असतील,
व्यावसायिक शिक्षणावरही भर देण्यात येत आहे,
ई-लर्निंग सुविधा राज्यातील प्रत्येक भागात पोहोचविण्याचा प्रयत्न आहे,
नवे शैक्षणिक धोरण राबविण्यासाठी आवश्यक साधने पुढील वर्षापर्यंत शाळेत उपलब्ध होतील,
तिसरीपासून परीक्षा घेण्याबाबतही तज्ज्ञांशी चर्चा सुरू आहे, गृहपाठ स्वयंस्फूर्तीने करायचा अभ्यास आहे,
शिक्षकांनी विद्यार्थ्यांना गृहपाठची आवश्यकता भासू नये किंवा खाजगी क्लासची गरज भासू नये असे शिक्षण द्यावे असेही त्यांनी सांगितले.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

20 पेक्षा कमी पट संख्या बंद करण्याआधी…

 

20 पेक्षा कमी पट संख्या असलेल्या शाळा बंद करण्याआधी तेथील विद्यार्थी आणि अतिरिक्त शिक्षक यांची माहिती घेतली जाईल त्यानंतरच तेथील शाळा बंद करण्याचा निर्णय होईल.
विद्यार्थ्यांनी अमूक एका ठिकाणी शिक्षण घेतले तरच त्यांची गुणवत्ता वाढते असे नाही त्यामुळे त्यांच्या शाळा बंद झाल्या तरी आसपासच्या शाळेत त्यांचे समायोजन होईल,
त्यांना शाळा लांब पडत असेल तर त्यांच्यासाठी बसची सोय केली जाईल.
कमी मुलांमध्ये शिकण्यापेक्षा मोठ्या गटात शिक्षण घेतले तर मुलांचा सर्वांगिण विकास होतो त्यांच्या नेतृत्वगुणाला ते पोषक असल्याचे दीपक केसरकर म्हणाले.

 

 

Web Title :- Deepak Kesarkar | deepak kesarkar said childrens scholarships should be increased more than teachers salaries

 

हे देखील वाचा :

T-20 World Cup | रोहित शर्माने ‘या’ दिग्गज क्रिकेटरचा सल्ला ऐकला तर टीम इंडियाची कामगिरी उंचावेल

MNS | उद्धव ठाकरेंकडून दीड वर्षीय बाळाचा उल्लेख, मनसेनं करुन दिली बाळासाहेबांची आठवण

Chandrakant Patil | ‘आमचा उत्स्फुर्त उठाव होता’ चंद्रकांत पाटलांच्या दाव्याला शिंदे गटाच्या मंत्र्याचे प्रत्युत्तर

Shanikrupa Heartcare Centre | संकल्प निरोगी हृदयाचा..!, शनिकृपा हार्टकेअर मधील योग्य तपासणीमुळे जीवन होईल सुरक्षित

 

Related Posts