IMPIMP

DPDC Meeting Pune | पुणे जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत निर्णय ! 793 कोटी 86 लक्ष रुपयांच्या प्रारुप आराखड्यास मान्यता

by nagesh
Ajit Pawar | bjp mp sujay vikhe patil allegation on ajit pawar controversial statement about chhatrapati sambhajiraje

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन DPDC Meeting Pune | उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार (Ajit Pawar) आज पुण्यात होते. पवार यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समितीच्या (District Planning and Development Council Committee Meeting) बैठकीत प्रारुप आराखड्यास मान्यता देण्यात आली आहे. त्यामध्ये पुणे जिल्ह्यासाठी सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत 2022-23 मध्ये 619 कोटी 10 लक्ष रुपये, अनुसूचित जाती योजनेअंतर्गत 128 कोटी 93 लक्ष रुपये आणि आदिवासी उपयोजनेअंतर्गत 45 कोटी 83 लक्ष रुपये असे एकूण 793 कोटी 86 लक्ष रुपयांच्या प्रारुप आराखड्यास (Draft outline) मंजुरी दिली आहे. (DPDC Meeting Pune)

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page  for every update

 

 

 

कृषि व संलग्न सेवेसाठी (Agriculture and allied services) 54 कोटी 18 लक्ष, ग्रामीण विकास 80 कोटी, पाटबंधारे व पूर नियंत्रण 33 कोटी 6 लक्ष, ऊर्जा विकास 51 कोटी 19 लक्ष, उद्योग व खाणकाम 1 कोटी 17 लक्ष, परिवहन 113 कोटी, सामान्य आर्थिक सेवा 16 कोटी 28 लक्ष, सामाजिक सामुहिक सेवा 210 कोटी 56 लक्ष, सामान्य सेवा 28 कोटी 69 लक्ष आणि नाविन्यपूर्ण योजनेसाठी 30 कोटी 95 लक्ष रुपयांचा खर्च सर्वसाधारण योजनेअंतर्गत (General plan) प्रस्तावित केला गेला आहे. (DPDC Meeting Pune)

 

कृषि व संलग्न सेवेसाठी 4 कोटी 40 लक्ष, ऊर्जा विकास 7 कोटी, उद्योग व खाणकाम 34 लक्ष, परिवहन 30 कोटी, सामाजिक सामुहिक सेवा 83 कोटी 31 लक्ष आणि नाविन्यपूर्ण योजनेसाठी 3 कोटी 86 लक्ष रुपयांचा नियतव्यय प्रस्तावित करण्यात आला आहे. आदिवासी उपयोजनेअंतर्गत (Tribal sub-plan) कृषि व संलग्न सेवेसाठी 6 कोटी 27 लक्ष, ग्रामीण विकास 4 कोटी 85 लक्ष, पाटबंधारे व पूर नियंत्रण 3 कोटी 40 लक्ष, ऊर्जा विकास 2 कोटी 96 लक्ष, उद्योग व खाणकाम 3 लक्ष, परिवहन 6 कोटी 42 लक्ष, सामाजिक सामुहिक सेवा 20 कोटी 75 लक्ष आणि नाविन्यपूर्ण योजनेसाठी 1 कोटी 15 लक्ष रुपयांचा खर्च अनुसूचित जाती योजनेअंतर्गत (Scheduled Caste Scheme) प्रस्तावित केला आहे.

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page  for every update

 

 

 

या दरम्यान, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख (Collector Dr. Rajesh Deshmukh) यांनी दिलेल्या माहितीनूसार, सर्वसाधारण योजनेअंतर्गत 2021-22 या वर्षात 286 कोटी 8 लक्ष (41.16 टक्के), अनुसूचित जाती योजनेअंतर्गत 25 कोटी 89 लक्ष (20.08 टक्के) आणि आदिवासी उपयोजनेअंतर्गत 6 कोटी 93 लक्ष (15.61 टक्के) निधी खर्च झाला आहे. मार्च अखेर शंभर टक्के निधी खर्च करण्याचे नियेाजन आहे.

 

जिल्ह्यातील जलजीवन कामांचे सर्वेक्षण वेगाने करून या कामांना गती देण्याच्या सूचना अजित पवार (Ajit Pawar) यांनी यावेळी दिल्या आहे.
तसेच, पर्यटन विकासांतर्गत अष्टविनायक पर्यटन विकासासाठी राज्यस्तरावरूनही प्रयत्न केले जातेय, तर, पर्यटकांना सुविधा होईल आणि पर्यटक आकर्षित होतील
असे काम होणे अपेक्षित आहे. शहरी भागात नाल्यांवरील अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्याच्या आणि पाणंद रस्त्यासाठी निधी वाढविण्याच्या सूचनाही
अजित पवार यांनी दिल्या आहेत. District Planning and Development Council (DPDC).

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page  for every update

 

 

 

Web Title :- DPDC Meeting Pune | ajit pawar meeting pune district planning committee draft plan 793 crore was approved

 

हे देखील वाचा :

PMMY Scheme | 50 हजारपर्यंत मुद्रा लोन घेणार्‍यांसाठी महत्वाची बातमी, 15 डिसेंबरपर्यंतच मिळेल विशेष सूट

Online University of Maharashtra | महाराष्ट्रात ‘ऑनलाइन विद्यापीठ’ स्थापन करण्याचा विचार

Malaika Arora | 48 व्या वर्षी लेपर्ड प्रिंट ब्रालेट-स्कर्ट परिधान करुन मलायकाने वाढवला इंटरनेटवर पारा, चाहते म्हणाले – ‘वय होत चाललंय…’

 

Related Posts