IMPIMP

Online University of Maharashtra | महाराष्ट्रात ‘ऑनलाइन विद्यापीठ’ स्थापन करण्याचा विचार

by nagesh
Online University of Maharashtra | first online universities maharashtra education pune news

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन Online University of Maharashtra | मागील दोन वर्षापासून कोरोनाच्या महामारीमुळे राज्यातील सर्वच शिक्षण ऑनलाइन (Online teaching) झालं. कोरोनाच्या धास्तीने शाळा, महाविद्यालये, विद्यापीठे बंद करण्यात (Online University of Maharashtra) आली होती. दरम्यान सध्या कोरोनाची परिस्थिती आटोक्यात आल्याने कोरोना नियम पाळून शाळा, महाविद्यालये सुरु करण्यास राज्य सरकारने (Maharashtra Government) परवानगी दिली. सर्व महाविद्यालयात कोरोनावरील डोसही बंधणकारक करण्यात आले आहे. कोरोनाच्या परिस्थितीमुळे आता ऑनलाइन विद्यापीठ स्थापन करण्याचा विचार राज्य सरकारकडून सुरु आहे.

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page  for every update

 

 

 

या पार्श्वभुमीवर परिपूर्ण अभ्यास करण्यासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे (Savitribai Phule Pune University) माजी कुलगुरू डॉ. आर. के. शेगावकर (Dr. R. K. Shegavkar) यांच्या अध्यक्षतेखाली समिती (Committee) स्थापन करण्यात आली आहे. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये (New National Education Policy) ऑनलाइन शिक्षणाचा विचार केला आहे. यानूसार आता महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना त्या पद्धतीचे शिक्षण देण्यासाठी काय करावे, यासंंदर्भात अहवालही समिती देणार आहे.

 

ज्या विद्यार्थ्यांना महाविद्यालय किंवा विद्यापीठात (Online University of Maharashtra) प्रत्यक्ष उपस्थित राहून शिक्षण घेणे शक्य नाही, या विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन विद्यापीठाच्या स्थापनेमुळे प्रत्यक्ष उपस्थित राहण्याची आवश्यकता नसणार आहे. तसेच, विद्यापीठ शुल्काशिवाय निवासव्यवस्था, प्रवास आदी बाबींचा जास्तीचा खर्च विद्यार्थ्यांना भरावा लागणार नाही. ऑनलाइन शिक्षण घेण्याची इच्छा असणा-या विद्यार्थ्यांना हे शिक्षण आर्थिकबाबींच्या दृष्टीकोनातून सोयीचे असणार आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page  for every update

 

 

 

दरम्यान, स्थापन करण्यात आलेल्या या समितीमध्ये पुणे इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटचे अध्यक्ष रमान प्रीत (Raman Preet),
वाडिया इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज अँड रीसर्चचे संचालक आनंदराव दादास (Anandrao Dadas),
पुणे इन्स्टिट्यूट ऑफ बिझनेस मॅनेजमेंट विभाग प्रमुख डॉ. मनीष गोडसे (Dr. Manish Godse),
अमेरिकेतील कॅलिफोर्निया यूनिवर्सिटीचे अधिष्ठाता अंगप्पा गुनासेकरण (Angappa Gunasekar),
नागपूरचे आय. आय. एम.चे संचालक भीमराय मेत्री, (Bhimrai Metri)
मुंबई विद्यापीठाचे IT विभागाचे प्रमुख श्रीवरमंगई रामानुजम (Srivarmangai Ramanujam),
तंत्रशिक्षण संचालनालयाचे संचालक यांचा सदस्य म्हणून समावेश केला आहे. तसेच, या समितीला रिपोर्ट सुपुर्द करण्यासाठी 6 महिन्यांची मुदत दिली आहे.

 

Web Title :- Online University of Maharashtra | first online universities maharashtra education pune news

 

हे देखील वाचा :

Malaika Arora | 48 व्या वर्षी लेपर्ड प्रिंट ब्रालेट-स्कर्ट परिधान करुन मलायकाने वाढवला इंटरनेटवर पारा, चाहते म्हणाले – ‘वय होत चाललंय…’

Kirit Somaiya | ‘अनिल परबांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा’ – किरीट सोमय्या

Nawab Malik | ‘…बिनशर्त माफी मागतो’, नवाब मलिक यांचे वानखेडे प्रकरणात उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर

 

Related Posts