IMPIMP

Dr Neelam Gorhe | टायर कंपन्यांकडून राज्यातील ग्राहकांची फसवणूक होत असल्याने राज्य ग्राहक मंच यांनी ‘स्वाधीकारे’ चौकशी करण्याची उपसभापती ना.डॉ.नीलम गोऱ्हे यांची सूचना

by nagesh
Dr Neelam Gorhe | State Consumer Forum-Deputy Speaker Dr. Neelam Gorhe News

मुंबई/पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन Dr Neelam Gorhe | टायर कंपन्यांकडून ग्राहकांची फसवणूक होत असल्याबाबत प्रतियोगिता आयोगाने टायर उत्पादकांनी कमी झालेल्या कच्च्या मालाच्या किंमतीचा लाभ ग्राहकाना न देता, ग्राहकांची फसवणूक केल्याप्रकरणी टायर उत्पादकांच्या विरुद्ध दंडात्मक कार्यवाही केली आहे. याबाबत सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) प्रतियोगिता आयोगाने केलेली कारवाई योग्य ठरविली आहे. (Dr Neelam Gorhe)

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

महाराष्ट्र राज्यातील अनेक ग्राहकांनी या कंपन्यांकडून टायर्स खरेदी केले असून त्यांची आर्थिक फसवणूक झाली आहे. सदर प्रकरणी राज्यस्तरीय ग्राहक मंच द्वारे स्वाधीकारे चौकशी (Suo Moto Enquiry) करण्यात यावी अशी सूचना महाराष्ट्र विधानपरिषद उपसभापती ना.डॉ.नीलम गोऱ्हे (Dr Neelam Gorhe) राज्य ग्राहक मंच (State Consumer Forum Maharashtra) यांना केली आहे.

 

 

ग्राहकांचा तपशील आयुक्त, वस्तु व सेवा कर माझगांव, मुंबई (GST Commissioner Mazgaon, Mumbai) यांचेकडून घेण्यात यावा असे देखील आवाहन डॉ.गोऱ्हे यांनी केले आहे. या कालावधीतील सर्व ग्राहकांना या टायर साठी वाढीव किंमत द्यावी लागली आहे. यामुळे सर्व टायर्स कंपन्यांकडुन ग्राहकांना नुकसान भरपाई (Compensation) मिळावी यासाठी योग्य ती कार्यवाही करण्याची विनंती राज्य अध्यक्ष ग्राहक मंच यांना लेखी पत्राद्वारे डॉ.गोऱ्हे यांनी केली आहे.

 

 

Web Title :- Dr Neelam Gorhe | State Consumer Forum-Deputy Speaker Dr. Neelam Gorhe News

 

हे देखील वाचा :

Pune Crime | पुण्यात 17 वर्षाच्या मुलीचा गळा दाबून चाकूने पाठीत, छातीवर, पोटावर व पायावर सपासप वार; चंदननगर परिसरातील घटनेने प्रचंड खळबळ

Pune School Update | ‘पुण्यात पहिली ते आठवीचे वर्ग आता पूर्ण वेळ भरणार’ – अजित पवार (व्हिडीओ)

Sanjeevani Raikar | संजीवनी रायकर यांचे निधन; 3 वेळा होत्या शिक्षक आमदार

 

Related Posts