IMPIMP

Pune School Update | ‘पुण्यात पहिली ते आठवीचे वर्ग आता पूर्ण वेळ भरणार’ – अजित पवार (व्हिडीओ)

by nagesh
Ajit Pawar | ajit pawar on coronavirus in pune

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन Pune School Update | मागील काही दिवसांपासून पुण्यातील कोरोना बाधितांची (Coronavirus) वाढणारी संख्या
आता कमी होऊ लागली आहे. त्यामुळे लावलेले निर्बंध देखील शिथिल करण्यात आले आहे. त्याचबरोबर पुण्यातील शाळा, महाविद्यालये (Schools,
Colleges) 1 फेब्रुवारीपासून सुरू करण्यात आल्या आहेत. तर, 1 ली ते 8 वीचे वर्ग (1st to 8th Class) चार तासच सुरू ठेवण्यात आले होते. आता पहिली ते आठवीचे वर्ग हे पूर्ण वेळ भरणार (Pune School Update) आहेत. याबाबत माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी दिली.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

पहिली ते आठवीचे वर्ग हे पूर्ण वेळ भरणार असल्याचा निर्णय पुण्यातील (Pune News) कोरोना स्थितीच्या आढावा बैठकीत घेण्यात आला आहे. यावेळी बोलताना अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले, ”1 फेब्रुवारीपासून पुण्यातील शाळा सुरू केल्या. पहिली ते आठवीचे वर्ग अर्ध वेळ भरवण्यात येत होत्या. पण आता पहिली ते आठवीचे वर्ग पण पूर्णवेळ भरवण्याचा निर्णय घेतला आहे.” (Pune School Update)

 

 

 

कोरोना परिस्थितीबाबत बोलताना अजित पवार म्हणाले, ”जागतिक परिस्थिती पाहता नव्या रुग्णसंख्येत घट झाली आहे. पण दैनंदिन कोविड मृतकांच्या संख्येत वाढ झाली आहे. या मागचं नक्की कारण डॉक्टरांकडून शोधण्याचं काम सुरू आहे. फ्रान्स आणि अमेरिकेत नव्या रुग्णसंख्येत घट होतेय, जर्मनीत वाढ होतेय तर आपल्या देशात गेल्या आठवड्याच्या तुलनेत कोरोना रुग्णसंख्येत 30 टक्क्यांनी घट झालीय. पुण्याच्या बाबतीत बोलायचं झालं तर, पुणे जिल्ह्यातील सक्रिय रुग्णसंख्येत 50 टक्क्यांनी घट झाली असल्याचं ते म्हणाले.”

Web Title :- Pune School Update | pune school class 1 to 8 standard will start full day said ncp leader and dycm ajit pawar

 

हे देखील वाचा :

Sanjeevani Raikar | संजीवनी रायकर यांचे निधन; 3 वेळा होत्या शिक्षक आमदार

Lata Mangeshkar Health Update | लता मंगेशकर यांची प्रकृती पुन्हा बिघडली, व्हेंटिलेटरवर हलवले; डॉक्टरांनी दिली माहिती

Pune Crime | कोरेगाव पार्क पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या फसवणूक प्रकरणी अलनेश सोमजीचा जामीन फेटाळला

Pune Smart City Project | स्मार्ट सिटीच्या बेफिकिरी मुळे नागरिकांना भुर्दंड! सत्ताधारी भाजप नगरसेविकेचा घरचा आहेर

 

Related Posts