IMPIMP

Entertainment News | 2022 मध्ये ‘या’ बॉलिवूड कलाकारांनी संपवलं त्यांचं नातं

by nagesh
Entertainment News | bollywood celebs who divorce in 2022 sohail khan to aaishwarya rajinikant and dhanush

सरकारसत्ता ऑनलाईन  – Entertainment News | यंदाच्या वर्षी बॉलिवूडमध्ये अनेक कलाकार लग्न बंधनात अडकत आहेत, तर अनेकांनी या नात्याला पूर्णविरामदेखील दिला आहे. चला तर आज जाणून घेऊया अशाच काही बॉलिवूड जोडप्यांबद्दल. (Entertainment News)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

अभिनेता राजीव सेन आणि चारू असोपा

यांच्या लग्नानंतर ही जोडी खूपच चर्चेत होती. मात्र, काही वर्षांनी त्यांनी या नात्याला पूर्णविराम देण्याचा विचार केला. या चर्चा चालू असताना त्यांनी त्यांच्या लग्नाला दुसरा चान्स देण्यासाठी एकत्र आले, पण त्यावेळीही अनेक आरोप-प्रत्यारोप पाहायला मिळाले. (Entertainment News)

 

 

गायक हनी सिंह

गायक हनी सिंहचादेखील या यादीत समाविष्ट आहे. हनी सिंहच्या बायकोने शालिनीनं हनी सिंहवर गंभीर आरोप केले होते. याच वर्षी दोघांनी घटस्फोट घेतला असून, हनी सिंह याने बायकोला एक करोड रुपयांची पोटगी दिल्याचे बोलले जात आहे.

 

 

ऐश्वर्या आणि अभिनेता धनुष

या यादीत सुपरस्टार रजनीकांत यांची लेख ऐश्वर्या आणि अभिनेता धनुष यांचाही समावेश आहे. या दोघांनी 2022 मध्ये त्यांचे नाते संपवले आहे, तर जानेवारीमध्ये त्यांनी घटस्फोट घेतला आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

अभिनेता नीतेश भारद्वाज आणि स्मिता गेट

 

महाभारत फेम म्हणून ज्यांची ओळख आहे असा मराठमोळा अभिनेता नीतेश भारद्वाज यांनीही पत्नी स्मिता गेटपासून घटस्फोट घेतला आहे. स्मिता गेट या एक IAS अधिकारी आहेत,
तर या दोघांचा संसार बारा वर्षे चालला होता.

 

अभिनेता सोहेल खान आणि सीमा यांचेदेखील लव मॅरेज होते. तब्बल 24 वर्षांनी ते संपुष्टात आले.
त्या दोघांनी 2022 मध्ये घटस्फोट घेतला आहे.

 

 

अभिनेता इम्रान खान आणि अवंतिका मलिक

(Actor Imran Khan) अभिनेता इम्रान खान आणि त्यांची पत्नी अवंतिका मलिक यांनी हे घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतल्याचे समोर आले.

 

 

अभिनेता करण मेहरा आणि निशा रावल

तर टेलिव्हिजन अभिनेता करण मेहरा आणि निशा रावल यांच्या घटस्फोटाची चर्चादेखील कित्येक दिवसांपासून
प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत होते. दोघांनी एकमेकांवर गंभीर आरोप करत घटस्फोटाचा निर्णय घेतला आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Entertainment News | bollywood celebs who divorce in 2022 sohail khan to aaishwarya rajinikant and dhanush

 

हे देखील वाचा :

Akshay kumar | अक्षय कुमारच्या ‘या’ चित्रपटावर पाकिस्तानी चाहत्याचा आक्षेप

2nd ODI IND vs BAN | टीम इंडियाला मोठा धक्का! ‘हा’ अष्टपैलू खेळाडू दुखापतीमुळे संघाबाहेर

Pune Crime | यूएसए क्रिकेट लीग शेअर्सच्या आमिषाने 55 लाखांची फसवणूक; सौरभ पांडे, वंदना कृष्णा, राशीद खान, सिराज हुसेन आणि विक्रम चौधरी यांच्यावर FIR

 

Related Posts