IMPIMP

2nd ODI IND vs BAN | टीम इंडियाला मोठा धक्का! ‘हा’ अष्टपैलू खेळाडू दुखापतीमुळे संघाबाहेर

by nagesh
2nd ODI IND vs BAN | india playing xi 2nd odi vs ban team management to take call on injured shardul thakur umran malik likely for 2nd odi

सरकारसत्ता ऑनलाईन टीम : 2nd ODI IND vs BAN | रविवारी टीम इंडिया आणि बांगलादेश यांच्यात पार पड्लेल्या सामन्यात टीम इंडियाला
बांगलादेशकडून लाजिरवाणा पराभव स्वीकारावा लागला. या मालिकेत बांगलादेशने टीम इंडियावर मात करत या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली
आहे. यामुळे उद्या होणारा दुसरा सामना हा टीम इंडियासाठी करो व मरो असा असणार आहे. मात्र, त्या अगोदर टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे.
मोहम्मद शमी, रिषभ पंत यांनी दुखापतीमुळे मालिका सुरू होण्याआधीच माघार घेतली यानंतर आता अष्टपैलू शार्दूल ठाकूर दुखापतीमुळे मालिकेतून
बाहेर पडला आहे. मीरपूर सामन्यात पहिल्या स्पेलनंतर त्याचा पाय मुरगळला, त्यामुळे तो दुसऱ्या सामन्यात खेळण्याची शक्यता फार कमी आहे. (2nd ODI IND vs BAN)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

शार्दूलच्या दुखापतीवर BCCI ची वैद्यकीय टीम उपचार करत आहे आणि त्याच्या समावेशाबाबत चर्चा सुरू आहे. जर शार्दूल ठाकूर या मालिकेतून बाहेर पडला तर दुसऱ्या वनडे सामन्यात उम्रान मलिक याला संधी मिळण्याची शक्यता आहे. संघ व्यवस्थापनाला शार्दूलच्या दुखापतीबाबत कोणताही धोका पत्करायचा नसेल, तर उम्रानला संधी मिळण्याची शक्यता आहे. बीसीसीआयने शमीच्या जागी वनडे मालिकेसाठी उम्रानची आधीच निवड केली आहे. अक्षर पटेल हाही पहिल्या वनडे सामन्यात दुखापतीमुळे खेळू शकला नाही. तसेच तो ढाका येथे बुधवारी होणाऱ्या सामन्यात खेळण्याची शक्यता फारच कमी आहे. जर तो पूर्णपणे फिट आला तर शाहबाज अहमदला बाकावर बसावे लागणार आहे.

 

भारताचा संभाव्य संघ
रोहित शर्मा (कर्णधार) शिखर धवन, विराट कोहली, श्रेयस अय्यर, लोकेश राहुल(उपकर्णधार),
वॉशिंग्टन सुंदर, शाहबाज अहमद/अक्षर पटेल, शार्दूल ठाकूर/उम्रान मलिक,
दीपक चहर, मोहम्मद सिराज, कुलदीप सेन.

 

Web Title :- 2nd ODI IND vs BAN | india playing xi 2nd odi vs ban team management to take call on injured shardul thakur umran malik likely for 2nd odi

 

हे देखील वाचा :

Divorce In Love Marriage | प्रेम विवाहात घटस्फोटांचे प्रमाण जास्त; दहापैकी चार जोडपी करतात अर्ज

Pune Crime | यूएसए क्रिकेट लीग शेअर्सच्या आमिषाने 55 लाखांची फसवणूक; सौरभ पांडे, वंदना कृष्णा, राशीद खान, सिराज हुसेन आणि विक्रम चौधरी यांच्यावर FIR

 

 

Related Posts