IMPIMP

EPF online transfer | ईपीएफ ऑनलाइन ट्रान्सफर करणे झाले आता आणखी सोपे, घरबसल्या करू शकता ट्रान्सफर

by nagesh
Tax On EPF | effect of tax on epf know experts dhirendra kumar view

नवी दिल्ली : वृत्तसंस्था ईपीएफ ऑनलाइन ट्रान्सफर (EPF online transfer) करणे आता पहिल्यापेक्षा सुद्धा सोपे झाले आहे. लोक जेव्हा नोकरी बदलतात तेव्हा नेहमी त्यांना आपला प्रॉव्हिडेंट फंड बॅलन्स ट्रान्सफर करण्यात समस्या येते. अनेकदा तर लोक ट्रान्सफर करतच नाहीत. जेव्हा त्यांना कळते की ट्रान्सफर करणे आवश्यक आहे तेव्हा ते अस्वस्थ होतात. परंतु आता हे काम अतिशय सोपे झाले आहे. तुम्ही घरबसल्या ऑनलाइन ईपीएफ ट्रान्सफर (EPF online transfer) करू शकता.

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook Page for every update

 

 

 

पीएफ अकाऊंट (PF account) सहजपणे ऑनलाइन ट्रान्सफर (PF transfer online) करण्यासाठी ईपीएफओने 6 सिम्पल स्टेप्स सांगितल्या (EPF online transfer) आहेत. ईपीएफओ (EPFO) ने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवर एक व्हिडिओ लिंक शेयर करत याबाबत सविस्तर माहिती दिली आहे. हिच माहिती आम्ही सविस्तर देत आहोत –

EPFO मेंबर पोर्टलद्वारे असे करा PF ट्रान्सफर

सर्वप्रथम कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेचे (EPFO) युनिफाईड मेंबर पोर्टल (unifiedportal-mem.epfindia.gov.in) उघडा.

पोर्टलवर UAN (Unified Account Number) आणि पासवर्डने लॉगइन करा.

Online Service सेक्शनमध्ये One Member One Account (Transfer Request) वर क्लिक करा.

आता Previous Employee निवडून UAN किंवा जुना मेंबर आयडी टाकून Get Details वर क्लिक करा.

आता ओटीपी जनरेट करा, तो रजिस्टर्ड मोबाईल नंबरवर मिळेल.

ओटीपी टाकताच पैसे ट्रान्सफरचे ऑपशन येईल. त्यावर क्लिक करा.

आता जुन्या पीएफ अकाऊंटमधून पैसे ट्रान्सफर करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. तुम्ही स्टेटस कधीही क्लेम स्टेटस मेन्युमध्ये जाऊन ट्रॅक करू शकता.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook Page for every update

 

 

Web Title :- EPF online transfer | epf online transfer how to transfer pf balance from one company to another

 

हे देखील वाचा :

Sharad Pawar | ‘चंद्रकांत पाटलांची दखल महाराष्ट्र घेत नाही’ – शरद पवार

Pune Crime | खून करुन फरार झालेले 2 अल्पवयीन गुन्हे शाखेच्या ताब्यात

Voter Card-Aadhaar Card Linking | मतदार ओळखपत्र आधारसोबत लिंक ! डेटाचा होऊ शकतो दुरुपयोग? 5 मोठ्या प्रश्नांचे तज्ज्ञांनी दिले उत्तर

 

Related Posts