IMPIMP

Pune Crime | खून करुन फरार झालेले 2 अल्पवयीन गुन्हे शाखेच्या ताब्यात

by nagesh
Pune Crime | Pune Police Crime branch arrests two drug peddlers in Kondhwa seizes Mephedrone worth 7.5 lakhs

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन पुण्यातील (Pune Crime) कर्वेनगरमध्ये एका तरुणावर धारदार शस्त्राने सपासप वार करुन खून (Murder) केल्याची घटना रविवारी (दि.26) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास घडली होती. या प्रकरणी अलंकार पोलीस ठाण्यात (Alankar Police Station) हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अनिल राजेंद्र जाधव Anil Rajendra Jadhav (वय-20 रा. कोथरुड) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. या गुन्ह्यातील (Pune Crime) फरार झालेल्या दोन अल्पवयीन मुलांना गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथक एकने (Anti extortion Cell) ताब्यात घेतले आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook Page for every update

 

 

 

 

रविवारी सायंकाळी अनिल जाधव याचा खुन केल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाले होते. पोलीस आरोपींचा शोध घेत असताना गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथक एकचे पोलीस नाईक राजेंद्र लांडगे (Rajendra Landage) यांना अनिल जाधव याचा खून अल्पवयीन मुलांनी केला असल्याची माहिती मिळाली. तसेच ते दोघे कोथरूड येथील चांदणी चौक (Chandni Chowk Kothrud) येथे येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने सापळा रचून दोघांना ताब्यात घेतले. घटना घडल्यानंतर अवघ्या दोन तासात पोलिसांनी आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत. (Pune Crime)

 

या कारणामुळे केला खून

ताब्यात घेण्यात आलेल्या अल्पवयीन मुलांकडे चौकशी केली असता, मयत अनिल जाधव हा मावळे आळीतील त्याच्या घराजवळील रस्त्यावरुन येता-जाता शिवीगाळ करुन मारहाण (Beating) करत होता. तसेच तो सिगारेट आणि पेट्रोलसाठी जबरदस्तीने पैसे मागत होता. पैसे दिले नाहीतर मारहाण करत होता. याशिवाय दोन महिन्यापूर्वी अनिल जाधव आणि त्याच्या साथिदारांनी मारहाण केली होती. याच रागातून कर्वेनगर (Karvenagar) येथील बंगला क्रमांक 85 समोरील सार्वजनिक रस्त्यावर अनिलवर कोयता आणि तलवारीने वार करुन खून केल्याची कबुली दिली. आरोपींना पुढील तपासासाठी अलंकार पोलीस ठाण्याच्या ताब्यात दिले आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook Page for every update

 

 

 

ही कारवाई पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता (CP Amitabh Gupta), सह पोलीस आयुक्त डॉ. रविंद्र शिसवे (Joint CP Dr Ravindra Shisve), अपर पोलीस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळे (Addi CP Ramnath Pokale), पोलीस उपायुक्त गुन्हे श्रीनिवास घाडगे (DCP Srinivas Ghadge), सहायक पोलीस आयुक्त गुन्हे 1 गजानन टोम्पे (ACP Gajanan Tompe) यांच्या मार्गदर्शनाखाली खंडणी विरोधी पथक एकचे सहायक पोलीस निरीक्षक संदीप बुवा (API Sandeep Buwa), पोलीस अंमलदार राजेंद्र लांडगे, नितीन रावळ, प्रफुल्ल चव्हाण व विजय कांबळे यांच्या पथकाने केली.

 

Web Title : Pune Crime | 2 juvenile offenders arrested for anil jadhav murder case of karve nagar pune

 

हे देखील वाचा :

Bigg Boss Marathi | ‘बिग बॉस 3’ शो चा विजेता ठरला विक्रम निकम

Voter Card-Aadhaar Card Linking | मतदार ओळखपत्र आधारसोबत लिंक ! डेटाचा होऊ शकतो दुरुपयोग? 5 मोठ्या प्रश्नांचे तज्ज्ञांनी दिले उत्तर

Income Tax Department Raid | 120 तासांनी संपली कारवाई तब्बल 257 कोटींचं सापडलं घबाड; 50 तासांच्या चौकशीनंतर कानपुरातील व्यापार्‍याला अटक

 

Related Posts