IMPIMP

EPFO ने 23.44 कोटी लोकांच्या अकाऊंटमध्ये जमा केलं 8.5 टक्के व्याज, घरबसल्या जाणून घ्या कसा तपासू शकता PF Balance?

by nagesh
EPFO Update | epfo update if you do not joint e nomination in epf account then you will not be able to see the details of account passbook

नवी दिल्ली : वृत्तसंस्था कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (EPFO) आर्थिक वर्ष 2020-21 साठी 23 कोटीपेक्षा जास्त सबस्क्रायबर्सच्या खात्यात 8.50 टक्के दराने व्याज (PF Interest) जमा केले आहे. EPFO ने अधिकृत ट्विटर हँडलवर सांगितले की, आर्थिक वर्ष 2020-21 मध्ये आतापर्यंत 23.44 कोटी लोकांच्या खात्यात 8.50 टक्के दराने पैसे ट्रान्सफर करण्यात आले आहेत. तुमच्या पीएफ खात्यात पैसे आले किंवा नाही हे जाणून घ्यायचे असेल तर ताबडतोब या पद्धतीने आपला पीएफ अकाऊंट बॅलन्स (How to Check PF Account Balance) तपासू शकता.

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook Page for every update

 

 

 

SMS द्वारे चेक करू शकता बॅलन्स
तुम्ही एसएमएसने सुद्धा आपला पीएफ अकाऊंटचा बॅलन्स सहज जाणून घेवू शकता. यासाठी तुम्हाला तुमचा युएएन माहित असायला हवा. सोबतच तो अ‍ॅक्टिव्ह असावा. एसएमएस सर्वप्रथम EPFOHO UAN HIN टाइप करून 7738299899 वर पाठवावा लागेल. ज्यानंतर तुम्हाला हिंदीमध्ये मेसेज येईल. ज्यामध्ये तुमच्या पीएफ अकाऊंटमध्ये जमा रक्कमेची पूर्ण माहिती असेल.

 

मिस्ड कॉलद्वारे चेक करा पीएफ बॅलन्स
तुम्ही तुमच्या PF Account चा बॅलन्स एका मिस्ड कॉलने जाणून घेऊ शकता. यासाठी आपल्या अकाऊंटमध्ये रजिस्टर्ड मोबाइल नंबरवरून 011-22901046 वर एक मिस्ड कॉल द्यावा लागेल. ज्यानंतर तुम्हाला ईपीएफओकडून एक एसएमएस येईल. ज्यामध्ये तुम्हाला आपल्या पीएफ अकाऊंटमध्ये जमा रक्कमेची संपूर्ण माहिती मिळेल. (EPFO)

EPFO वेबसाइटवर चेक करा पीएफ बॅलन्स
यासाठी https://passbook.epfindia.gov.in/MemberPassBook/Login वर लॉग-इन करा. आता युएएन आणि पासवर्ड द्वारे लॉग-इन करून पासबुक चेक करू शकता.

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook Page for every update

 

 

 

UMANG App द्वारे असा चेक करा
प्ले स्टोर वरून उमंग अ‍ॅप डाऊनलोड करा. या अ‍ॅपवर अनेक सरकारी सेवा उपलब्ध आहेत.
यामध्ये ईपीएफओ ऑपशन निवडल्यानंतर एम्प्लॉई सेंट्रीक सर्व्हीस निवडा. आता युएएन नंबर टाका.
यानंतर तुमच्या मोबाईल नंबरवर एक ओटीपी प्राप्त होईल. तुम्ही व्ह्यू पासबूक अंतर्गत ईपीएफ बॅलन्स चेक करू शकता.

 

Web Title :- EPFO | epfo credited 8 50 percent pf interest in 23 44 crore accounts for fy 2021 know how to check pf balance details

 

हे देखील वाचा :

EPFO Rule | नवीन वर्षापूर्वी उरकून घ्या ‘हे’ महत्वाचे काम अन्यथा होऊ शकते मोठे नुकसान; जाणून घ्या

ATM मधून निघाले नाहीत पैसे परंतु अकाऊंटमधून झाले ‘डेबिट’ तर काय करावे? जाणून घ्या पैसे मिळवण्याची पूर्ण प्रक्रिया

Ananya Panday | पूर्ण पॅन्ट घालायला विसरली अनन्या पांडे, जाळीदार कपड्यांमध्ये भागवलं ‘काम’ !

 

Related Posts