IMPIMP

EPFO Rule | नवीन वर्षापूर्वी उरकून घ्या ‘हे’ महत्वाचे काम अन्यथा होऊ शकते मोठे नुकसान; जाणून घ्या

by nagesh
Interest on PF | epfo latest update interest rate credit date how to check balance and other details

नवी दिल्ली : वृत्तसंस्था EPFO Rule | जर तुम्ही नोकरी करत असाल आणि तुमचे खाते कर्मचारी भविष्य निर्वाहनिधी (PF) अंतर्गत उघडले गेले असेल तर तुमच्यासाठी विशेष बातमी असू शकते. कर्मचारी भविष्य निर्वाहनिधी संघटनेने (EPFO Rule) सर्व पीएफ खातेधारकांसाठी (PF Account Holders) आपल्या खात्यात नॉमिनी नोंदवणे अनिवार्य केले आहे. नॉमिनीची नोंद करण्याची मर्यादा 31 डिसेंबर 2021 ठरवण्यात आली आहे.

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook Page for every update

 

 

 

 

या कालावधीपर्यंत नॉमिनीची नोंद न केल्यास समस्यांचा सामना करावा लागू शकतो, ज्यामध्ये विमा रक्कम आणि पेन्शनसारख्या लाभांच्या नुकसानीचा समावेश आहे.

 

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना आपल्या सदस्यांना विम्यापासून अनेक सुविधा देते. तसेच निवृत्तीमध्ये पेन्शनचा लाभ सुद्धा देते. जर अशा काळात नॉमिनीची माहिती आणि इतर तपशील नोंदलेला नसेल तर पीएफचे पैसे घेण्यापासून ट्रान्सफर करण्यापर्यंत अनेक समस्या येऊ शकतात. सोबतच मृत्यु लाभ घेण्यात सुद्धा समस्या येऊ शकते. (EPFO Rule)

 

ऑनलाइन फाईल केले जाऊ शकते नामांकन

EPFO वेबसाईटच्या माध्यमातून ऑनलाइन नॉमिनी नोंदवू शकता. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने आपल्या सदस्यांना नॉमिनेशन करण्यासाठी 31 डिसेंबरपर्यंतचा वेळ दिला आहे.

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook Page for every update

 

 

 

 

असे नोंदवू शकता ऑनलाइन नॉमिनी

– प्रथम EPFO ची अधिकृत वेबसाइट https://www.epfindia.gov.in/site_en/index.php द्वारे लॉग इन करा.

– यानंतर सर्व्हिसेस मध्ये जा आणि ड्रॉपडाऊन मेन्यूमधून ‘फॉर एम्प्लॉइज’ ऑपशनवर टॅप करा.

– नंतर, ‘सदस्य यूएएन/ऑनलाइन सेवा (ओसीएस/ओटीसीपी)’ वर टॅप करा.

– यानंतर यूएएन आणि पासवर्डने लॉग इन करा.

– ‘मॅनेज’ टॅब अंतर्गत ‘ई-नॉमिनेशन’चा ऑपशन मिळेल. त्यावर क्लिक करा.

– कुटुंबाची घोषणा आणि ‘कौटुंबिक तपशील नोंदवा’ किंवा नॉमिनीचा तपशील अपडेट करण्यासाठी होय वर क्लिक करा.

– येथे नॉमिनीसाठी मागितलेली सर्व माहिती द्या.

– एकापेक्षा जास्त नॉमिनींचा समावेश करायचा असेल तर ‘Add New Button’ वर टॅप करा आणि दुसर्‍या नॉमिनीची माहिती द्या.

– फॅमिली डिटेल्स सेव्ह करताच, ई-नॉमिनेशन साठी प्रक्रिया पूर्ण होईल.

 

Web Title :- EPFO Rule | epfo rule do this important work before the new year or else there may be a big loss

 

हे देखील वाचा :

ATM मधून निघाले नाहीत पैसे परंतु अकाऊंटमधून झाले ‘डेबिट’ तर काय करावे? जाणून घ्या पैसे मिळवण्याची पूर्ण प्रक्रिया

Ananya Panday | पूर्ण पॅन्ट घालायला विसरली अनन्या पांडे, जाळीदार कपड्यांमध्ये भागवलं ‘काम’ !

Sanjay Raut | दिल्लीत FIR दाखल झाल्यानंतर संजय राऊत यांनी दिली प्रतिक्रिया, म्हणाले…

 

Related Posts