IMPIMP

EPFO | ईपीएफ अकाऊंटमध्ये घरबसल्या अपडेट करा नवीन बँक अकाऊंट, UAN द्वारे आहे शक्य, जाणून घ्या प्रक्रिया

by nagesh
EPFO | pf contributions exceeding rs 2 5 lakh will be taxed 10 points

नवी दिल्ली : वृत्तसंस्था EPFO | तुम्ही नोकरी करत असाल आणि तुमच्याकडे भविष्य निर्वाह निधी म्हणजेच पीएफ खाते असेल तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी आहे. वास्तविक, कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (EPFO) ग्राहकांना घरी बसून बँक अकाऊंट (Bank Account) अपडेट करण्याची परवानगी देते. अशा परिस्थितीत तुम्ही तुमचे बँक खाते पीएफ खात्यासोबत अगदी सहजपणे अपडेट करू शकता.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

बँक खात्याची माहिती अपडेट न केल्यामुळे, तुम्ही तुमच्या पीएफ खात्यातून पैसे काढू शकणार नाही. बर्‍याच वेळा असे घडते की ग्राहकांनी पीएफ खात्याशी जोडलेले बँक खाते बंद केलेले असते, आणि नवीन बँक खाते पीएफ खात्याशी जोडण्यास विसरले जाते. जर तुमचा जुना किंवा चुकीचा खाते क्रमांक ईपीएफमध्ये नोंदणीकृत असेल, तर तुम्ही युनिव्हर्सल अकाऊंट नंबर (UAN) द्वारे तुमचे नवीन बँक खाते सहजपणे अपडेट करू शकता.

असे अपडेट करा बँक खाते
सर्वप्रथम EPFO चे अधिकृत युनिफाईड सदस्य पोर्टलवर जा https://unifiedportal-mem.epfindia.gov.in/memberinterface/.

येथे UAN आणि पासवर्ड टाकून लॉग इन करा.

आता वरच्या मेनूमधील ’मॅनेज’ पर्यायावर जा, त्यानंतर ड्रॉप डाऊन मेनूमधून ’केवायसी’ निवडा.

आता तुमची बँक निवडा आणि बँक खाते क्रमांक, नाव आणि IFSC कोड टाकून ’Save’ वर क्लिक करा. आता तुमची विनंती KYC Pending for Approval म्हणून दर्शविली जाईल.

त्यानंतर संबंधित कागदपत्रे तुमच्या मालकाकडे जमा करा.

ही माहिती नियोक्त्याने मंजूर केल्यानंतर, तुमचे अपडेट केलेले बँक तपशील डिजिटली अप्रुव्हड केवायसी दाखवले जाईल.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

युनिव्हर्सल अकाऊंट नंबर नंबर म्हणजे काय
युनिव्हर्सल अकाऊंट नंबर (UAN) हा 12 अंकी युनिक आयडेंटिफिकेशन नंबर आहे.
हा क्रमांक कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने दिला आहे.
विशेष म्हणजे एखाद्या कर्मचार्‍याने त्याच्या हयातीत नोकरी बदलली तरी त्याचा UAN तसाच राहील.

 

 

Web Title :- EPFO | pf news want update bank details with epfo step by guide to do it online using UAN

 

हे देखील वाचा :

Pune Corona Updates | चिंताजनक ! पुण्यात गेल्या 24 तासात कोरोनाचे 1800 पेक्षा जास्त नवे रूग्ण, जाणून घ्या आकडेवारी

Dr. Bharati Pawar | ‘लस, औषधांसाठी निधी देऊनही राज्य सरकारचे काम संथगतीने’ – डॉ. भारती पवार

Florona | दुप्पट धोकादायक बनून आलाय ‘फ्लोरोना’, जाणून घ्या त्याचे लक्षणं आणि तो कसा पसरतो

 

Related Posts