IMPIMP

Dr. Bharati Pawar | ‘लस, औषधांसाठी निधी देऊनही राज्य सरकारचे काम संथगतीने’ – डॉ. भारती पवार

by nagesh
Dr. Bharati Pawar | union minister of state for health dr. bharti pawar says opposition to mask release

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन Dr. Bharati Pawar | काही दिवसांपासून कोरोना बाधितांची (Coronavirus) संख्या वाढू लागली असून ओमायक्रॉनचे (Omicron Corona Variant) रुग्णही वाढत आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार (Dr. Bharati Pawar) यांनी आढावा बैठकीचे आयोजन केले होते. सर्व राज्यांना लस, औषधांसाठी वाढीव निधी केंद्राने दिला आहे. त्यामुळे आता काम करण्याची गरज आहे. सध्याचे राज्य सरकार संथगतीने काम करत आहे. परंतु, कामाची गती वाढवली पाहिजे,’ असे मत केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी व्यक्त केले.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

डॉ. भारती पवार (Dr. Bharati Pawar) म्हणाल्या, ‘कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे त्या-त्या राज्यांनी कोणती  काळजी घेतली पाहिजे, काय निर्णय घेतले पाहिजे. याबाबत सूचना दिल्या आहेत. मुंबईतील बाधितांची वाढती संख्या चिंतेचा विषय आहे. केंद्राचे प्रत्येक राज्यातील परिस्थितीवर लक्ष असून लॉकडाऊन करण्याचे अधिकार राज्यांना दिले आहेत. आतापासून काळजी घेतली तर संसर्ग रोखता येऊ शकतो.

 

मदत मिळत नसल्यास मंत्र्यांनी लेखी कळवावे –

केंद्र सरकारकडून (Central Government) आवश्यक ती मदत केली जात नसल्याचा आरोप होत आहे.
त्यावरही डॉ. पवार यांनी भाष्य केले. हा आरोप फेटाळत त्या म्हणाल्या, केंद्राने सर्वच बाबतीत मदत केली आहे.
केवळ राष्ट्रीय आरोग्य योजनेचाच नाही तर अन्य मार्गातून निधी मंजूर करून दिला आहे.
जर कोणी मंत्री निधी मिळाला नसल्याची तक्रार करीत असेल तर त्यांनी लेखी कळवावे.
त्यामुळे आम्ही काय नाही दिले ते तरी समजेल. मात्र जे दिले त्याचे काय झाले असा प्रश्नही समोर येतो असेही पवार यांनी म्हंटले आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

Web Title :- Dr. Bharati Pawar | work state government remains slow funds provided center Dr. Bharati Pawar

 

हे देखील वाचा :

Florona | दुप्पट धोकादायक बनून आलाय ‘फ्लोरोना’, जाणून घ्या त्याचे लक्षणं आणि तो कसा पसरतो

LPG Cylinder Rate | 634 रुपयांमध्ये मिळेल ‘हा’ LPG सिलेंडर, वाहतुकीचाही नाही त्रास, जाणून घ्या सविस्तर

How To Earn-Save | कसे कमवायचे, कशी बचत करायची, कुठे किती खर्च करायचा, ‘या’ एक्सपर्टच्या टिप्स तुमच्या कामी येतील

 

Related Posts