IMPIMP

Gajanan Kirtikar | ‘मला तोंड दाबून बुक्यांचा मार असह्य झाला आणि मी सेना सोडली’ – गजानन कीर्तिकर

by nagesh
Gajanan Kirtikar | Gajanan Kirtika Tell Why He Leave Uddhav Balasaheb Thackeray Shivsena

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन   शिवसेनेचे खासदार गजानन कीर्तिकर (Gajanan Kirtikar) यांनी शिवसेना सोडण्याचा निर्णय घेतला आणि नव्याने स्थापन झालेल्या शिवसेनेच्या शिंदे गटात (Shinde Group) प्रवेश केला. पण त्यांचा मुलगा अमोल कीर्तिकर (Amol Kirtikar) अद्याप शिवसेनेत आहे. त्यामुळे त्यांच्या कुटुंबात विरोधाभास पहायला मिळत आहे. त्यावर आता गजानन कीर्तिकर (Gajanan Kirtikar) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

 

माझा मुलगा आणि मी आम्ही चर्चा केली आणि एकमेकाशी बोलून आम्ही वेगळे झालो. मी त्याला सोबत येण्यास सांगितले. पण त्याने नकार दिला. मला तिथे थांबून तोंड दाबून बुक्यांचा मारा सहन झाला नाही, म्हणून मी शिवसेना सोडली, असे गजानन कीर्तिकर म्हणाले. पुण्यात कीर्तिकर यांच्या निवासस्थानी शिंदे गटात प्रवेश केल्याबद्दल त्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी काँग्रेस – राष्ट्रवादीसोबत जाणे मला पटले नाही. संपलेल्या काँग्रेसला ठाकरेंमुळे संजीवनी मिळाली. मला खासदारकीची उमेदवारी देऊ नये, यासाठी उद्धव ठाकरे प्रयत्नशील होते. तरी देखील मी ते सहन केले. काँग्रेसमधून आलेल्या प्रियंका चतुर्वेदी (Priyanka Chaturvedi) यांना खासदार केले, त्यामुळे तिथे निर्णय कसे सुरु आहेत, हे दिसते. या त्रासाला कंटाळून मी पक्ष सोडला, असे कीर्तिकर म्हणाले. (Gajanan Kirtikar)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

संजय राऊत (Sanjay Raut) यांनी गजानन कीर्तिकर यांच्या जाण्याने प्रतिक्रिया दिली होती.
गजानन कीर्तिकर (Gajanan Kirtikar) यांना या वयात शिवसेनेने सर्व काही देऊ केले.
त्यांना चार वेळा आमदार आणि दोन वेळा खासदार केले होते. ते दोन वेळा मंत्री देखील होते.
त्यामुळे त्यांनी सर्व काही उपभोगून शिवसेना सोडली आहे. त्यांना पक्षाचे काही निर्णय पटत नव्हते,
तर त्यांनी बसून सांगायला पाहिजे होते. आता ते मनाला येईल ते बोलत आहेत.
त्यामुळे त्यांच्याकडे जास्त लक्ष देण्याची गरज नाही. ते गेले आहेत. ठीक आहे. लोक त्यांना दोन दिवसांत विसरुन जातील.

 

Web Title :- Gajanan Kirtikar | Gajanan Kirtika Tell Why He Leave Uddhav Balasaheb Thackeray Shivsena

 

हे देखील वाचा :

Maharashtra Police Bharti 2022 | जाणून घ्या पोलीस भरतीसाठी आवश्यक कागदपत्रांची यादी आणि त्या संबंधीच्या अटी

T20 World Cup | यामुळे मॅच फिक्सिंग झाली होती,” जावेद मियाँदाद यांचा मोठा गौप्यस्फोट

Gold and Silver Price | सोने पुन्हा महागले, पहा तुमच्या शहरातील किंमती

 

Related Posts