IMPIMP

T20 World Cup | यामुळे मॅच फिक्सिंग झाली होती,” जावेद मियाँदाद यांचा मोठा गौप्यस्फोट

by nagesh
T20 World Cup | t20 world cup javed miandad revelation on match fixing after pakistan defeated by england t20 world cup loss

सरकारसत्ता ऑनलाईन टीम – ऑस्ट्रेलियात (Australia) नुकत्याच झालेल्या टी – 20 वर्ल्डकपमध्ये (T20 World Cup) पाकिस्तानवर (Pakistan) मात करून इंग्लंडने (England) विजेतेपदावर आपले नाव कोरले आहे. यानंतर पाकिस्तानच्या टीमवर सडकून टीका केली जात आहे. यावेळी अनेक माजी खेळाडूनी आपले मत व्यक्त केले आहे. यावेळी पाकिस्तान संघाचे माजी कर्णधार जावेद मियाँदाद (Javed Miandad) यांनी विदेशी प्रशिक्षकांचा मुद्दा उपस्थित करत आक्षेप नोंदवला आहे. तसेच विदेशी प्रशिक्षक आणल्याने माजी खेळाडूंना राष्ट्रीय संघाचा भाग होण्याची संधी मिळत नाही असेदेखील ते म्हणाले. (T20 World Cup)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

पाकिस्तान संघ व्यवस्थापनाची मानसिकता त्यांच्या खेळाडूंचं भविष्य असुरक्षित करण्यासाठी कारणीभूत ठरत आहे. तसेच भूतकाळात अशाच गोष्टी फिक्सिंगसाठी कारणीभूत ठरल्या होत्या असा सूचक इशारादेखील जावेद मियाँदाद यांनी यावेळी दिला.

 

यादरम्यान मियाँदाद यांनी मॅच फिक्सिंगबद्दल (Match Fixing) मोठा गौप्यस्फोट केला.
“आपल्या लोकांकडे पाहा, त्यांनी जे क्रिकेट खेळलं आहे ते पाहा. मी माझ्याबद्दल बोलत नाही आहे.
मला भूतकाळात अनेक ऑफर्स आल्या होत्या, पण मी गेलो नाही.
पण आज जे खेळाडू खेळत आहेत त्यांचं भविष्य काय आहे? मी आज चांगली कामगिरी केली नाही तर काहीच संधी मिळणार नाही हे त्यांना माहिती आहे.
याच कारणामुळे फिक्सिंग झाली होती. प्रत्येकाला आपलं करिअर संपेल अशी भीती वाटत होती,” असा खुलासा जावेद मियाँदाद यांनी केला आहे.

 

Web Title :- T20 World Cup | t20 world cup javed miandad revelation on match fixing after pakistan defeated by england t20 world cup loss

 

हे देखील वाचा :

Mumbai High Court | ‘न्यायालयाच्या दीर्घकालीन सुट्ट्या कमी करण्याची अपेक्षा योग्य असली, तरी…’ – जनहित याचिकेवर मुंबई उच्च न्यायालय

Gold and Silver Price | सोने पुन्हा महागले, पहा तुमच्या शहरातील किंमती

IPL 2023 | पोलार्डने आयपीएलमधून निवृत्ती घेतल्यानंतर रोहित शर्माने केली भावुक पोस्ट, म्हणाला…..

Bigg Boss 16 | बिग बॉसचा 45 वा भाग होता धमाकेदार, शालीन सुंबुलने पूलमध्ये साजरा केला वाढदिवस

 

Related Posts