IMPIMP

Girish Mahajan | पुणे पोलिसांनी जळगावमधून महत्वाची कागदपत्रे घेतली ताब्यात, गिरीश महाजन अडचणीत येणार?

by nagesh
Girish Mahajan | pune police seized documents from jalgaon in case of maratha vidya prasarak sanstha controversy girish mahajan may be in trouble

पुणे :  सरकारसत्ता ऑनलाइन – जळगावातील मराठा विद्या प्रसारक मंडळातील (Maratha Vidya Prasarak Mandal jalgaon) वादाच्या प्रकरणात पुण्यातील कोथरुड पोलिस ठाण्यात (Kothrud Police Station) गुन्हा दाखल झाला आहे. यानंतर चौकशीसाठी पुणे पोलिसांचे (Pune Police) पथक जळगावमध्ये (Jalgaon) पोहोचले. या पथकाने अनेक ठिकाणी छापेमारी केली. या छापेमारीत पुणे पोलिसंच्या पथकाने तब्बल एक टेम्पो भरुन कागदपत्रे जप्त केली असल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणात आता गिरीश महाजन (Girish Mahajan) यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. गिरीश महाजन (Girish Mahajan) हे या प्रकरणातील मुख्य सूत्रधार असल्याचा आरोप आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

पुणे पोलिसांच्या पथकाने जळगावातून कागदपत्रे जप्त (Documents Confiscated) केली आहेत. संस्थेशी संबंधित कागदपत्र ही भोईटे आणि आणखी एक आरोपी तानाजी यांच्या घरी मिळून आली. ही कागदपत्रे संस्थेत असणं अपेक्षित होतं मात्र, भोईटे आणि आणखी एका व्यक्तीच्या घरात आढळून आली आहेत. या कागदपत्रांतून मोठे लीड मिळण्याची शक्यता असल्याची माहिती पुणे पोलिसांनी दिली आहे. या गुन्ह्यातील भोईटे गटाच्या 9 जणांवर मोक्का लावण्यात आला आहे.

 

नेमकं काय आहे प्रकरण ?
जळगावमधील बहुचर्चित मराठा विद्या प्रसारक संस्थेची जागा हडप करण्यासाठी भोईट गटाला मदत करुन गिरीश महाजन (Girish Mahajan) आणि त्यांच्या समर्थकांनी आपल्याला डांबून ठेवत धमकावण्यासह खंडणी (Ransom) वसूल केल्याची तक्रार ॲड. विजय भास्कर पाटील (Adv. Vijay Bhaskar Patil) यांनी केली होती.
या प्रकरणी त्यांनी जळगाव जिल्ह्यातील निंभोरा पोलीस ठाण्यात (Nimbhora Police Station) गुन्हा दाखल केला होता.
त्यानंतर हा गुन्हा पुण्यातील कोथरुड पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आला.

 

 

पुणे पोलिसांची पाच पथके जळगावात
कोथरुड पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यात चौकशीसाठी पुणे पोलिसांचे पथक रविवारी सकाळी जळगावमध्ये दाखल झाले.
सहाय्यक पोलिस आयुक्त सुषमा चव्हाण (ACP Sushma Chavan) यांच्या नेतृत्वात पाच पथके तयार करण्यात आली आहेत.
या पथकांकडून स्वतंत्ररित्या चौकशी केली जाणार आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

दमदाटी करुन खंडणी घेतल्याचा आरोप
फिर्यादीत ॲड. विजय भास्कर पाटील यांनी म्हटले होते की,
ते जळगाव येथील मराठा विद्या प्रसारक सहकारी समाज मर्यादित संस्था जळगावचे संचालक आहेत.
त्यांना आरोपींनी पुण्यात संस्थेचे कागदपत्रे देण्याच्या बहाण्याने बोलावून घेतले.
ते पुण्यात आल्यानंतर त्यांना शिवीगाळ करत दमदाटी करण्यास सुरुवात केली.
तसेच त्यांना गाडीत जबरदस्तीने बसवत सदाशिव पेठेत (Sadashiv Peth) असलेल्या एका फ्लॅटवर नेले. या ठिकाणी मारहाण करत गळ्याला आणि पोटाला चाकू लावला.
फिर्यादी यांच्या सोबत असलेल्या दुसऱ्या एका व्यक्तीलाही त्यांनी याठिकाणी डांबले.
तर सर्व संचालकांचे राजीनामे आणले नाही तर एमपीडीएच्या (MPDA) गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देत पाच लाख रुपयांची खंडणी घेतली.

 

हा प्रकार जानेवारी 2018 ते जानेवारी 2021 या कालावधीत घडला होता.
मात्र, त्यांनी उशिरा तक्रार केली.
याप्रकरणी गिरीश महाजन, रामेश्वर नाईक (Rameshwar Naik), निलेश भोईटे (Nilesh Bhoite) यांच्यासह 29 जणांवर निंभोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
त्यानंतर तो कोथरुड पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आला.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

Web Title :-  Girish Mahajan | pune police seized documents from jalgaon in case of maratha vidya prasarak sanstha controversy girish mahajan may be in trouble

 

हे देखील वाचा :

Chhagan Bhujbal | मंत्री छगन भुजबळांचा पलटवार, म्हणाले – ‘कोणलाही शरद पवारांची अ‍ॅलर्जी असण्याचे कारण काय?’

Cyber Fraud | बूस्टर डोसच्या नावावर सायबर गुन्हेगार विचारत आहेत OTP, रिकामे होऊ शकते तुमचे बँक अकाऊंट

Multibagger Stock | 28 रुपयांच्या शेअरने गुंतवणूकदारांना केले करोडपती, 1 लाख झाले 1.29 कोटी, तुमच्याकडेही आहे का?

 

Related Posts