IMPIMP

Gold Price Today | खुशखबर ! आठवडाभरात सोन्याच्या दरात झाली मोठी घसरण, चांदीही झाली स्वस्त; जाणून घ्या दर

by nagesh
Gold Price | gold rate high on december end 56 thousand

नवी दिल्ली : वृत्तसंस्थाGold Price Today | मार्च महिन्याच्या तिसर्‍या आठवड्यात सोने आणि चांदीच्या दरात (Gold and Silver Rate) घसरण दिसून आली. आठवडाभरात सोन्याच्या दरात 397 रुपये प्रति 10 ग्रॅमची घसरण दिसून आली. तर चांदीही स्वस्त झाली आहे. चांदी 409 रुपयांपर्यंत स्वस्त झाली आहे. (Gold Price Today)

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

इंडियन बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन (India Bullion And Jewellers Association-IBJA) नुसार, गुरुवार (17 मार्च) ला सोन्याची किंमत (Sone bhav) सोमवार (14 मार्च) च्या 51,961 रुपयांच्या तुलनेत 51,564 हजार रुपये प्रति 10 ग्रॅमवर आली. तर, चांदीची किंमत (Chandi Bhav) आठवड्याच्या पहिल्या व्यवहाराच्या दिवशी म्हणजे सोमवारी 68,414 रुपये प्रति किलो होती, जी 409 रुपये कमी होऊन शेवटच्या व्यवहाराच्या दिवशी म्हणजे 17 मार्चला 68,005 रुपये प्रति किलोवर पोहचली.

 

संपूर्ण आठवड्याची सराफा बाजाराची स्थिती

IBJA नुसार, 14 मार्चला 24 कॅरेटचे सोने 51,943 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या हिशोबाने विकले जात होते.

15 मार्चला सोने 379 रुपयांनी महाग होऊन 51,521 रुपयांवर आले.

दुसर्‍याच दिवशी 16 मार्चला 176 रुपये प्रति 10 ग्रॅम घसरून 51,345 रुपयांवर आले.

17 मार्चला सोन्याचा दर 51,564 रुपये प्रति दहा ग्रॅम होता, जो एक दिवस अगोदरच्या तुलनेत 219 रुपये जास्त आहे.

अशाप्रकारे 995 म्हणजे 22 कॅरेट सोन्याच्या दरात 398 रुपयांची घसरण नोंदली गेली आहे. (Gold Price Today)

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

शनिवार आणि रविवारी जारी होत नाहीत दर

इंडियन बुल अँड ज्वेलर्स असोसिएशन सुट्टीमुळे शनिवार आणि रविवारी सोने – चांदीचे दर जारी करत नाही. IBJA चे दर देशभरात सर्वमान्य आहेत. मात्र, या वेबसाईटवर दिलेल्या दरात जीएसटीचा समावेश नाही. सोने खरेदी – विक्री करताना तुम्ही IBJA च्या दराचा संदर्भ देऊ शकता.

 

Web Title :- Gold Price Today | gold silver price today drop one business week check sona ke bhav check details

 

हे देखील वाचा :

NCP Jayant Patil On AIMIM Alliance | ‘एमआयएमला जर महाविकास आघाडीमध्ये यायचं असेल तर…’; राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांचं मोठं वक्तव्य !

Alsi For Diabetes | ‘या’ पदार्थाचे सेवन केले तर Blood Sugar येईल कंट्रोलमध्ये; जाणून घ्या

Pooja Vastrakar Longest Six | पूजा वस्त्राकरने मारला यंदाच्या विश्वचषकातील सर्वात लांब सिक्सर; पाहा व्हिडीओ

 

Related Posts