IMPIMP

Gopichand Padalkar On Supriya Sule | ओबीसी आरक्षणावर गोपीचंद पडळकरांनी सुप्रिया सुळेंचा व्हिडीओ शेअर करत साधला निशाणा; म्हणाले – ‘एका अर्थी मला आनंद..’

by nagesh
 Gopichand Padalkar On Supriya Sule | BJP leader and MLA gopichand padalkar alleges NCP leader and MP supriya sule over obc reservation

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन Gopichand Padalkar On Supriya Sule | ओबीसींच्या राजकीय आरक्षणावरुन (OBC Political Reservations) राज्यातील ठाकरे सरकारवर (Thackeray Government) टीका केली जात आहे. मागील काही दिवसांपासून हा मुद्दा प्रलंबित आहे. दरम्यान, मध्य प्रदेश सरकारला (Madhya Pradesh Government) आरक्षण मिळवण्यात यश आलं पण महाराष्ट्र सरकार यात कमी पडलं. यावरुन भाजप (BJP) महाविकास आघाडी सरकारवर टीका करताना दिसत आहे. अशातच आता भाजप नेते आणि विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी पुन्हा ओबीसी आरक्षणावरून राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळेंवर (NCP MP Supriya Sule) निशाणा साधला आहे. सुळे यांचा एक व्हिडीओ ट्वीट करत त्यांनी राष्ट्रवादीच्या ओबीसी धोरणावरच ताशेरे ओढले आहेत.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

“ओबीसींचं राजकीय प्रतिनिधित्व घालवण्याचं आणि ओबीसींचा राजकीय गळा घोटण्याचे षडयंत्र या प्रस्थापितांच्या सरकारचं आहे. म्हणूनच आगामी महापालिका निवडणुका तोंडावर आलेल्या असतानाही राज्य सरकारकडून ओबीसींच्या राजकीय आरक्षणासंबंधी कुठल्याही हालचाली नाहीत,” असा आरोप गोपीचंद पडळकर यांनी केला आहे.

 

 

“ओबीसी आणि मराठा आरक्षणाचं वाट्टोळ करणाऱ्या प्रस्थापितांची ही खरी वृत्ती समोर आली…”एकाअर्थी मला आनंद आहे,
हे ज्या पद्धतीने झालं” या विधानावरुन येणाऱ्या निवडणूका ओबीसी राजकीय आरक्षणाविनाच हे घेणार आहेत,
हा त्यांचा हेतू स्पष्ट झाला. मी जाहीर निषेध करतो.” यासंदर्भात एक ट्विट करत पडळकरांनी राज्य सरकारवर गंभीर आरोप केले आहेत.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Gopichand Padalkar On Supriya Sule | BJP leader and MLA gopichand padalkar alleges NCP leader and MP supriya sule over obc reservation

 

हे देखील वाचा :

Jio Recharge Plan | Jio ची जबरदस्त ऑफर ! 22 किंवा 28 दिवस नव्हे एक महिन्यापर्यंत रोज मिळेल 1.5 जीबी डेटा, फ्री कॉलिंग आणि खुपकाही

SBI Home Loan Costly | एसबीआयने महाग केले गृहकर्ज, एका झटक्यात वाढवले इतके दर; जाणून घ्या तुमच्यावरील परिणाम

Shivsena MP Sanjay Raut | अयोध्या दौऱ्यावरून संजय राऊत म्हणतात… ‘कमी वेळात इथे आदित्य ठाकरे छाप पाडून गेले’

 

Related Posts