IMPIMP

Har Har Mahadev | हर हर महादेव चित्रपटावर बाजीप्रभू देशपांडेंच्या वशंजांची प्रतिक्रिया

by nagesh
Har Har Mahadev | what did bajiprabhus descendants say about the controversial film har har mahadev

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन  – ऐतिहासिक हर हर महादेव (Har Har Mahadev) चित्रपट वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. त्यातील काही प्रसंगावर आणि दृश्यांवर शिवप्रेमी, काही संघटना, राजकीय पक्ष आणि इतिहास अभ्यासकांनी आक्षेप घेतला आहे. हर हर महादेव (Har Har Mahadev) चित्रपटात इतिहासाची मोडतोड झाली आहे. त्यामुळे तो चित्रपट चालू देणार नाही, अशी भूमिका संभाजी राजे छत्रपती (Sambhaji Raje Chatrapati) आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी घेतली आहे.

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

आता या चित्रपटावर बाजीप्रभू देशपांडे यांचे वंशज यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार हा चित्रपट नसून इतिहासाचे विडंबन आहे. या चित्रपटात काल्पनिक दृष्ये चुकीची दाखवली आहेत, बाजीप्रभूंनी लढवलेली पावनखिंड चुकीची दाखविली आहे. अफजल खानाच्या वधानंतर बाजीप्रभूंची उपस्थिती चुकीची आहे. सिनेमॅटीक लिबर्टीचा वापर चुकीचा आणि अयोग्य केला गेला आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचा बाजीप्रभू देशपांडे यांनी एकेरी उल्लेख केला आहे. त्यामुळे तो चुकीचा आहे. बाजीप्रभूंच्या गावात या चित्रपटाचे चित्रीकरण झाले नाही. भावनिक व्यक्तिरेखा दाखवली गेली आहे, ती अयोग्य आहे. यावर आक्षेप घेऊनही निर्माते आणि दिग्दर्शक यांनी संपर्क साधला नाही, असे वंशज म्हणाले आहेत.

 

राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी ठाण्याच्या विवियाना मॉलमधील प्रयोग बंद पाडला होता.
त्यावर मोठे वाद झाले होते. जितेंद्र आव्हाड आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना अटक केली गेली होती.
त्यांनी यावेळी चित्रपटगृहातील लोकांना मारहाण केली होती. आव्हाड यांची त्या प्रकरणावर जामीनावर सुटका करण्यात आली आहे.

 

 

Web Title :- Har Har Mahadev | what did bajiprabhus descendants say about the controversial film har har mahadev

 

हे देखील वाचा :

Jitendra Awhad | “… मग त्यांनी विनयभंगाचा गुन्हा दाखल करायचा का?”; जितेंद्र आव्हाड प्रकरणी छगन भुजबळांची सरकारवर टीका

Indrani Balan Foundation | इंद्राणी बालन फाउंडेशनच्या वतनी लोणी ग्रामस्थांना रुग्णवाहिका, उद्योजक पुनीत बालन यांच्या हस्ते लोकर्पण

Prakash Ambedkar | मुख्यमंत्री भेटून गेल्यानंतर प्रकाश आंबेडकरांनी साधला माध्यामांशी संवाद, म्हणाले..

 

Related Posts