IMPIMP

Jitendra Awhad | “… मग त्यांनी विनयभंगाचा गुन्हा दाखल करायचा का?”; जितेंद्र आव्हाड प्रकरणी छगन भुजबळांची सरकारवर टीका

by nagesh
Jitendra Awhad | chhagan bhujbal criticized shinde government on jitendra awhad molestation charges

नाशिक : सरकारसत्ता ऑनलाईन – ठाण्यातील एका पूल उदघाटनाच्या कार्यक्रमादरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी एका महिलेला हात धरून बाजूला केले होते. या प्रकरणी त्या महिलेने आव्हाडांवर विनयभंगाचा गुन्हा दाखल केला होता. ती महिला भाजपची (BJP) पदाधिकारी आहे. जितेंद्र आव्हाडांची (Jitendra Awhad) बदनामी करण्यासाठी, सूडबुद्धीने हा आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता, असा आरोप शिंदे-फडणवीस सरकारवर (Shinde Fadanvis Government) होत आहे.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

विनयभंगाच्या गुन्हानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (NCP) चांगलाच आक्रमक झाल्याचे बघायला मिळते आहे. शिंदे-फडणवीस सरकारकडून दपडशाहीचे राजकारण सुरू असून आव्हाडांविरोधात खोटा गुन्हा दाखल केल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसकडून करण्यात येत आहे. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ (Chagan Bhujbal) यांनीही या मुद्द्यावरून शिंदे सरकारची टीका केली आहे.

“गर्दीमध्ये कोणलाही कोणाचाही धक्का लागू शकतो. एखाद्यावेळी आपण हात लावून बाजुला सरकायला सांगतो, यात कसला विनयभंग आला? अशा प्रकारे जर विनयभंगाचे गुन्हे दाखल होत असतील, तर लोकलमध्ये रोज महिलांना धक्के लागल्याच्या घटना घडत असतात, मग त्यांनी विनयभंगाचा गुन्हा दाखल करायचा का? आणि जितेंद्र आव्हाडांवर कारवाई केल्याने सरकारची प्रतिष्ठा वाढली आहे का? ही घटना घडली तेव्हा मुख्यमंत्री आणि इतर पोलीस कर्मचारीही तिथे होते, त्यामुळे असे गुन्हे दाखल करणं योग्य नाही”, असे भुजबळ म्हणाले. (Jitendra Awhad)

भुजबळ पुढे म्हणाले,“माझं मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांना एवढंच सांगणं आहे, तुम्ही दोघंही समजुतदार आहात.
अनेक वर्षांपासून आमच्यासोबत तुम्ही काम केलं आहे. त्यामुळे कोणाविरुद्ध कोणता गुन्हा दाखल करावा,
याचं भान ठेवायला हवं. केवळ बदनामी करण्यासाठी गुन्हे दाखल करू नये. जितेंद्र आव्हाडांवर ज्या प्रकारचा
गुन्हा दाखल झाला, तो अत्यंत चुकीचा आहे. उलट आता हे प्रकरण सरकारवरच उलटलेलं आहे.
कारण या घटनेचे व्हिडिओसमोर आल्यानंतर सर्वकाही स्पष्ट झाले आहे.”

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

Web Title :- Jitendra Awhad | chhagan bhujbal criticized shinde government on jitendra awhad molestation charges

हे देखील वाचा :

Indrani Balan Foundation | इंद्राणी बालन फाउंडेशनच्या वतनी लोणी ग्रामस्थांना रुग्णवाहिका, उद्योजक पुनीत बालन यांच्या हस्ते लोकर्पण

Pune Crime | दुहेरी खुन प्रकरणातील फरार 7 आरोपींना येरवडा पोलिसांकडून अटक

Urfi Javed | आंतरराष्ट्रीय ग्लॅमर वर्ल्डमध्ये चालली उर्फी जावेदची जादू, होतेय टेलर स्विफ्टच्या फॅशनची चर्चा

Related Posts