IMPIMP

Hinganghat Burning Case | हिंगणघाट जळीत प्रकरणात दोषी विकेश नगराळेला जन्मठेपेची शिक्षा

by nagesh
Pune ATS | no evidence of terror link pune court gives bail to two who arrested by ats for allegedly recruiting for lashkar e taiba pune crime news

वर्धा : सरकारसत्ता ऑनलाइन Hinganghat Burning Case | देशभर गाजलेल्या वर्धा जिल्ह्यातील (Wardha) हिंगणघाट जळीत प्रकरणात Hinganghat Burning Case) आज (गुरुवारी) सुनावणी पार पडली. प्रा. अंकिता पिसुड्डे (Prof. Ankita Pisudde) हिला भर चौकात पेट्रोल ओतून जाळल्याच्या प्रकरणात आरोपी विकेश ऊर्फ विक्की नगराळे (Vikesh Alias Vicky Nagarale) याला बुधवारी (9 फेब्रुवारी) रोजी जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाने (District And Additional Sessions Court) खुनाच्या गुन्ह्याखाली दोषी ठरवले होते. आज न्यायालयाने दिलेल्या निकालात आरोपीला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

आरोपीने पेट्रोल ओतून पेटवून दिल्यानंतर 8 दिवसांनी म्हणजे 10 फेब्रुवारीला नागपुरात (Nagpur) उपचारादरम्यान अंकिताचा मृत्यू (Died) झाला होता. दरम्यान, बहुचर्चित प्रकरणाच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले. बुधवारी निकालाच्या पार्श्वभूमीवर न्यायालयाबाहेर मोठी गर्दी जमली होती. यावेळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त देखील तैनात होता. त्या दरम्यान अंकिताचे आई-वडील संगीता (Sangeeta) आणि अरुण पिसुड्डे (Arun Pisudde) हेही न्यायालयात उपस्थित होते. (Hinganghat Burning Case)

 

 

अंकिताच्या घटनेच्या 2 दिवस अगोदर एक फेब्रुवारीला 8 वाजून 8 मिनिटांनी आरोपी विकी नगराळे याच्यासोबत 40 सेकंदाचे संभाषण झाले होते. आरोपीने तू माझ्याशी लग्न कर नाहीतर तुला जिवंत ठेवणार नाही अशी धमकी दिली होती. जिओ कंपनीच्या अधिकाऱ्यांच्या साक्षी दरम्यान ही बाब पुढे आली. दरम्यान, कोरोना संकटामुळे जिओ कंपनीचे पुण्याचे नोडल अधिकारी फ्रान्सिस परेरा (Francis Pereira) प्रत्यक्ष सुनावणीत सहभागी होऊ न शकल्याने त्यांची साक्ष व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे नोंदविण्यात आली आहे. जिल्हा व सत्र अतिरिक्त सत्र न्यायालयात या खटल्यात प्रथमच व्हिडिओ कॉन्फरन्सिंग द्वारे साक्ष नोंदवण्यात आली.

 

 

दरम्यान, या प्रकरणाची प्रारंभीची सुनावणी जिल्हा व सत्र न्यायाधीश माजगावकर (Judge Mazgaonkar) यांच्यासमोर झाली.
त्यानंतर न्यायाधीश राहुल भागवत (Judge Rahul Bhagwat) यांच्यासमोर हे प्रकरण चालले. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन राज्य शासनाने उज्ज्वल निकम (Ujjwal Nikam) यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्यात आली.
सुरवातीच्या काळात सरकारी वकील प्रसाद सोइतकर (Prasad Soitkar) यांनी व नंतर अॅड. दीपक वैद्य (Adv. Deepak Vaidya) यांनी त्यांना सहकार्य केले.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

आरोपीच्या वतीने न्यायालयात अॅड. भूपेंद्र सोने (Adv. Bhupendra Sone), (अॅड. ढेकले Adv. Dhekale) आणि नागपूर येथील आणखी एक वकील असा तिघांचे वकीलपत्र सादर झाले होते. त्यामुळे न्यायालयाने नेमका वकील कोण ?
याची विचारणा आरोपीला केली व त्याने सांगितल्यानुसार अॅड. भूपेंद्र सोने यांनी आरोपीतर्फे काम बघितले.
न्याय मिळण्यास विलंब होऊ नये म्हणून न्यायालयाने कोरोना काळात देखील सुनावणी सुरू ठेवली.

 

 

Web Title :- Hinganghat Burning Case | Prof ankita pisudde burning case life imprisonment to vicky nagrale hinganghat of wardha district

 

हे देखील वाचा :

Airtel पुन्हा देणार महागाईचा झटका! यावर्षी पुन्हा महाग होऊ शकतात Prepaid Plans

Ajit Pawar | ‘तुम्ही आयुष्यभर जमिनी लाटल्या’, चंद्रकांत पाटलांच्या या वक्तव्यावरुन अजित पवारांचा पलटवार; म्हणाले…

Maha govt launches Suvidha Kendra | धारावीमध्ये देशातील सर्वात मोठे सुविधा केंद्र ! 50 हजार लोकांना एकाच वेळी आंघोळ करण्याची सुविधा

 

Related Posts