IMPIMP

Home Loan Tips | ‘गृह कर्जा’संबंधी 10 महत्वाच्या गोष्टी ! ज्या जाणून घेतल्या पाहिजेत, अन्यथा कॅन्सल होऊ शकते तुमचे ‘लोन’ अ‍ॅप्लिकेशन

by nagesh
Home Loan Tips | these 10 things related to home loan that you should know otherwise the loan application may get canceled

नवी दिल्ली : वृत्तसंस्था Home Loan Tips | घर खरेदी करण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी होम लोन (Home loan Tips) एक आवश्यक माध्यम आहे. मात्र अनेकदा लोकांचे लोन अ‍ॅप्लिकेशन कॅन्सल होते. काही छोट्या-छोट्या चुकांमुळे त्यांन कर्ज मिळत नाही. होम लोन घेऊन घर खरेदी करणे सोपे आहे, परंतु मोठ्या कालावधीचे हे कर्ज सर्वांनाच मिळत नाही.

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook Page for every update

 

 

 

 

कर्ज देणार्‍या बँका आणि हौसिंग फायनान्स कंपन्या अनेक मापदंडावर अर्जदाराची पडताळणी करतात. कर्जावरील अवलंबित्व आणि पेमेंट हिस्ट्रीसोबत अर्जदाराची पात्रता, अनुभव, कुटुंबात अवलंबितांची संख्या इत्यादीचा या मध्ये समावेश आहे. यापैकी एखादा जरी मापदंड पूर्ण न झाल्यास अर्ज रद्द होऊ शकतो. हे मापदंड कोणते ते जाणून घेवूयात (Home loan Tips)…

 

100% लोन मिळत नाही, गॅरंटी सुद्धा द्यावी लागू शकते

 

1 डाऊन पेमेंट (Down Payment) :
बँक प्रॉपर्टीच्या बाजार मूल्याच्या केवळ 80% कर्ज देते. (30 लाख रुपयांपेक्षा कमीच्या मूल्याच्या होम लोनच्या बाबतीत 90% पर्यत). इतर पैसे म्हणजे डाऊनपेमेंटची व्यवस्था तुम्हाला स्वताला करावी लागेल.

 

2 गॅरंटी (Guaranty or Guarantee) :
काही बाबतीत बँक एखादी प्रॉपर्टी किंवा कारची गॅरंटी देण्यासाठी सांगू शकते. तुम्ही कर्जाची परतफेड केली नाही तर बँक प्रॉपर्टीवर कब्जा करू शकते. यासाठी बँकेला कधीही चुकीची माहिती देऊ नका.

3 क्रेडिट यूज (Credit Uses) :
जर तुमच्या नावावर जास्त कर्ज खाती असतील तर अशा स्थितीत होम लोनसाठी तुमचा अर्ज मंजूर होण्याची शक्यता खुप कमी होते.

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook Page for every update

 

 

 

 

4 पेमेंट हिस्ट्री (Payment History) :
तुमची क्रेडिट आणि पेमेंट हिस्ट्री सांगते की, तुम्ही अगोदरचे व्यवहार कसे सांभाळले होते आणि तुम्ही कर्ज फेडण्यात किती सक्षम आहात. क्रेडिट हिस्ट्रीवर तुमचा क्रेडिट स्कोअर (Credit Score) तयार केला जातो.

 

5 उत्पन्न (Income) :
किती होम लोन मिळेज, हे बर्‍यापैकी तुमच्या उत्पन्नावर ठरते. जेवढे उत्पन्न जास्त बँक तेवढे जास्त होम लोन देईल.

 

6 कार्ड अ‍ॅप्लीकेशन (Card Application) :
काही बँका एकाच वेळी अनेक नवीन क्रेडिट कार्डसाठी अर्ज करणारे आर्थिक संकटात असल्याचा संकेत मानतात. मात्र, अनेक बँका मॉर्गेज लोन, कार लोन किंवा एज्युकेशन लोनसाठी केलेल्या अर्जांची चिंता करत नाही.

 

7 डॉक्यूमेंटेशन (Documentation) :
बँका तुमच्या सध्यस्थितीच्या बचत आणि सेवानिवृत्ती खात्यांची पडताळणी करण्यासाठी अलिकडील पेमेंट रिसिट मागते. बँकेचा हामी विभाग एखादी विसंगती किंवा कालावधी स्पष्ट करण्यासाठी तुमच्याशी संपर्क करू शकतो.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook Page for every update

 

 

 

 

8 निवास :
जर तुम्ही घर घेण्यापूर्वी भाडेकरू होतात, तर बँक मागील घरमालकाशी संपर्काची माहिती मागू शकते.

 

9 वय (Age):
होम लोन घेण्यासाठी पात्रता एका ठराविक कालावधीसाठी ठरवली जाते. कर्ज किती कालावधीसाठी मिळेल, हे तुमचे वय आणि एका ठराविक काळात कर्ज फेडण्याच्या क्षमतेवर ठरते.

 

10 अवलंबित :
तुमचे उत्पन्न इतके असावे की, अवलंबितांच्या गरजा पूर्ण करण्यासह होम लोनचे हप्ते सुद्धा वेळेवर फेडता येतील.
बँक ठराविक जबाबदार्‍यांवरून उत्पन्न प्रमाणाची गणना करते.

 

11 पात्रता आणि अनुभव (Qualifications and experience) :
जर तुम्ही पगारदार आहात, तर होम लोनसाठी किमान तीन वर्षाचा अनुभव आवश्यक आहे.
जर बिझनेस करत असाल तर तुमची कंपनी किंवा युनिट मागील काही सालापासून सतत नफ्यात असावे.
कंपनीच्या नावाने टॅक्स रिटर्न सुद्धा नियमित प्रकारे फाइल असणे आवश्यक आहे.

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook Page for every update

 

 

Web Title :- Home Loan Tips | these 10 things related to home loan that you should know otherwise the loan application may get canceled

 

हे देखील वाचा :

Pune Crime | पुणे-नगर महामार्गाजवळील शिक्रापूरामध्ये तृतीयपंथीयाचा खून; पुणे ग्रामीण पोलिसांकडून 4 तासात ‘पर्दाफाश’; मर्डरचं कारण आलं समोर

Pune Crime | व्हिडीओ कॉलवर ‘नग्न’ होण्यास सांगुन काढले ‘स्क्रीन शॉट’, ‘विवस्त्र’ फोटो व्हायरल करण्याची धमकी देत 16 वर्षीय मुलीवर वारंवार लैंगिक अत्याचार

Pune Crime | पुण्यात SRPF च्या परिक्षेसाठी भावाच्या नावावर बसला; ‘ब्ल्यु टुथ’द्वारे कॉपी करण्याचा प्रयत्न, हडपसर पोलिसांकडून अटक

 

Related Posts