IMPIMP

Hotel and Restaurant Association Western India | राज्यातील हॉटेल, रेस्टॉरंटची वेळ रात्री 1.30 पर्यंत वाढवण्यासाठी मुख्यमंत्र्यांना साकडे

by nagesh
Restaurant Service Charges | restaurant service charges not to pay in restaurant according to govt order

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन Hotel and Restaurant Association Western India | कोरोनाचा संसर्ग कमी झाला आहे. सर्व व्यवहार पूर्वपदावर येत आहे. मात्र हॉटेल, रेस्टॉरंट याना वेळेची मर्यादा दिली आहे. निर्बंधामुळे आधीच हॉटेल, रेस्टॉरंटचे मोठे नुकसान झाले आहे. त्यात वेळेच्या बंधनामुळे आणखी नुकसान सोसावे लागत आहे. त्यामुळे वेळेची मर्यादा हटवून रात्री 1.30 पर्यंत ही पूर्ववत वेळ करावी, अशी मागणी हॉटेल अँण्ड रेस्टॉरंट असोसिएशन ऑफ वेस्टर्न इंडियाने (hotel and restaurant association western india) मुख्यमंत्री आणि पर्यटन मंत्र्यांकडे केली आहे.

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

 

लॉकडाऊनमुळे पर्यटन क्षेत्रालासर्वाधिक फटका बसला आहे. आर्थिक नुकसानीमुळे देशातील 30 टक्के हॉटेल आणि रेस्टॉरंट कायमस्वरूपी बंद झाली आहेत. 20 टक्क्यांहून अधिक हॉटेल आणि रेस्टॉरंट अद्याप पूर्णपणे उघडलेली नाहीत आणि उर्वरित 50 टक्के रेस्टॉरंट तोट्यात आहेत. त्यामुळे पूर्ववत वेळ करण्याची मागणी कडून करण्यात आली आहे.

कमी व्यवसाय, वीजबिल, भाडे, कामगारांचा पगार, इतर खर्च या सर्वाचा विचार करता आताच्या परिस्थितीमध्ये हॉटेल किंवा रेस्टॉरंट चालविणे अशक्य झाले आहे. व्यवसाय पूर्ववत होण्यासाठी आमचे प्रयत्न सुरु आहेत. पण ते अयशस्वी ठरत आहेत. सध्या लसीकरण मोहीम मोठ्या प्रमाणात सुरु आहे. राज्यातील सुमारे तीन कोटी लोकांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. नवीन रुग्ण संख्याही कमी होत आहे. त्यामुळे राज्यातील आर्थिक व्यवसाय पूर्ववत करण्यासाठी तातडीने उपाययोजना करावी अशी मागणी हॉटेल अँण्ड रेस्टॉरंट असोसिएशन ऑफ वेस्टर्न इंडियाचे अध्यक्ष शेरी भाटिया (hotel and restaurant association western india president sherry bhatia) यांनी केली. दरम्यान, सरकारने सध्या सकाळी 7 ते रात्री 10 च वेळ दिली आहे ती हॉटेल व्यवसायासाठी योग्य नाही. वेळ वाढवून मिळाल्यास व्यवसाय अधिक चांगला होईल त्यासाठी आस्थापनेच्या परवाना वेळेनुसार आठवड्याचे सर्व दिवस रेस्टॉरंटची वेळ पूर्ववत करावी, असेही भाटिया यांनी सांगितले.

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

हॉटेल अँण्ड रेस्टॉरंट असोसिएशन ऑफ वेस्टर्न इंडियाचे वरिष्ठ उपाध्यक्ष प्रदीप शेट्टी
(Pradip Shetty, Senior Vice President, Hotel and Restaurant Association of Western India) म्हणाले,
हॉटेल, रेस्टॉरंटला सध्याची सकाळी 7 ते रात्री 10 ही वेळ पूरक नाही. सरकारने कोरोनापूर्व वेळेनुसार ती सुरू करावी.
याशिवाय रेस्टॉरंट कर्मचाऱ्यांचे पूर्णपणे लसीकरण करण्याच्या अटीवर रेस्टॉरंट पुन्हा सुरू करण्यासाठी शिथिलता द्यावी
आणि प्रलंबित लसीकरण असल्यास ते क्रमाक्रमाने करण्याची परवानगी द्यावी असेही ते म्हणाले.

 

Web Title :- Hotel and Restaurant Association Western India | Ask the Chief Minister to increase the time of hotels and restaurants in the state till 1.30 pm

 

हे देखील वाचा :

Drug Mafia Rubina Shaikh | ड्रग माफियांचे मालेगाव कनेक्शन उघड; रुबीना शेखची २ कोटींची मालमत्ता

Indian Post Recruitment | 10 वी पास उमेदवारांसाठी सरकारी नोकरीची सुवर्णसंधी ! टपाल विभागात 266 पदांवर भरती; जाणून घ्या

Share Market Update | सरकारी कंपन्यांमध्ये ‘बंपर’ कमाईची ‘सुवर्ण’संधी; जाणून घ्या कारण

 

Related Posts