IMPIMP

Hrishikesh Deshmukh | हृषीकेश देशमुखांचा आर्थिक गैरव्यवहारात सक्रिय सहभाग; ED चे PMLA कोर्टात प्रतिज्ञापत्र सादर

by nagesh
Hrishikesh Deshmukh | former home minister anil deshmukh son hrishikesh deshmukhs active involvement financial malpractice eds affidavit special court pmla court mumbai

मुंबई :  सरकारसत्ता ऑनलाइन Hrishikesh Deshmukh | राज्याचे तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्यावर 100 कोटींचा खंडणीचा आरोप आहे. या प्रकरणावरुन देशमुख हे सध्या अटकेत आहेत. दरम्यान, ‘अनिल देशमुख यांचा मुलगा हृषीकेश देशमुख हे आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात सक्रिय होते. तर, बेकायदेशीररित्या मिळालेले पैसे देणगी स्वरुपात दाखवण्यासाठी हृषीकेश यांनी त्यांच्या वडिलांना मदत केली,’ असं म्हणत ईडीने (ED) हृषीकेश देशमुख (Hrishikesh Deshmukh) यांच्या अटकपूर्व जामीन (Pre-arrest bail) अर्जाला विरोध केला आहे.

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

 

सक्तवसुली संचालनालयाने (ED) पीएमएलए कोर्टात (PMLA Court) दाखल प्रतिज्ञापत्रात म्हटलं आहे की, ‘हृषीकेश देशमुख (Hrishikesh Deshmukh) यांचा अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात आला तर ते पुराव्यांची छेडछाड करण्याची शक्यता नाकारता येणार नाही, तर देशमुख व त्यांच्या कुटुंबीयांचे 11 कंपन्यांवर नियंत्रण असल्याचे प्राथमिक तपासातून उघडकीस आलेय. त्यातील बहुसंख्य कंपन्यांत हृषीकेश (Hrishikesh Deshmukh) हे संचालक किंवा भागधारक आहेत. हृषीकेश यांच्या वडिलांनी सचिन वाझेच्या (Sachin Waze) माध्यमातून (Suspended Police Officer) बार व रेस्टाॅरंट्सकडून वसुली केलेल्या 4.70 कोटी रुपयांतील काही पैसे हवालाद्वारे त्यांच्या सहकाऱ्याकडे वळते केले आणि तेच पैसे ट्रस्टला देण्यात आलेली देणगी म्हणून दाखविण्यात आले.

दरम्यान, न्यायालयाने हृषीकेश देशमुख (Hrishikesh Deshmukh) यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावरील सुनावणी 4 डिसेंबर रोजी ठेवली आहे.
दरम्यान, ‘हृषीकेश देशमुख यांनी कुटुंबीयांबरोबर मिळून ‘कॉम्प्लेक्स वेब’ अशी कंपनी स्थापली आणि याच कंपनीच्या खात्यावरून संशयित व्यवहार करण्यात आलाय.
6 वेळा समन्स बजावूनही हृषीकेश तपासाला सहकार्य करत नाही, असं देखील ईडीनं (ED) म्हटलं आहे.
तसेच, हृषीकेश देशमुख यांनी ईडी चुकीच्या हेतूने कारवाई करत असल्याचे आपल्या अटकपूर्व जामीन अर्जात म्हटले आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

 

Web Title :- Hrishikesh Deshmukh | former home minister anil deshmukh son hrishikesh deshmukhs active involvement financial malpractice eds affidavit special court pmla court mumbai

 

हे देखील वाचा :

Rhea Chakraborty | सुशांतच्या निधनानंतर रिया चक्रवर्ती पहिल्यांदाच दिसली ‘या’ लूकमध्ये

Organ Repair Superfoods | शरीराचे खराब झालेले अवयव ठीक करतात ‘हे’ 5 सुपरफूड, DNA साठी सुद्धा चांगले

Pune Crime | तृतीयपंथ्याच्या खून प्रकरणातील आरोपी ‘काजल उर्फ केशव’ला 8 तासात गजाआड

 

Related Posts