IMPIMP

HSC Board Exam | 12 वीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी ! इंग्रजीच्या पेपरमधील ‘हा’ प्रश्न चुकीचा सोडवला असेल तरीही मिळणार गुण

by nagesh
10th Supplementary Examination | admit card 10th supplementary examination available exam admission students

सरकारसत्ता ऑनलाइन – HSC Board Exam | राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक बारावी बोर्डाची परीक्षा (HSC Board Exam) चालू झाली आहे. 4 मार्चला इंग्रजी विषयाचा (English Subject) पेपर होता. हा पेपर झाल्यानंतर विद्यार्थी आणि शिक्षकांमध्ये संभ्रम होता. प्रश्न पत्रिकेतील काही प्रश्न चुकीच्या पद्धतीने विचारले गेले असल्याचं विद्यार्थी आणि शिक्षकांचं म्हणणं होतं. याबाबत बोर्डाच्या अभ्यास समिती आणि मुख्य पर्यवेक्षक यांच्यामध्ये संयुक्त बैठक झाली.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

या पार पडलेल्या बैठकीनंतर एका प्रश्नाबाबत निर्णय झाला आणि सर्व विद्यार्थ्यांना त्या प्रश्नाचे गुण देण्यात येणार आहे.
सर्व म्हणजे ज्या विद्यार्थ्यांनी तो प्रश्न सोडवायचा प्रयत्न केला त्यांनाच त्या प्रश्नाचे गुण मिळणार आहेत.

 

इंग्रजी प्रश्नपत्रिकेतील 1 – A5 i या प्रश्नाबाबतची सूचना छापली गेलेली नव्हती.
त्यामुळे या प्रश्नासाठी 1 गुण (1 Mark) देण्याचा निर्णय बोर्डाने घेतला आहे.
याबाबतची माहिती राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी (Sharad Gosavi) यांनी दिली आहे.
इंग्रजीच्या प्रश्नपत्रिकेत (English Question Paper) आणखी चुका असल्याचं विद्यार्थी आणि शिक्षकांचं म्हणणं आहे. (HSC Board Exam)

 

दरम्यान, यंदाचे पेपर हे ऑफलाइन (Offline) न घेता ऑनलाइन (Online) घेण्यात यावेत, अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली होती.
राज्यभर विद्यार्थ्यांनी आंदोलन केलं होतं.
विद्यार्थांना दिलेल्या चिथावणीमुळे हिंदुस्थानी भाऊ (Hindustani Bhau) उर्फ विकास पाठकला (Vikas Pathak) पोलिसांनी (Mumbai Police) अटक (Arrested) केली होती.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

Web Title :- HSC Board Exam | maharashtra hsc exam 2022 students to get one mark in english subject as mistake in question

 

हे देखील वाचा :

All India Pharmacist Association Maharashtra | अखिल भारतीय फार्मासिस्ट असोसिएशनच्या जिल्हा उपाध्यक्षपदी प्राजक्ता चव्हाण यांची निवड

Best Mutual Fund | मार्केटऐवजी ‘या’ 10 SIP मध्ये अवघ्या 500 रुपयांनी सुरू करा गुंतवणूक आणि मिळवा जबरदस्त रिटर्न

सौंदर्य वाढवण्यासाठी करत असाल Aloe Vera चा वापर, तर साईड इफेक्टसुद्धा घ्या जाणून

 

Related Posts