IMPIMP

All India Pharmacist Association Maharashtra | अखिल भारतीय फार्मासिस्ट असोसिएशनच्या जिल्हा उपाध्यक्षपदी प्राजक्ता चव्हाण यांची निवड

by nagesh
All India Pharmacist Association Maharashtra | Prajakta Chavan elected Pune District Vice President of All India Pharmacists Association

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइनअखिल भारतीय फार्मासिस्ट असोसिएशन महाराष्ट्र राज्य (All India Pharmacist Association Maharashtra) संस्थेच्या पुणे जिल्हा (Pune District) उपाध्यक्षपदी पुण्यातील फार्मासिस्ट प्राजक्ता दशरथ चव्हाण (Pharmacist Prajakta Dashrath Chavan) यांची निवड करण्यात आली आहे. प्रदेश सचिव रोहित वाघ (Rohit Wagh) यांनी त्यांच्या नियुक्तीचे पत्र दिले. असोसिएशनचे प्रदेशाध्यक्ष दत्ता खराटे (Datta Kharate), प्रदेश उपाध्यक्ष डॉ. पंकज चौधरी (Dr. Pankaj Chowdhary), पश्चिम महाराष्ट्र अध्‍यक्ष प्राचार्य महेश मराठे (Mahesh Marathe) यांच्या शिफारशीनुसार सर्वानुमते चव्हाण यांची निवड झाली आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

फार्मासिस्टवर होणाऱ्या अन्यायाविरोधात चव्हाण पश्चिम महाराष्ट्र विभागातच नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्रभर काम करतात. कोरोना काळामध्ये सामाजिक बांधिलकी जपत त्यांनी बजावलेल्या कर्तव्याची दखल घेत त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या निवडीबद्दल शैक्षणिक, अध्यात्मिक व राजकीय क्षेत्रामधून त्यांचे अभिनंदन होत आहे. भविष्यात फार्मासिस्टच्या विविध अडचणी सोडवण्यासाठी प्राजक्ता चव्हाण प्रयत्नशील राहतील, असा विश्वास प्रदेशाध्यक्ष दत्ता खराटे यांनी व्यक्त केला आहे. (All India Pharmacist Association Maharashtra)

 

निवडीबद्दल आनंद व्यक्त करत प्राजक्ता चव्हाण म्हणाल्या, “फार्मासिस्टना येणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी ही निवड उपयुक्त ठरेल.
वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली विविध समाजोपयोगी उपक्रम राबविण्याचा प्रयत्न करील.”

 

Web Title :- All India Pharmacist Association Maharashtra | Prajakta Chavan elected Pune District Vice President of All India Pharmacists Association

 

हे देखील वाचा :

Best Mutual Fund | मार्केटऐवजी ‘या’ 10 SIP मध्ये अवघ्या 500 रुपयांनी सुरू करा गुंतवणूक आणि मिळवा जबरदस्त रिटर्न

सौंदर्य वाढवण्यासाठी करत असाल Aloe Vera चा वापर, तर साईड इफेक्टसुद्धा घ्या जाणून

PM Modi Visit To Pune | PM मोदींवरील टीकेला भाजपकडून प्रत्युत्तर, माजी मंत्री म्हणाले – ‘मग शरद पवार स्वतः पुणे मेट्रोतून फिरून का आले’

 

Related Posts