IMPIMP

IAS Shekhar Singh | पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त राजेश पाटील यांची बदली; शेखर सिंह नवे आयुक्त

by nagesh
IAS Shekhar Singh | IAS shekhar singh as pimpri chinchwad municipal commissioner pcmc rajesh patil transfered

पिंपरी : सरकारसत्ता ऑनलाइन IAS Shekhar Singh | पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त राजेश पाटील (PCMC Commissioner Rajesh Patil) यांची बदली करण्यात आली असून त्यांच्या जागी शेखर सिंह (IAS Shekhar Singh) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राज्य सरकारचे अपर मुख्य सचिव (Additional Chief Secretary) नितीन गद्रे (IAS Nitin Gadre) यांच्या आदेशाने राजेश पाटील यांची बदली करण्यात आली आहे. पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीच्या Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) पार्श्वभूमीवर शेखर सिंह यांची नियुक्ती करण्यात आल्याची चर्चा पालिका वर्तुळात आहे.

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

महाविकास आघाडी सरकारच्या (Maha Vikas Aghadi Government) काळात श्रावण हर्डीकर (Shravan Hardikar) यांच्या जागी पिंपरी चिंचवड महापालिका (Pimpri Chinchwad Municipal Corporation) आयुक्तपदी राजेश पाटील यांची नियुक्ती करण्यात आली होती.
आता राज्यात शिंदे-फडणवीस सरकारच्या (Shinde-Fadnavis Government) काळात राजेश पाटील यांची बदली करण्यात आली आहे.
त्यांच्या जागी सातारा जिल्ह्याचे तत्कालीन जिल्हाधिकारी शेखर सिंह (IAS Shekhar Singh) यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

 

ओडिशा केडरचे 2005 च्या बँचचे आयएएस (IAS) राजेश पाटील यांची आंतरराज्य प्रतिनियुक्तीने पिंपरी पालिकेत 15 फेब्रुवारी 2021 रोजी आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली होती.
त्यांना आयुक्त म्हणून दीड वर्षाचा कार्यकाळ मिळाला आहे.
दीड वर्षाच्या कार्यकाळात त्यांनी शहर स्वच्छतेवर, तृतीयपंथीयांना हक्काचा रोजगार मिळवून देण्यासह विविध कामकाज केले आहे.
प्रशासक म्हणून नियुक्ती झाल्यानंतर पाटील यांनी अनेक निर्णय घेतले.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

Web Title : –  IAS Shekhar Singh | IAS shekhar singh as pimpri chinchwad municipal commissioner pcmc rajesh patil transfered

 

हे देखील वाचा :

Food For Liver | ‘हे’ खाल्ल्याने होणार नाही लिव्हर डॅमेज, होतील अनेक फायदे

Maharashtra Political Crisis | देवेंद्र फडणवीस पुन्हा ‘अ‍ॅक्टिव्ह’ ! विधान परिषदेवर भाजपचा सभापती होणार ? मविआला पुन्हा जोरदार धक्का ?

Ringworm | खाजेमुळे त्रस्त झाला आहात का, या टिप्सद्वारे दूर करा Fungal Infection

 

Related Posts