IMPIMP

Ringworm | खाजेमुळे त्रस्त झाला आहात का, या टिप्सद्वारे दूर करा Fungal Infection

by nagesh
Ringworm | ringworm fungal infection treatment itching easy cure apple cider vinegar aloe vera garlic paste

सरकारसत्ता ऑनलाइन – Ringworm | फंगल इन्फेक्शन हा एक त्रासदायक त्वचारोग (Skin Disease) आहे (Fungal Infection), ज्याला रिंगवर्म देखील म्हणतात, हा इतका सामान्य आजार नसला तरी गेल्या काही दशकांमध्ये त्याचा प्रादुर्भाव वाढला आहे. फंगल इन्फेक्शन आपल्या त्वचेच्या कोणत्याही भागात होऊ शकते. त्यामुळे बाधित भागात खूप खाज सुटते (Ringworm). या समस्येवर मात करण्यासाठी बाजारात अनेक औषधे आणि स्किन क्रीम (Skin Cream) उपलब्ध आहेत. परंतु आज अशा अनेक नैसर्गिक टिप्स जाणून घेवूयात, ज्यांच्या मदतीने तुम्ही फंगल इन्फेक्शनपासून सहज सुटका मिळवू शकता, सर्वात चांगली गोष्ट म्हणजे यासाठी सर्व साहित्य घरातच मिळेल (Fungal Infection Treatment).

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

फंगल इन्फेक्शनपासून अशी होईल सुटका

1. अ‍ॅपल सायडर व्हिनेगर (Apple Cider Vinegar)
अ‍ॅपल सायडर व्हिनेगरमध्ये अँटी-फंगल गुणधर्म आढळतात, जे फंगल इन्फेक्शनच्या शत्रूसारखे कार्य करतात आणि अ‍ॅपल सायडर व्हिनेगरच्या मदतीने कॅन्डिडा फंगल इन्फेक्शनवर देखील उपचार केले जाऊ शकतात. यासाठी कापसाचा तुकडा व्हिनेगरमध्ये भिजवून प्रभावित भागावर लावा. साधारण 3 दिवसात तुमचे इन्फेक्शन गायब होण्यास सुरुवात होईल. (Ringworm)

 

2. कोरफड (Aloe Vera)
कोरफडीच्या मदतीने त्वचेच्या अनेक समस्या दूर होतात हे आपणा सर्वांना माहीत आहे, परंतु तुम्हाला माहिती आहे का की फंगल इन्फेक्शनपासूनही सुटका मिळू शकते. यासाठी कोरफडीची साल काढून त्याचे जेल संसर्ग झालेल्या ठिकाणी लावा, असे दिवसातून 4 ते 5 वेळा केल्यास तुम्हाला अपेक्षित परिणाम मिळेल.

 

3. लसूण पेस्ट (Garlic Paste)
फंगल इन्फेक्शनची खाज खूप त्रासदायक असते, परंतु लसणाच्या वापराने फंगल इन्फेक्शनपासून मुक्त होऊ शकता. यासाठी प्रथम लसणाच्या कळ्या वेगळ्या करून त्या मिक्सरमध्ये बारीक करा. आता त्यात खोबरेल तेलाचे (Coconut oil) थेंब टाकून पेस्ट तयार करा आणि प्रभावित भागात लावा आणि सुमारे एक ते दोन तास राहू द्या. असे केल्याने फंगल इन्फेक्शनपासून मुक्ती मिळेल.

 

फक्त आणि फक्त आरोग्याच्या (हेल्थ) बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही.
त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं. अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

Web Title :- Ringworm | ringworm fungal infection treatment itching easy cure apple cider vinegar aloe vera garlic paste

 

हे देखील वाचा :

Gold Price Today | सोने आणि चांदीच्या किमतीत मोठी घसरण, खरेदी करण्यापूर्वी जाणून घ्या किती झाला 10 ग्रॅम सोन्याचा दर ?

Aadhaar Seva At Pune Railway Station | पुणे रेल्वे स्टेशनवर आधार सेवा केंद्र; रेल्वे स्टेशनवर आधार कार्डबरोबर दुरुस्तीही करता येणार

White Hair Problem Solution | कमी वयात डोक्याचे केस का होतात पांढरे? जाणून घ्या कसा करावा बचाव

 

Related Posts