IMPIMP

Identify Fake Notes | तुमच्या खिशात पुन्हा 500 ची बनावट नोट तर आली नाही ना? या पध्दतीनं ओळखा खरी की बनावट; जाणून घ्या (व्हिडिओ)

by nagesh
Identify Fake Notes | is there a fake note of 500 in your pocket can identify like this

नवी दिल्ली : वृत्तसंस्था Identify Fake Notes | सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ वायरल होत आहे, ज्यामध्ये 500 च्या दोन नोटांमधील फरक सांगितला आहे. या व्हिडिओत म्हटले आहे की, ज्या 500 च्या नोटेत हिरवी पट्टी RBI Governor signature च्या जवळ नसेल आणि Gandhiji यांच्या छायाचित्राजवळ असेल ती नोट बनावट आहे. जर तुमच्याकडे सुद्धा हा व्हिडिओ आला असेल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. (Identify Fake Notes)

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page  for every update

 

 

 

काय आहे व्हिडिओचे सत्य?
सोशल मीडियावर वायरल झालेल्या या व्हिडिओची पडताळणी केली असता हा पूर्ण व्हिडिओ बनावट असल्याचे आढळले. PIB फॅक्ट चेकनुसार हा व्हिडिओ जुना आहे. दोन्ही प्रकारच्या नोटा वैध आहेत. या बाबत संभ्रमात राहू नये. पीआयबीने ट्विटरवर एक लिंक शेयर केली आहे, ज्यामध्ये एसबीआयने दिलेली माहिती आहे. (Identify Fake Notes)

 

 

500 ची नोट अशी ओळखा

RBI ने आपली Paisa bolta hai साइट –
https://paisaboltahai.rbi.org.in/pdf/Rs500%20Currency%20Note_Eng_05022019.pdf  वर 500 ची नोट ओळखण्यासाठी 17 पॉइंट दिले आहेत. ज्यांच्या मदतीने तुम्ही सहजपणे ती ओळखू शकता.

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page  for every update

 

 

 

ओळख
1. नोट उजेडात धरली असता 500 लिहिलेले दिसेल.

2. डोळ्यांसमोर 45 डिग्रीच्या अँगलमध्ये ठेवल्यास येथे 500 लिहिलेले दिसेल.

3. देवनागरीमध्ये 500 लिहिलेले दिसेल.

4. जुन्या नोटेच्या तुलनेत महात्मा गांधींच्या छायाचित्राचे ओरिएंटेशन आणि पोझिशन थोडी वेगळी आहे.

5. भारत आणि INDIA अक्षरे लिहिलेली आहेत.

6. नोट थोडी दुमडल्यास सिक्युरिटी थ्रेडचा कलर हिरव्यातून निळा होतो.

7. जुन्या नोटांच्या तुलनेत गॅरंटी क्लॉज, गव्हर्नरची सिग्नेचर, प्रॉमिस क्लॉज आणि आरबीआयचा लोगो डावीकडे शिफ्ट झाला आहे.

8. येथे महात्मा गांधींचे छायाचित्र आणि इलेक्ट्रोटाईप वॉटरमार्क आहे.

9. वर सर्वात डीवकडे आणि खाली सर्वात उजवीकडे लिहिलेले नंबर डावीकडून उजवीकडे मोठे होत जातात.

10. येथे लिहिलेला नंबर 500 चा रंग बदलतो. याचा कलर हिरव्यातून निळा होतो.

11. डावीकडे अशोक स्तंभ आहे.

12. उजवीकडे सर्कल बॉक्स ज्यामध्ये 500 लिहिलेले आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page  for every update

 

 

 

डावीकडे आणि उजवीकडे 5 ब्लीड लाईन्स आहेत, ज्या खडबडीत आहेत.

 

* मागच्या बाजूला

1. नोटेच्या प्रिंटिंगचे वर्ष लिहिलेले आहे.

2. स्लोगनसह स्वच्छ भारतचा लोगो.

3. मध्यवर्ती भागाकडे लँग्वेज पॅनल.

4. भारतीय ध्वजासह लाल किल्ल्याचे छायाचित्र.

 5. देवनागरीत 500 लिहिलेले आहे.

 

* अंधासाठी

महात्मा गांधींचे छायाचित्र, अशोक स्तंभाचे प्रतीक, ब्लीड लाईन आणि ओळख चिन्ह खडबडीत आहे.

 

Web Title :- Identify Fake Notes | is there a fake note of 500 in your pocket can identify like this

 

हे देखील वाचा :

PMC Jica Project | जायका प्रकल्पाबाबत महत्वाचे निर्णय, तात्काळ होणार ‘या’ सर्व गोष्टी – खासदार गिरीश बापट यांची माहिती

Aadhaar Card धारकांना मिळतेय मोठी सुविधा, स्मार्टफोनमध्ये तात्काळ डाऊनलोड करा ‘आधार’; होईल मोठा फायदा, जाणून घ्या

Mumbai High Court | अनिल देशमुखांना मोठा दिलासा ! मुंबई उच्च न्यायालयाने ED ला दिले ‘हे’ निर्देश

 

Related Posts