IMPIMP

Income Tax Raid On Yashwant Jadhav House | मनी लॉन्ड्रिंग ! 24 तासाहून अधिक काळ यशवंत जाधव यांची आयकर विभागाकडून झाडाझडती

by nagesh
Income Tax Raid On Yashwant Jadhav House | for the last 24 hours the it department search operation going on house of shiv sena leader yashwant jadhav

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन Income Tax Raid On Yashwant Jadhav House | मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी (Money Laundering Case) मुंबई महापालिकेतील स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव (BMC Standing Committee Chairperson Yashwant Jadhav) यांच्या भायखळा (Byculla) येथील घरी शुक्रवारी आयकर विभागाच्या पथकाने धाड (Income Tax Raid) टाकली आहे. गेल्या २४ तासाहून अधिक काळ झाडाझडती सुरू आहे. दरम्यान, मध्यरात्री आयकर विभागाचे अधिकारी यशवंत जाधव यांना घेऊन जाणार असल्याचे समजताच त्यांच्या समर्थकांनी मोठ्या प्रमाणात जाधव यांच्या निवासस्थानाबाहेर गर्दी केली होती. तणावाचे वातावरण निर्माण झाल्यामुळे पोलिसांनी (Mumbai Police) शिवसेनेच्या (Shivsena) कार्यकर्त्यांना समजावून त्यांना माघारी पाठवले. जाधव यांच्याबरोबरच त्यांचे निकटवर्तीय असलेल्यांवर २५ ठिकाणी सर्च ऑपरेशन सुरू आहे. आयकर विभागाने यावेळी अनेक महत्त्वपूर्ण कागदपत्रे हस्तगत केली आहेत. (Income Tax Raid On Yashwant Jadhav House)

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

काय आहे प्रकरण ?
कोलकाता येथील शेल कंपन्यांमध्ये यशवंत जाधव आणि त्यांची पत्नी आमदार यामिनी जाधव यांनी आर्थिक व्यवहार केल्याचे प्राप्तिकर विभागाच्या चौकशीतून समोर आले होते. यामिनी जाधव यांनी प्रतिज्ञापत्रात प्रधान डीलर्स नावाच्या कंपनीकडून १ कोटीचे कर्ज घेतले होते असा उल्लेख होता. मात्र या शेल कंपनीच्या माध्यमातून पुढे १५ कोटींचा आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा संशय प्राप्तिकर विभागाला असून यात कर चुकवला गेला आहे का याचा तपास करण्यात येत आहे. (Income Tax Raid On Yashwant Jadhav House)

 

कोण आहेत यशवंत जाधव ?
यशवंत जाधव यांचा गेल्या दोन दशकातील राजकीय प्रवास पाहिला तर सामान्य शिवसैनिक (Shivsainik) ते महापालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष असा आहे. त्यांच्या आक्रमक भूमिकेमुळे त्यांना सलग ४ वेळा स्थायी समिती अध्यक्षपद देण्यात आले. १९९७ मध्ये ते पहिल्यांदा निवडून आले. त्यानंतर २००२ मध्ये त्यांची नगरसेवक पदाची संधी हुकली. पक्षाचे उपविभागप्रमुख पद सांभाळत असताना जाधव यांना २००७ मध्ये पक्षाने पुन्हा संधी दिली. त्यावेळी ते निवडून आले. २००७ ते २०१२ या काळात उद्यान व बाजार समितीचे ते अध्यक्ष होते. २०१७ मध्ये तिसऱ्यांदा ते नगरसेवक झाले. तर २०१९ मध्ये त्यांच्या पत्नी यामिनी जाधव भायखळा विधानसभा मतदार संघातून निवडून आल्या. २०१८ पासून सलग ४ वर्ष यशवंत जाधव हे स्थायी समितीचे अध्यक्ष आहेत. दरम्यान काही दिवसांपूर्वी, जाधव यांच्यावर निधी वाटपाबाबत भेदभाव करत असल्याचा आरोप केला गेला होता. त्या प्रकरणाची त्यांची ऑडिओ क्लीप व्हायरल झाली होती. त्यामुळे ते अडचणीत आले होते.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

Web Title :-  Income Tax Raid On Yashwant Jadhav House | for the last 24 hours the it department search operation going on house of shiv sena leader yashwant jadhav

 

हे देखील वाचा :

Urvashi Rautela Bikini Video | उर्वशी रौतेलानं मालदिव्ज पोहोचताच दाखवला जलवा, बिकिनी व्हिडिओ शेअर करून सोशल मीडियावर केला कहर

Coronavirus Restrictions Removed Soon In Maharashtra | राज्यातील निर्बंध लवकरच हटणार; आपत्ती व्यवस्थापनाच्या बैठकीत निर्णय

Koregaon Bhima Inquiry Commission | IPS अधिकारी विश्वास नांगरे पाटील यांनी सादर केले कोरेगाव भीमा चौकशी आयोगाला प्रतिज्ञापत्र; जाणून घ्या नेमकं काय त्यामध्ये

 

Related Posts