IMPIMP

IND vs AUS 1st Test | रोहित शर्माकडे इतिहास रचण्याची सुवर्ण संधी; जर ‘ही’ कामगिरी केली तर ठरणार जगातील पहिलाच कर्णधार

by nagesh
 IND vs AUS 1st Test | rohit sharma has a chance to become the first captain in the world to win the border gavaskar trophy

सरकारसत्ता ऑनलाईन  – IND vs AUS 1st Test | आजपासून मानाच्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमधील पहिल्या कसोटी सामन्याला सुरुवात झाली
आहे. या सामन्यात नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलिया संघाने फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी सामन्यात सूर्यकुमार यादव आणि
यष्टिरक्षक केएस भरत यांनी भारतीय संघाकडून कसोटी पदार्पण केले आहे. या मालिकेमध्ये रोहितला इतिहास रचण्याची मोठी संधी आहे. रोहितच्या
नेतृत्वाखाली बॉर्डर गावसकर ट्रॉफीनंतर, टीम इंडियाला आयसीसी कसोटी क्रमवारीतही पहिले स्थान मिळवता आले, तर तो जगातील पहिला कर्णधार
ठरेल. ज्याच्या नेतृत्वाखाली संघाने तिन्ही फॉरमॅट पहिला क्रमांक मिळवला. (IND vs AUS 1st Test)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

टीम इंडिया सध्या कसोटी क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर तर वनडे आणि टी-20 मध्ये पहिल्या स्थानावर आहे. भारताच्या दृष्टीने हि मालिका खूप महत्वाची असणार आहे. जर रोहित शर्माच्या संघाला कसोटी क्रमवारीत पुन्हा अव्वल स्थान मिळवायचे असेल, तर त्यांना बॉर्डर गावस्कर करंडक स्पर्धेत ऑस्ट्रेलियाला किमान 2-0 ने पराभूत करावे लागणार आहे. तसेच जर ऑस्ट्रेलियन संघ एका सामन्यात जिंकला, तर भारताला ही मालिका 3-1 अशी जिंकावी लागणार आहे. यामुळे टीम इंडिया अव्व्ल स्थानी झेप घेईल. तसेच हि मालिका जिंकून टीम इंडिया सलग दुसऱ्यांदा जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत पोहोचणार आहे. डब्ल्यूटीसी गुणतालिकेत भारत सध्या ऑस्ट्रेलियानंतर दुसऱ्या स्थानावर आहे. जर भारताला फायनलमध्ये पोहोचायचे असेल तर त्यांना कमीत कमी 2 सामने जिंकावे लागणार आहेत. (IND vs AUS 1st Test)

 

 

पहिल्या कसोटीसाठी भारतीय संघ

रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, केएस भरत (विकेटकीपर), रविंद्र जडेजा, आर अश्विन, अक्षर पटेल, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज

भारत – ऑस्ट्रेलिया दौऱ्याचे वेळापत्रक
पहिली टेस्ट- 9 ते 13 फेब्रुवारी, नागपुर
दूसरी टेस्ट- 17 ते 21 फेब्रुवारी, दिल्ली
तिसरी टेस्ट- 1 ते 5 मार्च, धर्मशाला
चौथी टेस्ट- 9 ते 13 मार्च, अहमदाबाद

 

 

Web Title :- IND vs AUS 1st Test | rohit sharma has a chance to become the first captain in the world to win the border gavaskar trophy

 

हे देखील वाचा :

Pune Kasba Peth Bypoll Election | कसबा विधानसभा पोटनिवडणूक काँग्रेस पक्षाचे बंडखोर उमेदवार बाळासाहेब दाभेकर यांची निवडणुकीतून माघार

Indrani Balan Winter T-20 League | दुसरी ‘इंद्राणी बालन विंटर टी-२० लीग’ अजिंक्यपद क्रिकेट स्पर्धा; इव्हॉनो इलेव्हन, व्हिजन क्रिकेट अ‍ॅकॅडमी संघांची विजयी आगेकूच

Amruta Khanvilkar | अमृता खानविलकरला तिच्या पतीने केलं अनफॉलो; यावर अमृताने केला ‘हा’ मोठा खुलासा

 

Related Posts