IMPIMP

Pune Kasba Peth Bypoll Election | कसबा विधानसभा पोटनिवडणूक काँग्रेस पक्षाचे बंडखोर उमेदवार बाळासाहेब दाभेकर यांची निवडणुकीतून माघार

by nagesh
Pune Kasba Peth Bypoll Election | balasaheb dabhekar withdrawal from kasba by election independent candidature application withdrawn

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन   Pune Kasba Peth Bypoll Election | कसबा पेठ विधानसभेची पोटनिवडणूक जाहीर झाल्यानंतर महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) अनेक नेत्यांनी निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली होती. कसबा (Pune Kasba Peth Bypoll Election) हा काँग्रेसचा (Congress) पारंपरिक मतदारसंघ असल्याने या मतदारसंघातून काँग्रेसकडून तीन इच्छुक उमेदवारांची नावे पक्षश्रेष्ठींकडे पाठवण्यात आली होती. रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar), बाळासाहेब दाभेकर (Balasaheb Dabhekar), कमल व्यवहारे (Kamal Vyavahare) हे तीन उमेदवार होते. यानंतर रवींद्र धंगेकर यांच्या नावाची घोषणा केली. मात्र नाराज बाळासाहेब दाभेकर यांनी ही निवडणूक अपक्ष (Independent) म्हणून लढवण्याचा निर्णय घेतला. मात्र, पक्षातील नेत्यांनी त्यांची समजूत काढल्यानंतर दाभेकर यांनी उमेदावारी अर्ज मागे घेतला.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

नाट्यपूर्ण घडामोडी

कसबा विधानसभा पोटनिवडणुकीत (Pune Kasba Peth Bypoll Election) काँग्रेसचे बंडखोर उमेदवार बाळासाहेब दाभेकर यांनी निवडणूक अर्ज भरला होता. हा अर्ज त्यांनी मागे घ्यावा यासाठी अनेक काँग्रेसचे नेते त्यांना विनंती करत होते. शिवसेनेचे नेते विशाल धनवडे (Shiv Sena Leader Vishal Dhanwade), राष्ट्रवादीचे अंकुश काकडे (NCP Ankush Kakade), श्रीकांत शिरोळे (Shrikant Shirole) यांनी दाभेकरांची भेट घेऊन त्यांना अर्ज मागे घेण्याची विनंती केली. मात्र ते आपल्या उमेदवारीवर ठाम होते. यानंतर मतदारसंघातील काँग्रेस पक्षाचे प्रभारी आमदार संग्राम थोपटे (MLAs Sangram Thopte), अरविंद शिंदे (Arvind Shinde), अभय छाजेड (Abhay Chhajed), कमल व्यवहारे, अजित दरेकर (Ajit Darekar) यांनी बाळासाहेब यांच्या कार्यालयात त्यांची भेट घेतली. यावेळी बाळासाहेबांना सर्वांनी विनंती केली की आपण माघार घ्यावी, पक्ष आपल्यावरील अन्याय निश्चित दूर करेल.

 

मात्र दाभेकर यांनी माझ्या कार्यकर्त्यांशी बोलल्याशिवाय मी निर्णय घेऊ शकत नाही असे सांगितले.
यानंतर आमदार संग्राम थोपटे, राष्ट्रवादीचे प्रवक्ते अंकुश काकडे यांनी बाळासाहेबांच्या कार्यालयात
त्यांच्या कार्यकर्त्यांशी चर्चा केली, आणि तेथूनच काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole)
यांच्याशी दूरध्वनीवरून सविस्तर चर्चा केली. त्यानंतर नाना पटोले यांच्या विनंतीला मान देऊन
बाळासाहेब दाभेकर यांनी अर्ज मागे घेण्याचा निर्णय जाहीर केला.
अखेर आज पक्षश्रेष्ठींचे ऐकून कसबा विधानसभा पोटनिवडणुकीतून दाभेकर यांनी माघार घेतली.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Pune Kasba Peth Bypoll Election | balasaheb dabhekar withdrawal from kasba by election independent candidature application withdrawn

 

हे देखील वाचा :

Indrani Balan Winter T-20 League | दुसरी ‘इंद्राणी बालन विंटर टी-२० लीग’ अजिंक्यपद क्रिकेट स्पर्धा; इव्हॉनो इलेव्हन, व्हिजन क्रिकेट अ‍ॅकॅडमी संघांची विजयी आगेकूच

Amruta Khanvilkar | अमृता खानविलकरला तिच्या पतीने केलं अनफॉलो; यावर अमृताने केला ‘हा’ मोठा खुलासा

Pune Crime News | माथाडीच्या नावाखाली खंडणी मागणार्‍यावर गुन्हा दाखल

 

Related Posts