IMPIMP

Indrani Balan Winter T20 League 2022 | दुसरी ‘इंद्राणी बालन विंटर टी-२० लीग’ अजिंक्यपद क्रिकेट स्पर्धा; पुनित बालन ग्रुप संघाचा पाचवा विजय

by nagesh
Indrani Balan Winter T20 League 2022 | 2nd 'Indrani Balan Winter T20 League' Championship Cricket Tournament; Punit Balan Group's fifth win

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन – Indrani Balan Winter T20 League 2022 | बालन ग्रुप तर्फे आयोजित दुसर्‍या ‘इंद्राणी बालन विंटर टी-२० लीग’ अजिंक्यपद क्रिकेट स्पर्धेत पुनित बालन ग्रुप संघाने सलग पाचवा विजय मिळवत आगेकूच केली. इऑन वॉरीयर्स संघाने स्पर्धेत पहिला विजय मिळवत गुणांचे खाते उघडले. (Indrani Balan Winter T20 League 2022)

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

सहकारनगर येथील ल. रा. शिंदे हायस्कूल मैदानावर सुरू असलेल्या या स्पर्धेत प्रीतम पाटील याच्या स्फोटक फलंदाजीच्या जोरावर पुनित बालन ग्रुपने वालेकर स्पोर्ट्स संघाचा ९ गडी राखून सहज पराभव केला. गोलंदाजांनी वर्चस्व गाजवलेल्या या सामन्यात पहिल्यांदा फलंदाजी करताना वालेकर स्पोर्ट्स संघाला ९६ धावा करता आल्या. पुनित बालन संघाच्या मेहूल पटेल (२-१२), कर्णधार पुनित बालन (२-२९) आणि सचिन भोसले (२-१४) या गोलंदाजीनी कमाल केली आणि वालेकर संघाचा डाव झटपट गुंडाळला. वालेकर संघाच्या विशाल गव्हाणे (३६ धावा) आणि संदीप मोर्य (१७ धावा) यांनी संघाकडून थोडाफार प्रतिकार केला. (Indrani Balan Winter T20 League 2022)

Balan-2.webp (750×430)

पुनित बालन ग्रुपने हे आव्हान ८.२ षटकात व १ गडी गमावून पूर्ण केले. प्रीतम पाटील याने ३२ चेंडूत ६ चौकार आणि ७ षटकारांसह नाबाद ७२ धावांची स्फोटक फलंदाजी केली. प्रीतम आणि मेहूल पटेल (१२ धावा) यांनी पहिल्या गड्यासाठी ४३ चेंडूत ८६ धावांची भागिदारी करून संघाचा विजय सहज साकार केला.

Balan.webp (750×430)

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

आकाश बोराडे याच्या ६४ धावांच्या जोरावर इऑन वॉरीयर्स संघाने इव्हानो इलेव्हन संघाचा ६ गडी राखून पराभव केला. पहिल्यांदा फलंदाजी करताना इव्हानो इलेव्हन संघाने १४५ धावा धावफलकावर लावल्या. हे आव्हान इऑन वॉरीयर्सने १९.२ षटकात व ४ गडी गमावून पूर्ण केले. आकाश बोराडे याने ६४ धावांची तर, निशांत नगरकर याने २६ धावांची खेळी करून संघाचा विजय साकार केला.

सामन्याचा संक्षिप्त निकालः गटसाखळी फेरीः
वालेकर स्पोर्ट्सः २० षटकात ९ गडी बाद ९६ धावा (विशाल गव्हाणे ३६, संदीप मोर्य १७, मेहूल पटेल २-१२,
पुनित बालन २-२९, सचिन भोसले २-१४) पराभूत वि. पुनित बालन ग्रुपः ८.२ षटकात १ गडी बाद ९८ धावा
(प्रीतम पाटील नाबाद ७२ (३२, ६ चौकार, ७ षटकार), मेहूल पटेल १२);
(भागिदारीः पहिल्या गड्यासाठी प्रीतम आणि मेहूल ८६ (४३); सामनावीरः प्रीतम पाटील

इव्हानो इलेव्हनः २० षटकात ६ गडी बाद १४५ धावा (शिवराज शिंदे ३३, अमेय करमरकर नाबाद २९,
सागर सिंग नाबाद २५, रेहान खान २-२६) पराभूत वि. इऑन वॉरीयर्सः १९.२ षटकात ४ गडी बाद १४६ धावा
(आकाश बोराडे ६४ (४५, १० चौकार, २ षटकार), निशांत नगरकर २६, सागर सिंग २-१९); सामनावीरः आकाश बोराडे

Web Title :- Indrani Balan Winter T20 League 2022 | 2nd ‘Indrani Balan Winter T20 League’ Championship Cricket Tournament; Punit Balan Group’s fifth win

हे देखील वाचा :

Sharad Pawar – Maharashtra Karnataka Border Issue | ‘येत्या २४ तासामध्ये महाराष्ट्रातील वाहनांवरील हल्ले थांबले नाही तर…’ – शरद पवार

Devendra Fadnavis | “ज्यांना कोकणाने भरभरून दिलं त्यांनीच अन्याय केला”; रिफायनरी होणारच, देवेंद्र फडणवीसांची उद्धव ठाकरेंवर टीका

Maharashtra Karnataka Seemawad | बेळगावातील दगडफेकीचे पडसाद पुण्याच्या स्वारगेट बस स्थानकामध्ये

Related Posts